' कोण म्हणतो शाकाहारी अन्नात B-12 नसतं!? वाचा सत्य! – InMarathi

कोण म्हणतो शाकाहारी अन्नात B-12 नसतं!? वाचा सत्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : राहुल करुरकर

===

अनेक जणांच्या b12 कमतरतेच्या तक्रारी असतात. असा भ्रमदेखील पसरवला जातो की शाकाहारात b12 मिळत नाही. परंतु मी अभ्यासातून व अनुभवातून सांगतो की b12 शाकाहारातूनही योग्य प्रमाणात उपलब्ध होते. त्यासाठी मांसाहार करायची गरज नाही. मुळात कुठलीही जीवनसत्वांची कमतरता सप्लीमेंट्स न घेता दूर करण्याचे प्रयत्न व्हावे. B12 तयार करणारे मायक्रोबीयल जीव शाकाहार व मांसाहार दोन्हीत असतात.

B12 चा उपयोग अनेक अमिनो ॲसीडचे पृथ्थकरण (सिंथेसीस ) करण्यासाठी होतो. तसेच हे पृथ्थकरण न झाल्याने अमिनो ॲसीडची व त्यातून मिळणाऱ्या न्यूट्रीशनची कमतरता व पेशींच्या (cell ) वाढीत अडसर निर्माण होतो. यातून नैराश्य येणे , ईमोशनली लो वाटणे, आळस किंवा काही करण्यासाठी उत्साह नसणे असे मानसिक परिणाम देखील दिसतात. अनेक वेळी Nervous system तसेच पाठीच्या कण्याचा ऱ्हास (degeneration), डिमेन्शिया (dementia), ॲनेमिया (anaemia) B12 च्या अती कमतरतेत होतो. B12 ची मदत अन्नातून आवश्यक सत्त्व काढुन घेण्यासाठी होते. शरीरात पेशींची अव्याहत वाढ चालूच असते. तेव्हा B12 व folic आवश्यक आहेत.

B12 शोषुन घेण्याची अवजारे तुमच्या छोट्या आतड्यातील तीसऱ्या भागात असतात. त्यासाठी B12 वेगळे होण्याची प्रक्रिया आधिच सुरु व्हायला हवी. म्हणजे अन्नात पुरेशा प्रमाणात लाळ मिसळली जाऊन ते अन्न पचनास सोपे होणे आवश्यक आहे.

तुम्ही तुमच्या शरीरात देखील योग्य प्रमाणात B12 निर्माण करु शकतात.

कारण B12 निर्माण करणारी मायक्रोब्ज्स तुमच्या आहारात अगदी शाकाहारात देखील असतात. मूलतः तुमच्या guts / आतड्यांमध्ये जितकी वैविध्यपूर्ण मायक्रोबियल कॉलोनी मोठी तितके b12 प्रमाण व त्याचे शोषण जास्त चांगले होते. ही बॅक्टेरीया कॉलोनी चांगल्या बॅक्टेरीयांची असते. ज्यातून दुधाचे दही होते तसेच इडली दोश्याचे पीठ आंबते/ fermentation होते , पोळी/भाकरी शीळी झाली किंवा भात शीळा झाला तरी त्यात B12 प्रमाण वाढते किंवा आढळते. कारण अन्न शिजवल्यावर त्याची विघटनाची प्रक्रिया बळावते व ती प्रक्रिया करणारे मायक्रोब्ज असतात. परंतू विटलेले अन्न जास्त B12 असलेले म्हणून खाणे अयोग्यच. फक्त काही प्रमाणात फरमेंटेशन झालेले अन्न खाल्ल्यास B12 मिळायला व शोषुन घ्यायला मदत होते. तसेच जर पोळीच्या कणिकेत यीस्ट किंवा दह्याचे पाणी घातल्यास B12 नैसर्गिक पद्धतीने तयार होत मिळते.

दुसरा महत्वाचा प्रकार म्हणजे मायक्रोग्रीन तसेच मोड आलेले धान्य / कडधान्य / बीया (मेथी, सुर्यफुल).

मुळात B12 निर्माण करणारी घटके मायक्रोब्ज असल्याने मोड येण्याच्या प्रक्रियेत तसेच त्यातुन अंकुर फुटुन आलेली कोवळी पानं (यांना मायक्रोग्रीन म्हणतात), यात जमिनीशी तसेच हवेशी संबंध येतो म्हणून मायक्रोब्जचा प्रादुर्भाव असतो. आहारात याकरताच रोपांच्या मुळांची भाजी (गाजर, बीट, बटाटा, मुळा, सुरण) व त्यांचे बाह्य आवरणावर मायक्रोब्ज व पर्यायाचे काही प्रमाणात B12 आढळते. म्हणून जिथे योग्य व शक्य तिथे भाज्यांची देठ/साल यांचा समावेश आहारात ठेवा. दुग्धजन्य पदार्थ तसेच मशरुम यात देखील B12 आढळते.

शेवाळे / Seaweed हा देखील प्रकार जपानीज खाण्यात असतो व त्यात नैसर्गिक प्रमाणात प्रचंड B12 vitamin आढळते. कारण शेवाळ्याचा संबंध समुद्रातील अनेक बॅक्टेरीया मायक्रोब्ज यांच्याशी येतो. परंतू मूळापासुन मिळणाऱ्या भाज्या किंवा शेवाळे किंवा मायक्रोग्रीन या सर्वात एक महत्वाचा भाग म्हणजे जर आपण हे सर्व अन्नप्रकार जैविक खतांपासुन तयार केलेले असले तर भाज्या कमी साफ करत तसेच कमी शिजवत व जास्त प्रोसेसींग न करता खाऊ शकतो. तिथे B12 योग्य प्रमाणात टिकते.

अती साफसफाई करत सर्वांची सालं काढत तसेच अती शिजवत भाज्यामधील नैसर्गिक मायक्रोबीयल प्रक्रियेचा व पर्यायाने B12 चा आपण नाश करतो. तसेच बाहेरचे पॅकेज्ड फुड किंवा रेस्टॉरेंट मधील फुड जे फ्रोजन किंवा प्रिझरवेटीव्ह असलेले असण्याची शक्यता जास्त असते त्यात केमिकलच्या वापरामुळे अन्नातील नैसर्गिक मायक्रोबियल ॲक्टिवीटी कमी किंवा बंद झालेली असते. असे अन्न अन्न राहात नाही केवळ केमिकल बनते.

आता तुम्हाला शाकाहारापेक्षा मांसाहारात b12 जास्त का आढळते ते सांगतो.

कारण हे (बकरी, कोंबडी, गाय, ससा, हरीण, डुक्कर) प्राणी कुठलीही स्वच्छता न बाळगता गवत किंवा जमिनीत लावलेला पाला फळं खातात, नदी ओढ्यावरचे पाणी पितात. तुम्ही तितका नैसर्गिक आहार केला तर तुमचे B12 देखील प्राण्यांसारखे होईल. पण आपले अन्न विषारी रासायनिक खतांपासुन बनवले असेल तर B12 वाढवण्यासाठी न स्वच्छ करता खायला गेलात तर कर्करोगाने ग्रस्त व्हाल. म्हणून organic/जैविक शेतीतील अन्नाचे महत्त्व जास्त. तिथे अति साफसफाई करण्याची तेवढी गरज भासत नाही.

आता B12 शोषण्यासाठी सोपे जावे याकरता पोटात नैसर्गिक रित्या चांगल्या बॅक्टेरीयांची कॉलोनी कशी तयार कराल?

तर प्रोसेस्ड फुड कमी करणे, बाहेरचे सॉस कमी वापरणे, ज़रूरी पेक्षा अन्न जास्त न शिजवणे, नैसर्गिक विरझण लावलेले दही व ताक वापरणे, फळांचे व कच्च्या गोष्टींचा आहारात उपयोग करुन हा उद्देश साधता येतो. नुसते सॅलेड खाण्याऐवजी जर कोशिंबीर किंवा रायता केला तर त्यातील जीवनसत्त्व लवकर शोषली जातात. कारण त्यात दही किंवा लिंबू कधी मीरपुड, शेंगदाणा किंवा तीळपूड असते. अशा प्रकारे खाल्लेले कच्चे अन्न जास्त पाचक ठरते. आठवड्यात फरमेंट केलेले अन्न (इडली, दोसा ब्याटर) एकदोन वेळा अवश्य वापरा.

शेवटचा व महत्वाचा भाग म्हणजे खुप औषधांचा मारा शरीरावर होत असेल तर B12 चे शोषण करण्याची क्षमता शरीर गमावते. तसेच तुम्ही कितीही सप्लिमेंट्स घ्या पण शरीरास योग्य मेहनत व व्यायाम नसेल किंवा प्रचंड मानसिक तणावपूर्ण जीवनशैली असेल तर शरीराची जीवनसत्त्व शोषुन घेण्याची यंत्रणा ढासळते.

बलवान शरीर व प्रसन्न मन अन्नाचे योग्य विघटन करण्यासाठी आवश्यक आहे. तेव्हा B12 कमी आहे म्हणून डॉक्टरांकडे सप्लिमेंट्स मागण्याआधी हे सर्व बदल करुन जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करा. तदनंतर जर B12 कमतरता असेल तर सप्लिमेंट्स अवश्य घ्या. पण मला खात्री व अनुभव आहे की शाकाहारातही योग्य जीवनशैली व चौरस आहारातून तुम्ही B12 कमतरतेवर मात करु शकतात.

जेव्हा B12 व folic यांची रक्तात धोकादायक पातळीवर कमतरता आढळली आहे तेव्हा इंजेक्शन तथा गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्या मात्र त्या गोळ्या कशा बंद करत नैसर्गिक स्त्रोतातून जीवनसत्त्व घेता येतील यावर अभ्यास व कृती करावी. काही मेडीकल कंडीशन मध्ये योग्य जीवनशैली व आहार असुनही शरीरास पुरेसा B12 मिळत नाही. त्याप्रसंगी घेण्याचे वैद्यकिय उपचार हे त्या त्या मेडीकल कंडीशन व व्यक्तिवरत्वे बदलतात. मात्र हे सर्व अपवाद आहेत. व नियम योग्य जीवनशैली तसेच नैसर्गिक आहार यातून B12 मिळवण्याचाच आहे व असावा!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?