इंग्लंडच्या राजघराण्याच्या छानछौकीचा हा अवाढव्य खर्च कोण करत असेल ?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
राजा-राणी, त्यांचा भव्यदिव्य महाल, आजुबाजुला शेकडो नोकरचाकर, दिमखदार राहणीमान, समाजात असलेला प्रचंड सन्मान…डोळ्यापुढे जरा चित्र आणून पहा.
प्रत्येकाच्या स्वप्नात किमान एकदातरी या सुखसोई डोकावतात. मात्र तुमचं आमचं हे स्वप्न काही कुटुंब सत्यात जगत आहेत.
ब्रिटनचं राजघराण हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण. मागील अनेक दशकांपासून हे राजघराण सत्तेत आहे, मात्र ते चर्चेत असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचा थाटमाट.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा –
===
केवळ लग्नसोहळे वा अन्य प्रसंगच नाहीत, तर रोजचा दिवसही ते साजरा करतात. ब्रिटेनची महाराणी आणि त्यांचे कुटुंब एक अलिशान जीवन जगतात.
मात्र तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की त्यांच्या ह्या राजेशाही थाटाचा, म्हणजे त्यांचं राजेशाही जेवण, कार्यक्रम, दौरे, महालांचा खर्च इत्यादी कोण करत असणारं.
इंग्लंडच्या राजघराण्याला वर्षाला किती खर्च लागत असेलं आणि तो खर्च कोण करत असणार? इत्यादी प्रश्न आपल्याला नक्कीच पडत असतील…
तर ह्या प्रश्नांच उत्तर घेऊन आज आम्ही आपल्या समोर आलो आहोत. The Telegraph च्या रिपोर्ट नुसार ह्या राजघराण्याचे कुटुंब चालविण्यासाठी वर्षाला ३६८ मिलियन डॉलर एवढ्या पैश्यांची गरज असते.
ह्या रकमेचा काही भाग तिथली सरकार खर्च करते तर उर्वरित भाग हा महाराणीच्या स्वतःच्या गुंतवणुकीतून येत असतो. तर BBC च्या रिपोर्ट नुसार ह्या राजघराण्याच्या करारानुसार Crown Estate चे सर्व अधिकार संसदेला सोपविण्यात आले आहेत.
हे ही वाचा –
===
ह्याच्या बदल्यात तिथली सरकार ह्या राजघराण्याला Crown Estate ने झालेल्या नफ्याचा १५ टक्के भाग दर दोन वर्षांनी देते.
२०१३ साली Crown Estateला एकूण ३२५ मिलियन डॉलरचा नफा झाला होता. तेव्हा तिथल्या सरकारने २०१५ साली त्याचे १५ टक्के म्हणजेच ४९ मिलियन डॉलर एवढे पैसे ह्या राजघराण्याला दिले.
Sovereign Grant नुसार सरकार ह्या राजघराण्याच्या पर्यटन, महाल बंदोबस्त आणि राजेशाही कर्मचाऱ्यांचा खर्च उचलणार.
महाराणीच्या स्वतःच्या अधिकार क्षेत्रात १८,४३३ हेक्टर जमीन आहे, ज्यावर त्यांचं घरं बनलेले आहेत. तसेच तिथे व्यावसायिक काम आणि शेती देखील होते.
ही जमीनच महाराणीच्या कमाईचा स्त्रोत आहे. दरवर्षी २५ मिलियन डॉलरहून अधिक कमाई होते.
हे पैसे राजघराण्यातील सदस्यांवर खर्च केले जातात.
तर स्वतः महाराणीजवळ ४१४ मिलियन डॉलर एवढी त्यांची स्वतःची संपत्ती असल्याचा दावा केला जातो. जी त्यांनी स्वतः विकत घेतलं आहे किंवा त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालं आहे.
महाराणी जवळ आर्ट कलेक्शनची एक मोठी यादी आहे.
राजेशाही असण्याच्या कालखंडात दरम्यान Duchy हा देश या राजेशाहीत सामील केलेला होता. ज्यावर राजघराण्याचा अधिकार असायचा.
आजच्या इंग्लंडमध्ये दोन Duchy आहेत. Cornwall आणि Lancaster. ह्यापैकी Cornwall येथून येणारा पैसा हा राजघराण्याच्या खजिन्यात साठविला जातो, ज्याचा अधिकार राजघराण्यातील सर्वात मोठ्या मुलाजवळ असतो.
म्हणजेच लोकांच्याच करांमधून हा खर्च केला जातो.
अर्थात हा सर्व व्यवहार कायदेशीररित्या केला जातो, कारण राजघराण्याने हे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.
तर आता कळालं ह्या राजघराण्याचा एवढा खर्च कसा सांभाळला जातो ते…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.