Site icon InMarathi

बाबासाहेबां इतकंच संविधान निर्मितीचे श्रेय ‘ह्या’ व्यक्तीला देखील द्यायला हवे!

Dr.ambedkar and b.n. rao InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपला देश हा ज्या संविधानाच्या आधारावर उभा आहे ते संविधान बनवण्याचे सर्वाधिक श्रेय हे डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना दिले जाते. ते द्यायलाच हवे यात वाद नाही, पण ही गोष्ट देखील नाकारता येत नाही की त्यांच्यासमवेत इतरही अनेक हात संविधान निर्मितीसाठी दिवस रात्र राबले होते, ज्यांच्याबद्दल दुर्दैवाने आजच्या भारतीय पिढीली माहिती नाही.

डॉ. बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्यांपैकी एक होते बी.एन. राव. ज्यांचे कार्य अजिबात दुर्लक्षित करता येण्याजोगे नाही.

 

3.bp.blogspot.com

बी.एन.राव यांचे पूर्ण नाव बेनेगल नरसिंह राव होय. ते एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. संविधान समितीचे सल्लागार म्हणून त्यांचे योगदान अमुल्य आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे की राव हे ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी आपल्या भारतीय संविधानाचा पहिला मसुदा बनवला होता.

म्हणजेच त्यांनी सर्वप्रथम पवित्र अश्या भारतीय संविधानाचा पाया घातला होता असे म्हटले तरी वावगे ठरू नये. त्यांनी बनवलेली पहिली आवृत्ती संविधान समितीने एकमुखाने मान्य केली आणि त्यावरच पुढील कार्यवाही करण्यात आली होती.

त्यांचे महत्त्वपूर्ण काम होते, भारतीय संविधान परिपूर्ण असावे यासाठी संशोधन करणे आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही अजोड होती असे म्हटले जाते.

१९४६ साली राव यांनी अमेरिका, कॅनडा, आयर्लंड आणि युरोपचा दौरा केला होता, जेथे त्यांनी त्या त्या देशातील न्यायाधीश, बुद्धिवंत व्यक्ती, विचारवंत, न्यायप्रणालीशी निगडीत अधिकाऱ्यांची भेट घेतली, जेणेकरून नवीन भारतीय संविधान कसे असावे याबद्दल त्यांच्याकडून मते घेता येईल. तसेच त्यांनी जगातील जवळपास सर्वच देशांच्या कायद्याचा अभ्यास केला जेणेकरून भारतीय संविधानात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत.

 

 

राव यांनी जो संविधानाचा पहिला मसुदा बनवला होता त्यात २४२ कलमांचा समावेश होता. संविधान समितीकडे हा मसुदा गेल्यावर त्यातील या कलमांची संख्या वाढवून ३१५ करण्यात आली, पुढे त्यांनंतर तब्बल २४७३ बदल केल्यानंतर  ३९५ कलमांसह भारतीय संविधान तयार झाले.

जेव्हा संविधान निर्मिती प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा राव यांची जगभरातून प्रशंसा करण्यात आली, कारण हे तयार झालेलं संविधान त्यांच्या मदतीशिवाय आणि मेहनतीशिवाय अशक्य होते असेच सगळ्यांचे म्हणणे होते. २५ नोव्हेंबर १९४९ च्या भाषणात खुद्द डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देखील म्हटले होते की,

भारतीय संविधान निर्माण झाल्यापासून सगळीकडे माझेच नाव घेतले जात आहे, पण खरे सांगायचे तर संपूर्ण श्रेय मला जात नाही, बी.एन. राव यांनी घेतलेले कष्ट या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे.

भारतीय प्रशासकीय सेवा इतिहासातील सर्वात थोर अधिकारी म्हणून बी.एन. राव यांचे नाव घेतले जाते. १९४९ ते १९५२ ह्या काळात संयुक्त राष्ट्रात भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होती.

सोबत ११९५० मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद देखील भूषवले होते. त्यांची संपूर्ण कारकिर्दीच उल्लेखनीय आहे पण कोणालाही त्यांचे कार्य माहित नाही हेच दुर्दैव!

त्यांचे कर्तुत्व एका वाक्यात सांगायचे झाले तर, बी. एन. राव यांनी केवळ भारतीय संविधान निर्मितीमध्ये नाही तर म्यानमारच्या संविधान निर्मितीमध्येही महत्वाची भूमिका बजावली होती.

 

 

भले बी. एन. राव हे संविधान समितीमध्ये प्रत्यक्षपणे नसतील, पण तरीही संविधान निर्मितीमध्ये त्यांनी बजावलेल्या  कार्याचा यथोचित गौरव व्हायला हवा. कारण चित्रपटाची पहिली कथा लिहिणारा व्यक्ती, लिहिणारा लेखक हा महत्वाचा असतो.

त्यानंतर त्यात बदल होऊन अंतिम कथा पटकथा संवादसह सादर केली जाते आणि पुढे जाऊन त्याचा चित्रपट बनतो. भारताच्या संविधान निर्मितीमधील बी. एन. राव हे पहिली कथा लिहिणारे ते लेखक होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version