Site icon InMarathi

“हा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे” : ह्या संदेशाची सुरुवात होण्यामागची कथा!

disclaimer inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

चित्रपट पहायला थिएटर मध्ये गेलात तर चित्रपटाची सुरुवात कोणत्या गोष्टीने होते असा प्रश्न विचारला तर काय उत्तर मिळेल.

काहीजण म्हणतील कलाकारांच्या नावाने, काहीजण म्हणतील की जाहिरातींनी…

मात्र याचं खरं उत्तर हवं असेल, तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.

जरा विचार करून बघा, चित्रपट कोणत्याही भाषेतला असो वा कोणत्याही शहरात प्रसिद्ध होणारा, सर्वप्रथम पडद्यावर कोणती अक्षरं उमटतात.

बॉलीवुड असो वा हॉलीवुड किंवा जगातील कोणत्याही देशाचा चित्रपट असो त्यात एक गोष्ट मात्र एकसारखी असते, ती म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीला देण्यात येणारी माहिती, ज्यामध्ये लिहिलेले असते की,

हा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे आणि त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

 

youtube.com

 

पण कधी विचार केलाय का प्रत्येक चित्रपटामध्ये सुरुवातील ही सूचना का दिली जाते? त्यामागे कारण काय आहे?

चला जाणून घेऊया.

रसपुतीन, हे नाव जगभरातील राजकीय लोकांच्या ओठी असते पण त्याच्या स्तुतीसाठी नाही, तर त्याने केलेल्या वाईट गोष्टींसाठी!

रशियाच्या शाही कुटुंबासाठी सल्लागार म्हणून कामकाज पाहणाऱ्या रसपुतीनचा जन्म १८६९ मध्ये झाला होता.

काही लोकांचा दावा आहे की त्याला संमोहनाची कला अवगत होती आणि त्याच जोरावर त्याने शाही कुटुंबाला आपल्या वश मध्ये केले होते.

 

memes.com

 

खरा खेळ तेव्हा सुरु झाला जेव्हा तो अध्यात्मिक गुरु बनला. रसपुतीनने स्वत:ला साधू म्हणून घोषित केले आणि तो कोणाचेही ऐकुन घेईनासा झाला. त्याला लोक वेडा भिक्षु म्हणत असतं.

काही काळानंतर त्याला वेडा म्हणून हिणवणारे हेच लोक त्याच्यावर देवासारखा विश्वास ठेवू लागले, कारण तो जी भविष्यवाणी करत असे ती खरी होत असे.

काहींना ही बाब चमत्कारीक वाटत असली, तरी त्याची अनेक उदाहरणं सापडली होती, असं सांगितलं जातं.

ही बातमी रशियाची राणी एलेक्जेंड्रा पर्यंत पोहोचली.

राणीच्या मुलाची तब्येत एका रोगामुळे खूप खराब  झाली होती आणि रसपुतीनने त्याला त्या रोगातून पूर्णपणे बरे केले.

मग काय, संपूर्ण शाही कुटुंबातील लोक त्याला मानू लागले. सर्वांना तो आवडू लागला, परंतु रसपुतीन बाहेरून जेवढा साधा वाटत होता, तसा तो बिलकुल नव्हता.

नेहमी तो शारिरिक सुखासाठी हपापलेला असायचा. असे म्हटले जाते की, त्याने आपल्या संमोहन शक्तीचा वापर करून राणी एलेक्जेंड्राशी सुद्धा त्याने शारीरिक संबंध ठेवले होते.

 

thelallantop.com

 

पण त्याच्या मार्गदर्शनाने राज्यकारभार करून सुद्धा रशिया प्रत्येक युद्धात पराभूत होत होता.

अखेर शाही कुटुंबाकडूच त्याची हत्या केली गेली.

आता तुम्ही विचार करत असाल की, या गोष्टीचा आणि चित्रपटामध्ये सुरुवातीला देण्यात येणाऱ्या सुचनेचा काय संबंध आहे?

तर – रसपुतीनच्या जीवनातील उलथापालथेने प्रेरित होऊन त्याच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची योजना MGM प्रोडक्शनतर्फे आखण्यात आली.

चित्रपट बनवला गेला आणि तो १९३३ मध्ये प्रदर्शित झाला.

पण या चित्रपटातून बदनामी होत असल्याचा दावा करून रशियाची तत्कालीन राणी आयरिन हिने चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात केस ठोकली.

चित्रपटामध्ये रसपुतीन हा राणी आयरीन हिच्यावर बलात्कार करत असल्याचा प्रसंग दाखवण्यात आला होता. याच प्रसंगावर राणी आयरीन हिने हरकत वर्तवली घेतली आणि चित्रपटाविरोधात कायद्याने दाद मागितली.

कोर्टाने देखील केस मान्य करून आपल निकाल दिला आणि बदनामी केल्याच्या आरोपांखाली MGM प्रोडक्शन हाउसला रग्गड दंड ठोठावला, तसेच चित्रपटावर देखील बंदी घालण्यात आली.

 

cin-eater.blogspot.in

 

या घटनेतून जगभरातील सर्वच फिल्म इंडस्ट्रीने चांगलीच शिकवण घेतली आणि प्रत्येक चित्रपटाच्या पूर्वी तो चित्रपट कल्पनिक असल्याची सूचना दाखवण्यात येऊ लागली, जेणेकरून कोणत्याही प्रकारे व्यावसायिक हानी होऊ नये.

याचेच फलित म्हणजे आज जे जे चित्रपट प्रदर्शित होतात, त्यांना अशा कोणत्याही प्रकारांना सामोरं जावं लागत नाही.

अर्थात त्यासाठी सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट गरजेचं असतंच, मात्र चित्रपट सुरु होण्यापुर्वीच डिस्क्लेमर लावण्यात आल्याने निर्मात्यांसह संपुर्ण टिमला असलेली भिती नाहिशी होते.

अनेकदा चित्रपटाची कथास त्यातील पात्रांची नावे, स्वभाव, परिस्थिती ही सामान्यांच्या आयुष्यात घडून गेलेली असते,

अशावेळी या कथेचा प्रेक्षकांच्या आयुष्याशी काहीही संबंध नाही, असा फलक दर्शविल्यानंतर कोणताही प्रेक्षक त्याबाबतची तक्रार करू शकत नाही.

अर्थात जे चित्रपट घटनांवर आधारित असतात, त्यांना तशी सुचना या डिस्क्लेमरमध्ये द्यावी लागते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version