' भारताबद्दलच्या तुम्ही न वाचलेल्या १० अभिमानास्पद गोष्टी! आवर्जून वाचा… – InMarathi

भारताबद्दलच्या तुम्ही न वाचलेल्या १० अभिमानास्पद गोष्टी! आवर्जून वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सारे जहां से अच्छा… हिंदुस्तान हमारा…!

हे गाणं म्हणत-ऐकत आपण लहानाचे मोठे होतो. आपल्या देशाच्या प्रेमात पडतो. आपण आपल्या देशावर प्रेम “का” करतो – किंवा – का करायला हवं – ह्याचा आपण विचारही करत नाही.

अर्थात, देशावर प्रेम करायला कारणं थोडीच लागतात! पण – अभिमान – ?!

देशाचा अभिमान वाटावं असं सुद्धा बरंच काही आहे आपल्या भारतात. प्राचीन संस्कृती, विविधता, नैसर्गिक सौंदर्य अशाअनेक रत्नांनी जडलेली-सजलेली आपली भारत माता कितीतरी विशेष गोष्टी स्वतःत लपवून उभी आहे.

अशा विशेष गोष्टी ज्यांची आपल्याला अजिबातच कल्पना नसते.

आज जाणून घेऊया, अश्याच १० विशेष गोष्टी – ज्या वाचून भारताबद्दलचा आपला अभिमान अधिकच वाढेल!

 

१. जगातील सर्वात मोठं पोस्टल नेटवर्क हे भारतात आहे.

 

floating post office-marathipizza

 

भारतामध्ये १,५५,०१५ पोस्ट ऑफिससह जगातील सर्वात मोठ पोस्टल नेटवर्क आहे. एक पोस्ट ऑफिस सरासरी ७,१७५ लोकांच्या लोकसंख्येला सेवा देते. एवढचं नाही तर ऑगस्ट २०११ ला श्रीनगर येथील दाल तलावात फ्लोटिंग पोस्ट ऑफिस सुरु करण्यात आलं.

 

२. जगातील सर्वात मोठा मेळा म्हणजे कुंभमेळा हा भारतात असतो.

 

 

२०११ मध्ये झालेला कुंभमेळ्याला साडे सात कोटींहून जास्त भक्तांनी हजेरी लावली होती. ही गर्दी इतकी प्रचंड होती की ती अवकाशातूनही दिसत होती.

 

३. जैसलमेरच्या किल्ल्यात राहतात शहरातील २५% लोक

 

Jaisalmer fort1-marathipizza

 

जैसलमेरचा किल्ला हा जगातील एकमात्र असा किल्ला आहे, ज्याला शहरातील तब्ब्ल २५ टक्के लोकांनी आपलं घर बनवलं आहे!

हे ही वाचा – भारतातील २०० वर्ष जुनं शिवमंदिर या प्राण्याच्या ‘पाठीवर’ उभं आहे!

४. जगातील सर्वात उंच क्रिकेट मैदान भारतात आहे

 

chail cricket statium- marathipizza

 

हिमाचल प्रदेशच्या चैल येथे जगातील सर्वात उंच क्रिकेट मैदान आहे. हे मैदान समुद्रतळापासून २,४४४ मीटर उंचीवर असून ते १९९३ मध्ये बांधण्यात आलं होतं.

 

५. जगातील पहिलं विश्वविद्यालय – तक्षशीला

 

Takshashilauniversity- marathipizza

 

सध्या पाकिस्तानात असलेलं तक्षशीला विश्वविद्यालय हे जगातील पहिलं विश्वविद्यालय आहे. त्यावेळी या विश्वविद्यालयात जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिकत असत. येथे ६० हून अधिक विषयांचे शिक्षण दिले जात असे.

 

६. जगातील सर्वात प्राचीन शहर – वाराणसी

 

varanasi-marathipizza

 

भारतातील वाराणसी हे शहर जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व २००० वर्षांपासून तिथे मानवी वस्ती असल्याचे पुरावे सापडतात.

 

७. साखर तयार करणारा पहिला देश!

 

sugar-marathipizza01

 

भारत साखरेचं शुद्धीकरण आणि शुद्धीकरण तंत्र विकसित करणारा प्रथम देश आहे. परदेशातून आलेले अनेक पर्यटक इथून साखरेच्या शुद्धीकरण आणि शेतीविषयी शिकले.

 

८. साप-शिडी हा खेळ भारताने जगाला  दिला…!

 

snakes n ladder- marathipizza

 

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लोकप्रिय असणारा साप-शिडी हा खेळ भारताने जगाला दिला. ह्या बोर्ड गेमला पूर्वी ‘मोक्ष पातमम्’ या नावाने ओळखले जायचे. मुलांना हिंदू धर्माच्या सिद्धांतांची शिक्षा देण्याकरिता या खेळाचा उपयोग केला जायचा.

 

९.  जयपूरचं जंतरमंतर – दगडाने बनलेली सर्वात मोठी  वेधशाळा

 

jantar_mantar- marathipizza

 

जयपूरची जंतर मंतर ही जगातील सर्वात मोठी दगडाने बनलेली वेधशाळा आहे. सवाई राजा जयसिंग याने १७२४ मध्ये ही निर्माण केली होती.

 

१०. भारतीय रेल्वे “जगातील सर्वात मोठी संस्था”

 

http://indianexpress.com

हे ही वाचा – जगातील ११ अदभूत जागा – ज्या “खऱ्या” वाटतच नाहीत!

भारतात रेल्वेचं भलं मोठं जाळं आहे. भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या आधारे ती जगातील सर्वात मोठी संस्था आहे. जिथे १६ लाख  कर्मचारी काम करतात…!

भारताला लोक सोने की चिडिया म्हणायचे ते उगाच नाही…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?