आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तसा भूता खेतांच्या गोष्टीवर बहुतांश लोकांचा विश्वास बसत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी – त्या गोष्टी ऐकायला सर्वांनाच जाम मजा येते…! गावाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी किरर्र अंधारात तर अहाहा…! जणूकाही भुताटकी मैफिलच जमते!
पण मुंबईसारख्या शहरात मात्र तसं काही सहसा पाहायला मिळण्याची शक्यता वाटत नाही, हो ना?
म्हणजे, भुतांना कसं घनदाट जंगलातील एकाकी वाडा, विहीर, जुनं झाड असं सगळं आवडतं. गजबजलेल्या मुंबईत भुतं कुठून येणार?
पण लवकरच कळले की हा देखील गैरसमज आहे!
कारण मुंबईत देखील भुतांच्या बऱ्याच कथा प्रचलित आहेत…! एवढंच नाही तर काही जागा भुताटकीच्या अफवांमुळे प्रसिद्ध झाल्यात!
चला तर जाणून घेऊया, मुंबईतली तथाकथित झपाटलेली ठिकाणं!
१. मुकेश मिल्स, कुलाबा
मुकेश मिल्स मुंबईमधील झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. १८७० मध्ये या मिलला आग लागली होती. तेव्हापासून ही संपूर्ण मिल निर्जन आहे.
हे ठिकाण बॉलीवुड चित्रपटांच्या शूटसाठी खूप प्रसिद्ध आहे.
पण येथे अनेक कलाकारांना विचित्र आकृत्या दिसल्याने बहुतांश शूट मध्येच बंद करावे लागले होते.
२. आरे मिल्क कॉलनी
आरे मिल्क कॉलनी ही दुतर्फा झाडांनी आच्छादलेली आहे. हे ठिकाण दिसायला जरी खूप सुंदर असले तरी येथे रस्त्यावर खूप अपघात झाले आहेत. काही वाहन चालकांचे म्हणणे आहे की, त्यांना एक साडी घातलेली बाई लहान मुलासह दिसली, तिने त्यांना गाडी थांबवण्यास सांगितले आणि नंतर गायब झाली.
काहीजण सांगतात की, जर गाडी थांबवली तर ती बाई गाडीचा पाठलाग करते.
काहीजणांनी असेही सांगितले आहे की, त्यांना लहान मुलगा आणि म्हातारा माणूस दिसला आणि ते काहीवेळाने गायब झाले. त्यामुळे रात्रीच्यावेळी चालक या ठिकाणावरून प्रवास करणे टाळतात.
३. ग्रँड पॅरडी टॉवर्सचा आठवा मजला
ग्रँड पॅरडी मुंबईच्या उच्चभ्रू भागामध्ये स्थित आहे. ग्रँड पॅरडी टॉवरमुळे अनेक लोकांवर दुर्दैव ओढवले आहे.
पहिली घटना इथे अशी घडली की, एका जोडप्याने या टॉवरच्या आठव्या मजल्यावरून उडी घेतली.
त्याच्या पुढीलवर्षी देखील तसेच घडले. दुसऱ्या एका कुटुंबातील लोकांनी सुद्धा त्यांच्या फ्लॅटमधून उडी मारली. अश्या अनेक घटना घडल्या.
त्यामुळे ह्या टॉवरचा आठवा मजला झपाटलेला आहे असे मानले जाते. हा टॉवर या शहरातील सर्वात भीतीदायक ठिकाणांपैकी एक मानला जातो.
४. टॉवर ऑफ सायलंस
ही पारसी लोकांची जागा आहे. या ठिकाणावर पारसी लोकांचे मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी लटकवले जातात. गजबजलेल्या मुंबईतील ही जागा खूप निर्जन असून मलबार टेकडीवर स्थित आहे.
या ठिकाणी कोणत्याही अप्रिय घटना घडलेल्या नाहीत. पण तरीही या ठिकाणा जवळून जाताना अस्वस्थ वाटते असं अनेकदा नमूद केलं जातं.
५. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
मुंबईतील हा भाग निसर्गवेड्यांच्या अतिशय पसंतीचा आहे. येथे असलेली वनसंपदा देखील पाहण्याजोगी आहेत. पण हा भाग अजून एका कारणामुळे चर्चेत असतो – भुताटकी!
येथे येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांना खूप वेळा अडवणारा आत्मा दिसला आहे आणि त्यामुळे हा भाग झपाटलेला आहे असे असा दावा वारंवार केला जातो.
६. डिसोझा चाळ, माहीम
या चाळीमध्ये एका बाईचा आत्मा दिसतो असे म्हटले जाते. एक दिवस ही बाई चाळीतील विहिरीमधून पाणी भरत असताना अचानक त्या विहिरीची भिंत तुटली आणि ती विहिरीत पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून ती रात्रीची चाळीमध्ये दिसते असा दावा अनेकांनी केला आहे.
७. वृंदावन सोसायटी
वृंदावन सोसायटी ही ठाणे खाडीच्या अगदी पुढे स्थित आहे. येथील एका इमारतीवरून काही वर्षापूर्वी एका माणसाने आत्महत्या केली होती असे सांगितले जाते. या सोसायटीमधील भूत थोडे गमतीशीर आहे. हे भूत लोकांना कानाखाली मारते.
या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर येथील सुरक्षा रक्षकांबरोबर अश्या कितीतरी घटना घडल्या आहेत. रात्री कधी या सुरक्षा रक्षकांचा डोळा लागल्यास हे भूत त्यांना कानाखाली वाजवून झोपेतून जागे करते किंवा गळा दाबते असे म्हणतात.
अर्थात या ऐकीव बाबी आहेत.
८. पूनम चेम्बर्स
मुंबईमध्ये १९९३ साली झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि त्यानंतर १९९७ मध्ये येथे बी विंगची पडलेली भिंत या दोन्ही घटनांमध्ये मृत पावलेल्या माणसांचे आत्मा येथे भटकत असल्याचे सांगितले जाते.
बी विंगमध्ये जे लोक मध्यरात्रीपर्यंत काम करतात, त्यांना घरी जाताना पायऱ्यांचा वापर करू नये असे सक्तीने सांगितले आहे.
इमारतीच्या वॉचमेन आणि कंपनींच्या सुरक्षा रक्षकांनी रात्रीचे दारे, खिडक्या हलून चित्रविचित्र आवाज येतात अशी तक्रार खूप वेळा केली आहे.
९. नासेरवंजवाडी, माहीम
हे ठिकाण माहीम स्थानकाच्या जवळ आहे. येथे राहणाऱ्या मालकाची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून त्याचा आत्मा येथे भटकत असल्याचे सांगितले जाते.
त्या मालकाला जाळण्यात आले होते. त्यामुळे तो मध्यरात्रीनंतर त्याच्या मार्गात येणाऱ्याला खूप यातना देतो. त्याला जिथे जाळण्यात आले होते, तेथील विहीर आता झाकून टाकण्यात आली आहे.
१०. मुंबई उच्च न्यायालय
या बाबतीत किती तथ्य आहे ते माहित नाही, पण म्हणतात की, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जेव्हा कधी खुनाच्या खटल्याची सुनावणी असते, तेव्हा हे भूत शिवीगाळ करते आणि आपली दहशत निर्माण करते.
तर असे हे १० कुप्रसिद्ध ठिकाण!
सदर लेख हा निव्वळ मनोरंजनासाठी असून, कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्या ठिकाणांची बदनामी करण्याचा हेतू नाही…हे वेगळं सांगायला नकोच!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.