' अमेरिकेत बनतोय लढाऊ जहाजांचा समुद्री पूल ! – InMarathi

अमेरिकेत बनतोय लढाऊ जहाजांचा समुद्री पूल !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

====

आपण जेव्हा नौदलाचं सामर्थ्य बघतो मग कोणत्याही देशाचं का असेना, मोठमोठ्ठी जहाजे, त्यावर असलेली शस्त्रास्त्रे, पाणबुड्या, विमानवाहू जहाजे त्यावरील लढाऊ विमाने सगळंच एकदम huge वाटतं.

aircraft carrier marathipizza

 

 

पण त्यांचा सुद्धा कार्यकाळ असतो. “वय” होऊन गेलं की ह्या जहाजांना लढाईला नेता येत नाही. मग प्रश्न असा पडतो की त्याचं करायचं काय?

ज्यांनी आपल्याला लढाईत साथ दिली, अनेक युद्ध लढवून, जिंकून जे आपल्यासोबत आहेत, देशाच्या संरक्षण सज्जतेत ज्यांनी बहुमोल योगदान दिलंय – त्यांना टाकून द्यायचं?

काहींना नांगर टाकून कोणत्यातरी किनाऱ्यालगतच्या बंदरावर बांधून ठेवलं जातं. त्यांचा लिलाव होऊन विकल्या जातात तर काहींचे पुन्हा नं वापरता येण्याजोगे भाग वेगळे करून भंगारात टाकले जातात तर कधीकधी जनतेच्या जागरूकतेमुळे त्यांचे एका संग्रहालयात रुपांतर होते…!

Washington State (D.C.), अमेरिका मध्ये ठराव मांडलाय की निवृत्त लढाऊ विमानवाहू जहाजांचा एका छोट्या खाडीवर पूल बांधण्यात यावा.

HIIndustries Marathipizza

 

 

कल्पना एकदम ‘हटके’ आणि चांगली आहे.

ही कल्पना आहे जेस्सी यंग ह्यांची. ते अमेरिकेच्या रिपब्लीकन पार्टी चे नेते आहेत. ते म्हणतात :

एक तर लोक ह्या पुलावरून जाण्यासाठी हज्जारो किलोमीटर वरून येतील आणि हा पूल एक प्रेक्षणीय स्थळ बनेल. दुसरं म्हणजे आपल्या इतिहासाची साक्ष आणि एक वारसा म्हणून ही जहाजे लक्षात राहतील. ह्या दृष्टीने मला हे करणे योग्य वाटते.

 

अमेरिकन केंद्र सरकारने ह्या फक्त कल्पनेवर काम करण्यासाठी $60,000 चा निधी मंजूर केलाय. खाडीवरच्या ह्या अनोख्या पुलाचा हेतू काही अंतर कमी करणे वगैरे नसून, फक्त एक ऐतिहासिक वारसा लोकांच्या डोळ्यासमोर राहावा हा आहे. यंग ह्या पुलाने Bremerton आणि Orchard बंदर जोडण्याचं सुचवतात.

पण नौदलाच्या प्रवक्त्यांनी मात्र “सध्या ह्यासाठी एकही लढाऊ विमानवाहू जहाज उपलब्ध नाहीये” असं सांगितलंय. पण जेस्सी त्यांच्या कल्पनेबाबत ठाम आहेत.

Naval Shipyard Marathipizza

 

 

नौदालातल्या तीन महाकाय जहाजांनी ती खाडी सहज जोडल्या जाणार आहे. आणि ह्यावर काम करणाऱ्या टीमचं लक्ष आहे ते USS Independenceजी १९६० ला निवृत्त झाली आहे. USS Kitty Hawk, जी व्हियेतनामच्या युद्धात लढून पुढे १९५८ साली निवृत्त झाली. USS Enterprise, जी नुकतीच निवृत्त झाली आहे.

जर हा पूल प्रत्यक्षात आला तर नक्कीच एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपाला येईल…!

स्रोत


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?