Site icon InMarathi

भाजपचा विरोध पत्करून बाळासाहेब प्रतिभा पाटीलांच्या पाठीशी उभे राहिले होते

pratibha im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आधी राज्यसभा मग विधानपरिषद अशा निवडणुकांची रणधुमाळी संपत नाही तोवर राष्ट्रपती पदाची निडवणूक अगदी तोंडावर आली आहे. राष्ट्रपती पदासाठी NDA गटाकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र विरोधी गटात उमेदवार काही ठरत नव्हता. अगदी शरद पवारांपासून ते केरळचे राज्यपाल आरिफ मोह्हमद खान यांची नावं यादीत होती मात्र शेवटी मूळचे भाजपचे असलेले नंतर पक्ष सोडलेले यशवंत सिन्हा यांच्यावर शिक्कामोर्तब झालं.

केंद्रात ही गडबड सुरु होती तर महाराष्ट्रात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. आपण गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंप बघतच आहोत. शिंदे गट कसा तयार झाला ते अगदी त्यांच्या गटात कोण कोण सामील झाले हे आपण याची देही याची डोळा बघितलं आहे. कट्टर शिवसेनेत असलेले अनेकजण शिंदे गटात सामील होत आहेत.

 

 

आमदारांची ही अवस्था तर खासदारांमध्ये देखील खदखद होतीच, त्यातच उद्धव ठाकरेंनी घोषणा केली की ते द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार. भाजप प्रमाणे शिवसेना देखील धक्का तंत्राचा वापर करताना दिसून येत आहे. एरव्ही भाजपवर तोंड सुख घेणारे उद्धव ठाकरे अचानक भाजपला पाठिंबा देत आहेत यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरेंची रणनीती नेमकी काय आहे किंवा भाजपला शरण जाणार का ते कळेलच मात्र खुद्द बाळासाहेबांनी मागे UPA च्या उमेदवार असलेल्या प्रतिभा पाटीलांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी देखील भाजपमध्ये नाराजीचा सूर होता मात्र बाळासाहेब आपल्या मतावर ठाम होते.

 

 

नेमकं काय म्हणाले होते बाळासाहेब :

ही घटना २००७ सालातली आहे जेव्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी UPA सरकारकडून प्रतिभा पाटीलांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भैरवसिंग शेखावत हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते NDA गटाचा त्यांना पाठिंबा होता. महाराष्ट्रात तेव्हा भाजप शिवसेना यांच्यात युती होती. त्यामुळे भाजपला साहजिकच अपेक्षा होती की शिवसेना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार मात्र झालं उलटच.

 

बाळासाहेबांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा न देता त्यांनी प्रतिभा पाटीलांना पाठिंबा देणार अशी घोषणा केली. ते असं म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठी राष्ट्रपती नाही. आता मराठी महिलेला राष्ट्रपती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रतिभा ताई देशाच्या पहिल्या महाराष्ट्रीयन राष्ट्रपती आणि महिला राष्ट्रपती आहेत. पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मराठी स्त्रीला मिळतोय हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

उद्धव ठाकरेंनी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने आता महाविकास आघाडीत पुन्हा एकदा खदखद निर्माण झाली आहे. मात्र जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना याला नकार दिला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version