मुस्लिमांचा “कुराण”मतवाद : पैगंबरांचं चित्र कुठेच नसण्यामागचं कारण आणि इतिहास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रत्येक धर्माच्या आपल्या रूढी, परंपरा, संकल्पना असतात. धर्म या शब्दाचा शब्दशः अर्थ सांगायचा तर ‘कर्तव्य’ असा होतो. पण, भारतात धर्माचा हा अर्थ फार प्रचलित झाला नसून धर्म म्हणजे लोकांमध्ये फूट पाडण्याचं एक साधन असल्याचं दुर्दैवाने नेहमीच बघायला मिळतं.
हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी असे विविध धर्मातील लोक भारतात एकत्र राहतात ही आपल्यासाठी साधी गोष्ट असली तरी याचं जगाला फार कौतुक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. धर्म वेगवेगळे असले तरी एका गोष्टीत साम्य आहे की, प्रत्येक धर्माला आपला एक चेहरा आहे.
हिंदू धर्मात आपण विष्णु भगवानांना सर्वोच्च स्थानी मानतो तर शीख धर्मीय गुरुनानक यांचं पूजन करतात, ख्रिश्चन धर्मीय येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या शिकवणीवर चालतात.
या सर्व धर्मातील प्रमुख व्यक्तीची कोणती तरी प्रतिमा आपण बघितलेली आहे, ती आपल्या मनात आहे. पण, मूर्ती पूजेला तीव्र विरोध असलेला मस्लिम हा असा एकमेव धर्म आहे जिथे देव म्हणून मानल्या जाणाऱ्या ‘अल्ला’ किंवा मुस्लिम धर्म संस्थापक ‘प्रोफेट मोहम्मद’ यांची कोणतीही प्रतिमा आपण आजवर बघितलेली नाहीये.
आपल्या मुस्लिम मित्रांकडे आपण ईदच्या शुभेच्छा द्यायला, शिरखुरमा खायला वगैरे जात असतो. पण, त्यांच्या घरात आपल्याला नेहमी ‘हज’ यात्रेचा वगैरे फोटो दिसत असतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
‘मोहम्मद पैगंबर’ यांचा फोटो आजवर कोणीच बघितलेला नाहीये किंवा त्यांचं कोणतं काल्पनिक चित्र देखील तयार करण्यास कोणताही चित्रकार धजावलेला नाहीये. असं का? जाणून घेऊयात.
मोहम्मद पैगंबर यांचं चित्र तयार करू नये अशी कोणतीच सूचना किंवा आज्ञा मुस्लिम धर्मग्रंथ ‘कुराण’ मध्ये नमूद केलेली नाहीये. पण, कुराणामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की, “अल्ला हा सृष्टीचा निर्माता आहे. आकाश आणि पृथ्वी यांना निर्माण करणाऱ्या त्या महान व्यक्तीची तुलना इतर कोणाशीही केली जाऊ शकत नाही.”
इस्लाम धर्माचे अनुयायी याचा असा अर्थ घेतात की, “आपल्या देवाचं सौंदर्य, महानता एवढी आहे की, त्याला एखाद्या चित्र किंवा मूर्तीत सामावण्याचा प्रयत्न करणं हा त्याचा अपमान असेल.” ही मान्यता कालांतराने एक नियम झाला ज्याला बदलण्याची हिंमत कोणीही केली नाही. इस्लाम धर्म प्रसारकांना सुद्धा अल्लाचं चित्र काढण्यास सक्त मनाई आहे हे विशेष आहे.
कुराणामधील एका अध्यायात असा देखील उल्लेख आहे की, “जे लोक मूर्ती किंवा फोटोची पूजा करतात ते त्यांच्याही नकळत धर्म विसरतात आणि केवळ त्या प्रतिमेच्या प्रेमात पडतात आणि चुकीच्या मार्गावर निघून जातात. धर्म, देव हे वेगळे आहेत आणि फोटो, मूर्ती हे वेगळं आहे हे समजण्याच्या पलीकडे ते निघून जातात.” कुराणमध्ये इब्राहिम यांनी आपल्या आई वडिलांना ही शिकवण देऊन त्यांना इस्लामच्या म्हणजेच देवरुपी शक्तीला कोणत्याही स्वरूपात कैद न करण्याच्या मार्गावर नेलं आणि हा धर्म उदयास आला.
मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आयुष्यावर, शिकवणीवर भाष्य करणारा ‘हादिथ’ हा ग्रंथ देखील लिहिण्यात आला होता. या ग्रंथामध्ये प्रेषित मोहम्मद यांच्यासोबतच त्यांच्या मित्राच्या आयुष्यावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला आहे.
‘हादिथ’ हा ग्रंथ स्पष्टपणे सांगतो की, कोणीही, कधीच अल्ला, मोहम्मद पैगंबर किंवा इतर प्रेषितांचं कधीच चित्रण करण्याचा प्रयत्न करू नये. कालांतराने, नियम लादण्यात आणि त्यांचं पालन करण्यास भाग पाडण्यास मुस्लिम धर्म सर्वाधिक प्रखर आहे हेच त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं.
मुस्लिम धर्मातील चित्रकार, मूर्तिकार यांच्यावर या नियमाचा असा परिणाम झाला की, त्यांची कला त्यांना नेहमीच कॅलिग्राफी, भूमिती, चेहरा नसलेल्या आकृती यांच्यापुरती मर्यादित ठेवावी लागली. पण, सक्ती इतकी आहे की, यावर कोणी उघडपणे भाष्य देखील करू शकत नाही.
आखाती देशांपैकी इराणने ही सक्ती शिथिल करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांना फारसं यश आलं नाही. मोंगोल आणि ऑटोमन यांच्या साम्राज्यात काही चित्र रेखाटण्यात आली होती ज्यामध्ये मोहम्मद पैगंबर यांचाच चेहरा असल्याचा दावा केला गेला होता. पण, इस्लाम धर्मगुरूंनी त्याला दुजोरा दिला नाही.
इंग्लंडमधील एडींबरा विद्यापीठात देखील अल्ला किंवा मोहम्मद पैगंबर यांच्या चित्रावर संशोधन केलं होतं. पण, त्यामधून निष्पन्न झालेल्या चित्रांबद्दल सांगतांना एडींबरा विद्यापीठाच्या प्रवक्त्या पोउलप मोना सिद्दीकी यांनी सावधपणे ही प्रतिक्रिया दिली आहे की, “हे चित्र केवळ प्रेम आणि आदराच्या भावनेतून रेखाटण्यात आली आहेत. या चित्रांची पूजा करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाहीये.”
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात देखील ‘मोहम्मद पैगंबर यांचं चित्र’ या विषयावर संशोधन करण्यात आलं होतं. इस्लामिक कला या विषयावर संशोधन करणाऱ्या ख्रिस्तीयन ग्रबर यांनी आपल्या संशोधनात हे सांगितलं आहे की, “ख्रिश्चन धर्मापेक्षा मुस्लिम धर्म कसा वेगळा आहे? हे दाखवण्यासाठी केवळ प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या चित्रीकरणावर बंदी आणण्यात आली आहे. युरोपियन लोक जेव्हा मुस्लिम राष्ट्रांमध्ये जाऊन रहायला लागले तेव्हा हा नियम अधिक कडक करण्यात आला.”
मुस्लिम धर्मात सर्वोच्च मान्यता असलेल्या मक्का मशिदीने देखील यावर भाष्य केलं आहे. इमाम कारी असीम यांनी आपलं मत मांडताना असं म्हंटलं आहे की, “मोहम्मद पैगंबर यांची जी चित्र उपलब्ध आहेत ती काल्पनिक आहेत आणि ते या कल्पनेतून रेखाटण्यात आले आहेत की, मोहम्मद पैगंबरांना मध्ययुगात अल्लाचं दर्शन झालं होतं.
या घटनेची कल्पना करून चित्रकारांनी हा प्रसंग केवळ रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रांमध्ये मोहम्मद पैगंबर दिसत आहेत की त्यांचे मित्र आहेत हे देखील स्पष्ट होत नसल्याने इस्लाम धर्माने या चित्रांना कधीच मान्यता दिली नाही आणि देणारही नाही. ”
सौदी अरेबिया येथील धर्मगुरू मोहम्मद इब्न अब्द अल वहाब यांनी यापुढे जाऊन असं सांगितलं आहे की, “अल्लाह हे एकमेव वैश्विक सत्य असल्याने इतर कोणत्याही प्रेषितांची आठवण काढणे, चित्र काढणे यांची कोणतीही आवश्यकता नाहीये.” ही विचारसरणी पुढे ‘वहाबी’ या नावाने प्रचलित झाली आणि कोणीही मोहम्मद पैगंबर यांचं चित्र काढण्याच्या वाटेला गेलं नाही.
—
- मुस्लिम धर्मीय व्यक्ती इतर कोणासाठी प्रार्थना करू शकते का? वाचा यामागचं खरं उत्तर
- वर्षानुवर्षे सुरु असलेला शिया विरुद्ध सुन्नी विवाद : इस्लाम धर्मातील पंथ
—
भारतीय कायदा याबाबत हे सांगतो की, कलम २९५ आणि २९८ हे कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जात असतील तर त्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम आहेत.
धर्मात मान्यता नसेल तर कोणीही धार्मिक भावनांचा अनादर करू नये. आपला कायदा हे सुद्धा सांगतो की, अशा कृत्यांचा समाचार घेण्याचा अधिकार केवळ कायद्याला आहे.
धार्मिक भावना दुखवल्याच्या नावाखाली दंगल सुरू करणे हा देखील कलम १५३ अन्वये गुन्हा आहे. पण, याकडे दंगलकर्ते सपशेलपणे दुर्लक्ष करतांना आढळून येतात.
२००५ मध्ये डेन्मार्क येथे, २०१५ मध्ये इराण मध्ये आणि २०२० मध्ये फ्लोरिडामध्ये मोहम्मद पैगंबरांचे चित्र काढण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. पण, ज्यांनीही हे प्रयत्न केले होते ते लोक आज जिवंत नाहीयेत असाच आपला इतिहास सांगतो. धार्मिक भावना जपाव्यात पण कायद्याला आपलं काम करू द्यावं असं सर्व धर्मांचा आदर करत आपण म्हणू शकतो.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.