Site icon InMarathi

तुमच्या मानसिक तणावाचे मुख्य कारण आहे ही एक सवय! जाणून घ्या

sushant inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आधीच्या तुलनेत आजच्या आधुनिक काळात आपल्याकडे सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. आज आपल्याकडे आपल्या गरजेच्या सर्व वस्तू आहेत. तरीदेखील आज आपण सुखी-समाधानी नाही.

ह्याचं कारण म्हणजे आधुनिक वस्तुंचा अतिवापर. जसे की फेसबुक… आज आपण ह्या फेसबुकच्या अगदी आहारी गेलो आहोत. आपण आपला वेळ हा गरज नसतानाही ह्या फेसबुकवर घालवत असतो.

म्हणजे जो वेळ आपण कुठल्या चांगल्या आणि आपल्याला उपयोगी पडेल अश्या कामात घालवु शकतो तो आपण ह्या फेसबुकवर वाया घालतो.

 

userscontent2.emaze.com

पण कधी तुम्ही विचार केला की, आपण जो एवढा वेळ देतो ह्या फेसबुकला त्याचा आपल्याला काय फायदा होत असेलं? तर ह्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही उलट नुकसानच होतं. आपल्याला भलेही फेसबुकवर आपला वेळ घालवायला आवडत असेल, पण हे फेसबुकच तुमच्या जीवनातील तणावाचे मुख्य कारण आहे.

 

 

होय…  काही काळापुर्वी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरातील क्वीन्सलॅण्ड विद्यापिठात झालेल्या एका रिसर्चमध्ये ही बाब समोर आली होती.
या रिसर्च नुसार जर तुम्ही फेसबुकचा वापर करणे सोडलं तर तुमचं जीवन हे तणावमुक्त होऊ शकतं.

 

fm.cnbc.com

 

School of Psychology चे प्राध्यापक Prof. Eric Vanman ह्यांच्या नेतृत्वात हा रिसर्च करण्यात आला होता. ह्या रिसर्चमध्ये असे दिसून आले की, जर तुम्ही फेसबुकचा वापर कमी करत असाल किंवा फेसबुकचा वापरच करत नसाल तर तुमच्यातील Stress Hormone Cortisol हे कमी होतात.

विद्यापीठाने केलेल्या अध्ययनात एकूण १३८ लोकांचा समावेश करण्यात आला होता ज्यांच्यावर हा रिसर्च केला गेला. ह्या लोकांना दोन गटांत विभाजित करण्यात आलं.

 

 

ह्यापैकी एका गटाला ५ दिवस फेसबुकपासून दूर राहायला सांगितले. तर दुसऱ्या गटाला नेहमीप्रमाणे फेसबुकचा वापर करायला सांगितले. ह्यापैकी ज्या लोकांना फेसबुक न वापरण्यास सांगितले होते त्यांच्यातील Stress Hormone Cortisol कमी झाल्याचे दिसून आले.

ह्या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की, फेसबुकच्या अतिवापराने आपला मेंदू आणि रोगप्रतिकार प्रक्रिया अशक्त होते. त्यासोबतच ह्याने आपलं वजन वाढतं आणि मन देखील नेहेमी दुःखी राहत.

 

huffingtonpost.com

प्राध्यापक Vanman ह्यांच्या मते फेसबुकचा वापर न करणाऱ्या लोकांमध्ये शारीरिकदृष्ट्या सुधारणा दिसून आली तसेच ते आधीच्या तुलनेत अधिक आनंदी असल्याचेही दिसून आले.

तर शोधकर्त्यांच्यामते WhatsApp, Twitter, Instagram इत्यादी सोशल मिडियापासून दूर राहून देखील तुम्ही तुमचा तणाव कमी करू शकता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version