' “२०४७ पर्यंत भारत इस्लामिक राष्ट्र होणार” – InMarathi

“२०४७ पर्यंत भारत इस्लामिक राष्ट्र होणार”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत देश हा सर्व धर्मांचा सन्मान करणारा देश म्हणून जगात ओळखला जातो. आखाती किंवा युरोपियन देशांप्रमाणे भारत देशाने कधीच आपलं पारडं एका धर्माकडे झुकवलं नाही असंच आपलं वर्तमान आणि इतिहास सांगतो.

हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध अशा सर्व धर्माचे लोक इथे एकत्र राहतात, काम करतात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक देतात. पण, विविध धर्मातील लोकांचं गुण्यागोविंदाने राहणं काही जणांना खुपतं. मग, ‘मिशन इस्लाम २०४७’ सारखे भारताला इस्लामिक देश बनवण्याचा कट रचले जातात.

पाटणा सारखं एखादं शहर निवडलं जातं आणि तिथे केरळ, झारखंड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील बेरोजगार तरुणांना एकत्र आणलं जातं. इतर धर्मीय लोक त्यांना किती त्रास देत आहेत हे सांगून भडकवलं जातं, त्यांना शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना अतिरेकी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं.

हिंदी सिनेमात अशा घटना बघतांना अतिशयोक्ती वाटते. पण, अशा घटना आजही भारतात घडतात आणि प्रत्यक्षात सुद्धा पोलीस असे मनसुबे उधळून लावतात हे बिहार मध्ये नुकतंच घडलं आहे.

 

Hindu Muslim Ekta Inmarathi

 

काय आहे हे मिशन इस्लाम २०४७ ? याची कुठे सुरुवात झाली ? भारताची शांतता भंग करण्यासाठी कोणते देश यासाठी मदत करत आहेत ? जाणून घेऊयात.

पॉप्युलर फ्रंट इंडिया (पीएफआय) या संघटनेने पटना येथील फुलवारी या भागात ‘मिशन इस्लाम २०४७’ चा कट तयार केला. हा कट रचणाऱ्या जलालूद्दीन आणि अथर परवेझ या दोघांचा बिहार पोलीस सध्या शोध घेत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जलालूद्दीन हा स्वतः आधी झारखंड पोलिस दलात ‘सब-इन्स्पेक्टर’ पदावर काम करायचा.

सेवानिवृत्त झाल्यावर त्याने पीएफआय सोबत काम करणं सुरू केलं आणि आज तो त्यांचा म्होरक्या झाला आहे. त्याच्या सोबत काम करणारे परवेझ आणि अरमान मलिक हे स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)चे कार्यकर्ते असल्याचं बिहार पोलिसांनी त्यांना अटक केल्यावर सांगितलं आहे.

तरुणांना अतिरेकी कारवायांचं प्रशिक्षण देण्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अख्तर परवेझचा भाऊ मंझर परवेझ हा सध्या पटना मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या आरोपावरून जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

 

pfi im 1

 

पटनाचे वरिष्ठ सुप्रीटेंडेंट ऑफ पोलीस ‘मानवजीत सिंग ढिल्लन’ हे सध्या मिशन इस्लाम २०४७ साठी काम करणाऱ्या पीएफआयच्या इतर लोकांवर नजर ठेवून आहेत. पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात बिहार पोलिसांनी त्यांची झेंडे, भारताला इस्लामिक देश बनवण्याचा मजकूर लिहिलेल्या कागदपत्रांना जप्त केलं आहे.

भारतीय गुप्तचर संघटनेकडून बिहार पोलिसांना ‘मिशन इस्लाम २०४७’ अंतर्गत बिहारमध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती मिळाली होती. पीएफआयच्या कार्यालयावर टाकलेली धाड ही ‘नॅशनल इन्व्हेस्टीगेशन अकॅडमी आणि अँटी टेररिझम स्क्वॅड या दोन संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घडवून आणली होती.

मिशन इस्लाम २०४७ साठी काम करणाऱ्या पाटणा जवळील दरभंगा, झारखंड, कर्नाटका आणि तामिळनाडू येथील मिळून एकूण २६ जणांवर प्रथम तपासणी अहवाल म्हणजेच ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे.

मानवजीत सिंग ढिल्लन यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलतांना दिलेल्या माहितीनुसार, ” मिशन इस्लाम २०४७ साठी पाकिस्तान आणि तुर्की या देशांमधून आर्थिक मदत होत असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अतिरेकी प्रशिक्षण देणाऱ्या आणि घेणाऱ्या सर्व तरुणांना लवकरच अटक करू. सर्व तरुणांची माहिती असलेलं एक रजिस्टर आमच्या हाती लागलं आहे. दहशतवादाचा हा नवीन अध्याय पाटणा येथून सुरू होत असल्याची जाणीव होत आहे.”

पाटणा पोलीस या घटनेनंतर अधिक सतर्क झाली आहे. जलालूद्दीन सारखे लोक जर पोलीस खात्यात इतकी वर्ष काम करूनही जर अतिरेकी संघटनेत सामील होऊ शकतात तर ही काळजीची बाब आहे असं बिहार पोलिसांचं मत आहे. अतिरेकी संघटनांना जर एखादा निवृत्त पोलीस अधिकारी प्रशिक्षण देत असेल तर ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे हे पोलिसांनी मान्य केलं आहे.

 

terrorist groups inmarathi

 

मिशन इस्लाम २०४७ मध्ये सामील झालेला प्रत्येक तरुण हा त्याचं प्रशिक्षण झाल्यावर मुस्लिम विरुद्ध इतर धर्मीय यांच्यात काही वाक्यांच्या माध्यमातून तेढ निर्माण करण्याच्या कामाला लागतो. तो अतिरेकी कॅम्पचं आयोजन करतो.

६ आणि ७ जुलै रोजी हा कॅम्प बिहार मधील फ़ुलवारी शरीफ इथे आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये अतिरेकी विचारसरणी असलेल्या तरुणांना मार्शल आर्ट्स, तलवारबाजीचं प्रशिक्षण देण्यात आलं. फ़ुलवारी शरिफ येथे झालेल्या अतिरेकी कॅम्पचं पूर्ण सीसीटीव्ही शूटिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे.

दोन धर्मांमध्ये कशी तेढ निर्माण करायची ? हे या मिशन मध्ये सामील झालेल्या धर्मांध तरुणांना शिकवलं जातं. शिवाय, भारत जर इस्लामिक देश म्हणून घोषित झाला तर त्यांचा खूप फायदा होईल असं त्यांना पटवून दिलं जातं. तुर्कीस्तान येथे राहणारे भारतीय तरुण त्यांना हत्यार खरेदी करण्यासाठी पैसे पाठवत असल्याचं प्राथमिक तपासणीतून समोर आलं आहे.

अथर परवेझ या व्यक्तीच्या नावावर असलेल्या बँक खात्यात तुर्कीस्तान येथून ८३ लाख रुपये जमा झाल्याचा ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला आणि या घटनांमधून धर्म, देशविरोधी कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू आहे याची बिहार पोलिसांना खात्री पटली.

 

keral police inmarathi

पाकड्यांची “इस्लामी कसम” धुडकावत भारतासाठी जीवाची आहुती देणारा “मोहम्मद”

ज्या नावावरून इतका गदारोळ सुरू आहे ते ‘औरंगाबाद’ नाव कसं पडलं ? वाचा!

मोहम्मद जलालूद्दीन हा या सर्व अतिरेकी कारवायांच्या मागे हात असल्याचं बिहार पोलिसांनी जाहीर केलं आहे. त्याच्या फ़ुलवारी शरीफ येथील घरात ‘मिशन इस्लाम २०४७’च्या बैठका व्हायच्या हे त्याने स्वतः मान्य केलं आहे. फ़ुलवारी शरीफ या गावाला दक्षिण भारतातून जाणाऱ्या १२ तरुणांवरच्या संशयामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आणि एक अनर्थ टळला असं सांगितलं जात आहे.

‘मिशन इस्लाम २०४७’हा अतिरेकी कट उधळून लावणाऱ्या बिहार पोलिसांचं सध्या देशभरातून कौतुक होत आहे. देशाच्या एकात्मतेस ठेच पोहोचवणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा असाच अंत होईल हे आपल्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?