' इस्लाम धर्मातल्या हज यात्रेच्या मागचं “अनन्यसाधारण” महत्व जाणून घ्या! – InMarathi

इस्लाम धर्मातल्या हज यात्रेच्या मागचं “अनन्यसाधारण” महत्व जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

आपल्या आणि इतर कोणत्याही देशांमधील मुस्लिम बांधवांसाठी हज यात्रा ही खूप प्रतिष्ठेची यात्रा मानली जाते.

मुस्लिम समाजाचे तीर्थस्थळ मक्का आणि मदिनाला खूप पाक आणि पवित्र मानले जाते, प्रत्येक मुस्लिम बांधवाची आपल्या जीवनामध्ये एकदा तरी या ठिकाणी जाण्याची इच्छा असते.

येथे जाणे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे असते, जो शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि त्याच्या गैरहजेरीमध्ये त्याच्या कुटुंबियांचे पालनपोषण योग्य रीतीने होऊ शकते.

मक्का हे सौदी अरेबियामध्ये स्थित आहे. असे मानले जाते की, हे ठिकाण संपूर्ण जगाच्या मध्यभागी आहे. येथे जगाच्या सर्व भागांमधून लोक येतात आणि लाखो लोक एकत्र येऊन दुआ करतात.

कुराणमध्ये इस्लामच्या पाच स्तंभांचा उल्लेख आहे शहादा, सलत, जकात, स्वान आणि हज! मक्का आणि मदिना ही दोन शहरे इस्लाममध्ये फार पवित्र मानली गेली आहेत. हेच इस्लामचे उगम स्थळ असल्याचेही म्हटले जाते.

पहिल्यांदा या शहरामध्ये फक्त मुसलमान लोकांनाच येण्याची परवानगी होती, पण आता येथे सर्व लोक जाऊ शकतात. चला मग जाणून घेऊया याच मक्का आणि मदिनाबद्दल….!

 

Haj Yatra.marathipizza
indiasamvad.co.in

 

मक्का

मक्का हे एक असे शहर आहे जिथे अल्लाहची प्रार्थना करण्यासाठी पहिले घर बनवण्यात आले होते. या शहराच्या पवित्र मशिदमध्ये नमाज वाचणे म्हणजे १ लाख वेळा नमाज वाचण्याएवढे पुण्य कमावून देते.

मुसलमान भाविक जगामध्ये कुठेही असो, ते प्रत्येक दिवशी ५ वेळा नमाज वाचतात.

मक्का साम्राज्याची राजधानी समुद्रसपाटीपासून २७७ मीटर उंच जिन्नाहच्या घाटीवर शहरापासून ७० किलोमीटरच्या आत स्थित आहे. येथूनच कुरानची देखील सुरुवात झाली होती.

मक्काचा इतिहास

मक्कामध्ये ईश्वरचे दूत, मुस्लिम आस्थाचे संस्थापक पैगंबर मोहम्मदचा जन्म ५७० मध्ये झाला होता.

अल्लाहचे संदेशवाहक आणि हजरत पुत्र पैगंबर इब्राहीम आणि पैगंबर इस्माइलने आपल्या जीवनातील खूप वेळ येथे व्यतीत केला होता.

मक्का येथे रहिवासी आणि मोहम्मद यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते, त्यामुळे पैगंबर मक्कामधून पळून मदिनाला गेले होते.

सौदी अरेबियाच्या मक्कामध्ये इस्लामचे सर्वात पवित्र स्थान काबा मशिद देखील आहे.

ही मशिद मुस्लिम परंपरेनुसार काळ्या दगडांनी पहिल्यांदा अदमद्वारे मग त्यानंतर अब्राहम आणि त्यानंतर त्यांचे पुत्र इशमेलद्वारे निर्माण करण्यात आली होती. मक्का शहराचे निर्माण १९२५ मध्ये झाले होते.

 

Haj Yatra.marathipizza1
iqra.co.in

 

मदिना

इस्लामचे दुसरे सर्वात पवित्र स्थान म्हणजे मदिना. मदिना म्हणजे ‘पैगंबरांचे शहर’, हे शहर पश्चिम सौदी अरेबियाच्या लाल समुद्रापासून जवळपास १०० मैल लांब आणि रस्ता मार्गाने जवळपास २५० मैल लांब हेजाज येथे स्थित आहे.

हा हज यात्रेचा भाग नाही आहे, पण यात्रा करणाऱ्यांची इच्छा असेल तर ते येथे जाऊ शकतात.

मदिनाचा इतिहास

मदिनाचा प्रारंभिक इतिहास हा अस्पष्ट आहे, पण असे मानले जाते की, येथे पहिल्यापासून ईसाई काळामध्ये पॅलिस्टाइनमधून निष्कासनच्या परिणामस्वरूप यहुदी येऊन वसले होते, पण नंतर त्यांनी तिथून पलायन केले.

सप्टेंबर ६२२ मध्ये पैगंबर मोहम्मदच्या मदिनाच्या यात्रेपासून नखलिस्तानच्या इतिहासामध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला.

या यात्रेच्या तारखेने मुस्लिम कॅलेंडरची सुरुवात होते, ज्याला हिजरा असे म्हणतात.

६३२ मध्ये अराफातच्या मैदानामध्ये आपल्या ३० हजार अनुयायांना एकत्र संदेश देताना सांगितले की, “पृथ्वीवरील त्यांचे मिशन आता पूर्ण झाले आहे. “

त्यानंतर दोन महिन्यांमध्येच त्यांचे मदिनामध्ये निधन झाले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना येथेचं दफन करण्यात आले, त्यामुळे त्यांच्या कब्रला देखील एक पवित्र स्थान मानले जाते.

या ठिकाणावरून यहुदी गेल्यानंतर या ठिकाणी इस्लामचा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आणि ही इस्लामिक राज्याची प्रशासकीय राजधानी बनली.

२१ व्या शतकामध्ये इस्लाम जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला.

 

Haj Yatra.marathipizza2
lh3.ggpht.com

 

हज यात्रेस जाण्यास योग्य वेळ

हज यात्रेची तारीख इस्लामिक कॅलेंडरच्या हिशोबाने ठरवली जाते. दरवर्षी ही यात्रा ५ दिवसांची असते. जी इस्लामिक कॅलेंडरचा शेवटचा महिना धू-अल-हिजाहच्या आठव्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत असते.

या पाच दिवसांमध्ये जो नववा धुल हिजाह असतो, त्याला अरफाहचा दिवस म्हटले जाते आणि त्यालाच हजचा दिवस म्हटले जाते.

अल हिजरा इस्लामिक नवीन वर्ष असते. इस्लामिक कॅलेंडर चंद्र कॅलेंडरच्या हिशोबाने चालते आणि इस्लामिक वर्ष हे ग्रेगोरियन वर्षापेक्षा ११ दिवस लहान असते.

त्यामुळे ग्रेगोरियनची तारीख हजसाठी प्रत्येक वर्षी बदलत असते.

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार हज यात्रा प्रत्येक वर्षी गेल्या वर्षाच्या हज यात्रेपेक्षा ११ दिवस आधी सुरू होते. असे झाल्यामुळे प्रत्येक ३३ वर्षांनी एक अशी वेळ येते की, जेव्हा ग्रेगोरियनच्या एकाच वर्षात दोनदा हज यात्रा येतात. २००६ मध्ये असे झाले होते.

यात्रेकरू बाकीच्या वेळी देखील मक्केला जाऊ शकतात, त्याला छोटी यात्रा किंवा उमराह म्हटले जाते. जर कोणी उमराह केली, तरीसुद्धा तो आपल्या जीवनामध्ये एकदातरी हज यात्रा पूर्ण करण्यासाठी बांधील असतो.

उमराह करून त्याची हज यात्रा पूर्ण होत नाही. मक्का-मदिना येथे जाण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र

जे या शहरामध्ये राहणारे आहेत, त्यांना आपले ओळखपत्र स्वत:कडे ठेवावे लागते, कारण येथे असणारे सुरक्षारक्षक हे ओळखपत्र बघितल्यानंतच त्यांना पुढे जाण्याची परवानगी देतात.

जे दुसऱ्या देशातील यात्री येथे जातात, त्यांच्याकडे ओळखपत्राबरोबरच व्हीजा आणि पासपोर्ट असणे गरजेचे असते.

प्रत्येक शहराचे स्वतःचे असे काही कायदे असतात, त्याचप्रमाणे येथे जाण्यासाठी तुमच्या मनामध्ये या पवित्र धर्माविषयी श्रद्धा असणे गरजेचे आहे, तसेच या शहरामध्ये दारू पिण्यास आणि अस्वच्छता पसरवण्यास सक्त मनाई आहे.

 

Haj Yatra.marathipizza3
arabnews.com

 

मक्का ते मदिना यांच्यामधील अंतर

मक्का हे ठिकाण मदिनाच्या दक्षिणेपासून जवळ आहे. मक्का ते मदिना यांच्यामधील अंतर हवाई मार्गाने ३३९ किलोमीटर, रस्ता मार्गाने ४३९ आणि रेल्वे मार्गाने ४५३ किलोमीटर आहे.

असे हे मुस्लिम बांधवांचे पवित्र ठिकाण त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. येथील सरकार प्रत्येक वर्षी या यात्रींना योग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करते. या संपूर्ण भागावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत लक्ष ठेवले जाते.

सौदी अरेबिया सरकार प्रत्येक वर्षी या यात्रेसाठी एक कोटा निश्चित करते, त्यानुसारच तिथे लोक जाऊ शकतात. यात्री जास्तकरून हज यात्रा ही समूहाने पूर्ण करतात.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?