' आयुष्यात टेन्शन जाणवतंय?, फ्रस्ट्रेशनही वाढलंय? मग ही फळ ठरतील रामबाण उपाय – InMarathi

आयुष्यात टेन्शन जाणवतंय?, फ्रस्ट्रेशनही वाढलंय? मग ही फळ ठरतील रामबाण उपाय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानसिक तणाव आणि नैराश्य हा आजकाल प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनला आहे. यामुळे मानसिक त्रास तर होतातच पण याचबरोबर अतिरिक्त तणाव आणि नैराश्यामुळे अनेक आजारही होऊ शकतात.

 

tension inmarathi

 

तणाव आणि नैराश्यावर मात करण्यासाठी लोक विविध प्रकारच्या थेरपी आणि औषधांचा अवलंब करतात. पण या थेरपी आणि औषधींमुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता ही असते. त्यामुळे या थेरपी आणि औषधी घेण्यापेक्षा आपण आपली जीवनशैली सुधारून आणि चांगला आहार घेऊन तणाव आणि नैराश्यावर मात करू शकता.

एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावनंतर जगामध्ये मानसिक तनाव आणि नैराश्य असणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

चला तर मग जाणून घेऊया मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी काय उपाय करता येईल.

● आहारामध्ये करा या फळांचा समावेश :-

१) पपई :-

पपई हे फळ अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत आहे. पपईच्या सेवनाने अनेक फायदे होतात जसे की, वजन कमी करण्यापासून ते कर्करोगापासून बचाव करण्यापर्यंत!

 

papaya Inmarathi

 

हे फळ व्हिटॅमिन सी चा प्रमुख स्रोत आहे. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि ज्यांची प्रतिकारशक्ती तणावामुळे कमकुवत झाली आहे अशा लोकांसाठी हे फळ उपयुक्त आहे.

२) कीवी :-

कोरोनाच्या काळानंतर अनेक कारणांनी मानसिक ताण असणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत किवी या लोकांसाठी वरदानापेक्षा काही कमी नाही. त्यात लोह आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते.

 

kiwi inmarathi

 

तसेच या फळामध्ये पण विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. या कारणामुळे तणावाचा सामना करण्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.

३) स्ट्रॉबेरी :-

स्ट्रॉबेरीच्या सेवनाने अनेक फायदे होतात जसे की हृदयाचे आरोग्य जपले जाते, कर्करोग टाळता येतो.

 

eating strawberry inmarathi

 

स्ट्रॉबेरी मध्ये केवळ व्हिटॅमिन सीच नव्हे तर मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात असतो. मॅग्नेशियम तणावाचा सामना करण्यास मदत करते, या कारणांमुळे आपल्या शरीरामध्ये दिवसभर एक वेगळाच उत्साह जाणवतो.

४) संत्रा :-

संत्रामुळे मानसिक ताण दूर होण्यास मदत होते. हे फळ तणावावर उपाय म्हणून सर्वोत्तम फळ आहे.

 

orange juice inmarathi
healthline.com

 

यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. संशोधनात असे सांगण्यात आले आहे की या फळाच्या सेवनाने मानसिक तणाव दूर होतो.

५) पेरू

हे जगातील सर्वात जास्त व्हिटॅमिन सी ने युक्त असेलेल फळ आहे, याच्या एका कपमध्ये तब्बल ३७६ मिलीग्राम विटामिन सी असते जे जवळजवळ आपल्या शरीराची एका आठवड्यासाठी गरज भागवते.

 

peru inmarathi
organic facts

 

याच्या नियमित सेवनाने वजन कमी होणे, थायरॉईड बरे करणे, बद्धकोष्ठता आणि अतिसारापासून आराम आणि बरेच काही आरोग्य फायदे आहेत. तसेच यामध्ये आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता आहे ज्यामुळे आपला रक्तदाब कमी होतो. उपस्थित मॅग्नेशियमच्या प्रमाणामुळे, ते स्नायू आणि मज्जातंतूंच्या पेशींना आराम देऊ शकते ज्यामुळे तणाव कमी होतो.

६) केळी :-

केळं हे फळ खूप फायदेशीर फळ आहे. त्यात अनेक जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि फॉस्फरस असतात.

 

banana inmarathi

 

तणावाच्या परिस्थितीत केळीचे सेवन फायदेशीर ठरते. यासोबतच अशा परिस्थितीत केळीच्या सालीपासून बनवलेला चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.

● याचबरोबर मानसिक तणाव दूर करण्याची अजुन काही गोष्टी म्हणजे :-

१) मेडिटेशन/ ध्यान :-

मानसिक तणाव दूर करण्यासाठी ध्यानाचा नियमित सराव खूप फायदेशीर आहे. ध्यान हे एक जुने योग तंत्र आहे ज्याने तुम्ही शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी सराव करू शकता.

रोज ध्यानधारणा केल्याने किंवा ध्यानाचा सराव केल्याने तुम्हाला मनःशांती मिळते आणि शरीरात आनंदी हार्मोन्स तैयार होतात.

 

yoga inmarathi

 

मानसिक ताणतणाव, नैराश्य आणि तणाव इत्यादींवर मात करण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यानाचा अवश्य समावेश करा. दररोज १० मिनिटे ते ३० मिनिटे ध्यानधारणा करून किंवा ध्यानाचा सराव करून तुम्ही तणाव दूर करू शकता आणि शरीर निरोगी ठेवू शकता.

२) योग :-

योगासनांचा नियमित सराव केल्याने तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते. दररोज ३० ते ४० मिनिटे योगाभ्यास करून तुम्ही मानसिक तणाव दूर करू शकता. याशिवाय नियमित योगाभ्यास केल्याने तुमचे शरीरही निरोगी आणि रोगांपासून मुक्त होईल.

 

yoga inmarathi

 

एका संशोधनानुसार, दररोज १० मिनिटे चालणे मानसिक तणाव कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. याशिवाय काही विश्रांतीचे व्यायामही केले पाहिजेत.

तर आहेत काही।उपाय, जे केल्याने आपल्याला येत असलेला मानसिक तणाव नक्कीच नाहीसा होईल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?