Site icon InMarathi

प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या या महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

republic day inmarathi

gozocabs

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

२६ जानेवारी १९५० रोजी भारताला प्रजासत्ताक म्हणून मान्यता मिळाली. या दिवसाशी आपल्या खूप आठवणी जोडलेल्या  असतात. लहाणपणी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण स्वच्छ गणवेश आणि बूट घालून मोठ्या उत्साहाने शाळेत जायचो.

झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर समूहगीत गायन स्पर्धा व्हायच्या. शाळेची प्रभातफेरी संपूर्ण परिसरामध्ये फिरायची.

पण जसजसे आपण मोठे होत गेलो, तसतसे हा आनंद हरवत गेला आणि आपण प्रजासत्ताक दिनापासून लांब राहू लागलो. आता तर या दिवसाला माणसे फक्त एक हॉलिडे म्हणून पाहतात.

चला २६ जानेवारी आले आता एक दिवस मस्तपैकी सुट्टी एन्जॉय करायला मिळेल, असे मनातल्या मनात म्हणत लोक आनंद व्यक्त करतात. पण २६ जानेवारी या दिवसाला आपण थोर नेत्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे. २६ जानेवारी हा आपल्या प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, हे तर सगळ्यांना माहित आहे.

पण प्रजासत्ताक दिनाच्यामागे देखील काही तथ्य दडलेली आहेत, जी प्रत्येक भारतीयाला माहित असणे गरजेचे आहे.

१. २६ जानेवारी १९३० पहिल्यांदा भारताचा स्वातंत्र्य दिवस किंवा पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता. याच दिवशी भारताने संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा देण्याचे ठरवले होते.

 

scroll.in

 

२. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या नेत्यांना २६ जानेवारी हा दिवस देखील आपल्या इतिहासाच्या आठवणींमध्ये जपून ठेवायचा होता, कारण त्याच स्वराज्याच्या दिवसामुळे आजचा हा स्वातंत्र्याचा दिवस लाभला होता.

 

palpalindia.com

 

३. पहिला प्रजासत्ताक दिन हा २६ जानेवारी १९५० रोजी म्हणजेच स्वातंत्र्य मिळल्यानंतर तीन वर्षांनी साजरा करण्यात आला होता.

 

macaudailytimes.com

 

४. पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा तीन दिवस चालला. २९ जानेवारीच्या बीटिंग रिट्रीट सोहळ्यासह हा प्रजासत्ताकाचा उत्सव संपला.

 

indabaa.com

 

५. पहिली प्रजासत्ताक दिनाची परेड १९५५ मध्ये राजपथावर आयोजित करण्यात आलेली होती.

 

deccan herald

 

६.  ‘Abide with me’ हे इंग्रजी गाणे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये वाजवण्यात आले होते. हे महात्मा गांधींचे आवडते गाणे होते, असे मानले जाते.

 

biography.com

 

७. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. यामध्ये एकूण ४४८ कलम आहेत. हे इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये लिहिण्यात आलेले आहे.

 

theprint

 

८. भारताचे संविधान तयार करणे हे  सर्वाचे मोठे बुद्धीचे आणि कठीण कार्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी २ वर्ष ११ महिने घेतले.

 

bgmpavane

 

९. आपल्या नेत्यांनी इतर देशांच्या संविधानांमधून काही सर्वोत्तम पैलू उचलले. स्वातंत्र्य, बंधुता आणि समता या संकल्पना फ्रेंच  संविधानातून आल्या आणि पंचवार्षिक योजना ही यू.एस.एस.आर.च्या संविधानातून आली.

 

googleusercontent.com

 

१०.  भारताचे संविधान लागू होण्याअगोदर भारत ब्रिटिश सरकारचा भारत सरकार कायदा १९३५ चे अनुसरण करत होते.

 

 

११. प्रजासत्ताक दिनी बहुतेक राष्ट्रीय पुरस्कार जसे भारतरत्न, पदमभूषण आणि कीर्ती चक्र असे महत्त्वाचे पुरस्कार देण्यात येतात.

 

business standards

 

या आहेत आपल्या २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनामागील काही अल्पज्ञात गोष्टी, ज्या आतापर्यंत कदाचित तुम्हाला माहित नसतील.

अश्याच काही इतर गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? ज्या इतरांना माहित नसतील? आम्हाला कमेंटमध्ये सांगा!

जय हिंद!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version