आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आईच्या उदरातून कोणीही गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवत नाही हे अगदी खरे आहे. गरिबी, मजबुरी, एखाद्याला पाहून प्रभावित होणे किंवा स्वतःवर वर्चस्व गाजवणे यासारखे विचार माणसाला गुन्हेगारीच्या जगाकडे घेऊन जातात. हे असे अंधकारमय जग आहे ज्यात एकदा पाऊल टाकले की मागे फिरणे कठीण होते. त्याच वेळी, या जगात, मृत्यू सतत आपल्यामगे हात धुवून लागतो.
अबू सलेम याची घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याचे बाबा पेश्याने वकील होते आणि ते आजूबाजूच्या गावांमध्ये कामानिमित्त प्रवास करायचे. परंतु एकदा त्यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांना आपले जीव गमवावे लागले. अबू सलेम याला चार भाऊ आणि तीन बहिणी आहेत.
यानंतर त्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याच्या गावामध्ये पंक्चर दुरुस्ती चे दुकान उघडले, याबरोबरच तो मुंबईच्या मार्केटमध्ये बेल्ट आणि परफ्यूमसुद्धा विकायचा. यात पाहिजे तेवढे उत्पन्न होत नसल्याने, तो दिल्ली येथे कामासाठी गेला. दिल्ली मध्ये त्याने टैक्सी चालवण्याचे काम केले, परंतु इथेही त्याला अपेक्षेप्रमाणे पैसे मिळाले नाही.
यानंतर अबू सालेम हा मुंबई मध्ये आला, सुरूवातीला मुंबई मध्ये त्याने ब्रेड डिलीवरी बॉयचे काम केले. या व्यवसायात काम करत असतांना एके दिवशी तो त्याच्यासोबत काम करणाऱ्या मुलाला काही कारणानिमित्त बेदम मारतो आणि यामुळे त्याच्यावर पहिल्यांदा पुलिस कंप्लेंट होते.
अबू सालेमची अंडरवर्ल्ड मध्ये एंट्री :-
१९९० च्या दशकात अबू सालेमने मुंबईतील जोगेश्वरी येथील आराशा शॉपिंग मॉलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या मॉलमध्ये नेहमी अंडरवर्ल्डमधील लोकांचे येणे-जाणे सुरु राहायचे, सालेम या लोकांना पाहून खुप प्रभावित झाला होता.
सालेम देखील आता या अंडरवर्ल्ड मधील लोकांसारखे दादागिरी करण्याची आणि लवकरात लवकर श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहू लागला. काम संपल्यानंतर सलीम संध्याकाळी अंडरवर्ल्डच्या लोकांसोबत फिरू लागला.
या लोकांद्वारे त्याची ओळख दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ अनीस इब्राहिमशी झाली. यानंतर अनिस त्याला आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवतो.
यानंतर सालेम दाऊद हा इब्राहिमच्या टोळीतील लोकांसाठी बेकायदेशीर कामे पण करु लागला जसे की सोन्यांची तस्करी, अवैध शस्त्र आणि हत्यारे पोहोचवणे, ड्रग्स इत्यादी.
यानंतर ९० च्या दशकात मुंबई पोलीस वेगवेगळ्या चकमकीत अनेक डी कंपनीचे शूटर मारत होते, याचबरोबर इतर टोळ्यांचे शार्प शूटर्स देखील एकमेकांना मारत होते.
या कारणामुळे सालेम त्याच्या आझमगड गावातल्या बेरोजगार मुस्लिम मुलांना मुंबईमध्ये बोलावून घ्यायचा, कुणाला तरी म्हणजेच त्याच्या शत्रुंना मारायला लावायचा आणि काम झाल्यावर त्यांना परत त्यांच्या गावी पाठवून द्यायचा.
या लोकांचा गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्यामुळे ते मुंबई पोलिसांच्या हाती येत नसत. यामुळे डी कंपनीत सालेमचा दर्जा वाढू लागला आणि बॉलीवूडमधून धमकी देऊन हफ्ते गोळा करण्याचे काम सुरु केले. या कामामध्ये छोटा शकील याने सालेमला ट्रेन केले.
अबू सालेम हा सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे :-
अबू सालेमला १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील हत्या, गोळ्या-बंदुकांची तस्करी, गुलशन कुमारची हत्या, चित्रपट अभिनेत्री मनीषाच्या सेक्रेटरीवर गोळीबार करणे, मुंबईचे बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांची हत्या अशा ५० हून अधिक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. आणि यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
अबू सालेमचे प्रसिद्ध अपराध आणि त्यामागची पार्श्वभूमी जाणून घेऊयात.
१) बिल्डर प्रदीप जैन यांची हत्या :-
प्रदीप जैन हे अबू सालेमचा पहिल्या काही टार्गेटपैकी एक होते. प्रदीपच्या भावाला सालेमने डोंगरीची संपत्ती सोडण्याची धमकी दिली होती आणि जर जागा नाही सोडली तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण प्रदीपने सालेमची धमकी हलक्यात घेतली.
७ मार्च १९९५ रोजी सालेमचा शूटर सलीम बोन याने प्रदीपची त्याच्या कार्यालयामध्येचं गोळ्या झाडून हत्या केली. पण गोष्ट अजून इथेच संपलेली नाही, प्रदीपचा ज्यादिवशी तेरवी चा कार्यक्रम होता त्यादिवशी सालेम त्याच्या बायकोला फोनवर बोलतो की, प्रदीपने जर पैसे दिले असते तर ही परिस्थिती आली नसती. त्यामुळे प्रदीपच्या भावाला सांगा पैसे दे नाहीतर यावेळी सगळ्यांना मारून टाकेन’.
२) संगीतकार गुलशन कुमार हत्या प्रकरण :-
संगीतकार गुलशन कुमार यांना सालेमने पैसे मागितले होते. पण गुलशन कुमार यांनी उत्तर देताना सांगितले की, तुम्हाला पैसे देण्यापेक्षा मी वैष्णोदेवीचा भंडारा करणे उचित आहे.
यानंतर अबू सालेमने गुलशन कुमारला मारण्यासाठी आपल्या शूटर राजाला पाठवले आणि त्याला मारताना मोबाइल सुरू ठेवण्यास सांगितले, जेणेकरून त्याला गुलशन कुमारची पीडा ऐकू येईल.
—
- जेव्हा शाहरुखने अबू सालेमला ठणकावले, “मी कोणत्या फिल्म्स करायच्या हे शिकवू नकोस”
- “या घटने”नंतर टॉपची सुपरहिट संगीतकार जोडी कायमची तुटली…
—
३) चित्रपट स्टार मोनिका बेदी :
पंजाबमधून आलेली मोनिका बेदी मुंबईत नृत्य शिकत होती. नृत्य शिकत असतांनाच चित्रपटांमध्ये रस निर्माण झाल्याने तिला मुकेश दुग्गल यांच्या सुरक्षा या चित्रपटामध्ये काम मिळाले.
यानंतर दुबईत एका बॉलिवूड पार्टीत मोनिकाची सालेमशी भेट झाली आणि येथूनच त्यांच्यात प्रेम वाढत गेले. परंतु २००७ मध्ये यांचे हे प्रेमसंबंध कायमसाठी संपले.
परंतु अबू सालेम हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामागचे कारण म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात पोर्तुगालला दिलेल्या आश्वासनाचा सन्मान करणे आणि गँगस्टर अबू सालेमची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार बांधील आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, पोर्तुगालला दिलेल्या आश्वासनानुसार केंद्र सरकारला अबू सालेमची २५ वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्याची सुटका करावी लागेल. २००२ मध्ये भारताने पोर्तुगालला त्याच्या प्रत्यार्पणासाठी दिलेल्या आश्वासनानुसार त्याची शिक्षा २५ वर्षांपेक्षा जास्त असणार नाही, असे आश्वासन दिले होते.
यामुळे आता गँगस्टर अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याने, ऑक्टोबर २०३० नंतर त्यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.