Site icon InMarathi

जेव्हा पवारांना डॉक्टरांनी सांगितलं, ”तुमच्याकडे फक्त ६ महिनेच आहेत”

sharad pawar 1 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शरद पवार…महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वपुर्ण नाव! कुणी म्हणतं किंगमेकर, तर कुणी म्हणतं चाणाक्य! अर्थात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रीय असलेल्या पवारांना तोड नाही हे मान्य करावंच लागतं.

आज वयाची ऐंशी पूर्ण केलेल्या पवारांचा सभा, दौऱ्यामधील दांडगा उत्साह तरुणांनाही लाजवतो. मात्र काही वर्षांपुर्वी पवारांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की ”तुमच्याकडे आता फक्त सहा महिन्यांचं आयुष्य उरलं आहे”. त्यावेळी पवारांची काय प्रतिक्रिया असेल? डॉक्टरांचं ते भाकीत खोटं ठरवणाऱ्या पवारांचं नेमकं गुपित काय? हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना?

तुमच्या मनातल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खुद्द शरद पवार यांनी दिली आहेत. एका कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील त्या खडतर दिवसांचा उलगडला केला.

 

 

२००४ साली शरद पवार यांना कॅन्सरचं निदान झालं. तोंडाच्या कॅन्सरची काही प्राथमिक लक्षणं लक्षात येताच त्यांनी तातडीने चाचण्या केल्या आणि मनातली भिती खरी ठरली.

रिपोर्ट्स येताच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु झाले. अत्यंत कठीण अशा उपचारांमध्ये शरद पवार जिद्दीने लढत होते. वेदना होत होत्या, संयम सुटत होता, मात्र तरिही रुग्णालयातूनही त्यांचं काम सुरु होतं.

अशातच एकदा डॉक्टरांची एक टिम त्यांची तपासणी करत होती, त्यातील एक नव्यानेच जॉईन झालेला तरुण डॉक्टर काळजीपूर्वक त्यांचे रिपोर्ट्स चाळत होता. त्यात शरद पवार त्याला थट्टेनं म्हणाले,” डॉक्टर, काय म्हणतीय माझी तब्बेत? मी कधीपर्यंत बरा होईन”.

पवारांच्या या प्रश्नावर डॉक्टर गांभिर्याने म्हणाले,”पवार साहेब, इतर वरिष्ठ डॉक्टर्स तुमच्याशी खोटं बोलतयात, तुम्हाला त्रास होवू नये यासाठी ते खरी परिस्थिती लपवत आहेत, मात्र मी असं करणार नाही. तुमची जी काही कामं अपूर्ण राहिली असतील ती पूर्ण करा, कारण तुमच्याकडे अवघं ६ महिन्यांचं आयुष्य शिल्लक आहे.”

 

 

खरंतर हा आघात झाल्यानंतर पवार खचणं अपेक्षित होतं, मात्र त्या परिस्थितीतही संयम ढळू न देता पवार हसत त्या डॉक्टरांना म्हणाले,”डॉक्टर साहेब तुम्ही काळजी करू नका, इच्छाशक्तीच्या बळावर मी इतक्यात काही जाणार नाही हे नक्की!”.

त्यावर थक्क झालेल्या डॉक्टरांकडे पहात पवार म्हणाले ”कोणतीही शंका मनात ठेवू नकोस, मी तुला पोहचवल्यावर जाईन”. पवारांनी केलेली ही थट्टा ऐकून त्या तरुुण डॉक्टरांनी काढता पाय घेतला.

२००४ साली पवारांना सहा महिन्यांची मुदत दिली असतानाच आज २०२२ सालापर्यंत पवार न थकता, उत्साहाने काम करत आहेत.

आधी मंत्रालय, मग रेडिएशन

कॅन्सरवरील उपचार सुरु असतानाच राजकारणातही पवार सक्रीय होते, कॅन्सर असला तरी सुट्टी न घेता त्यांचे महाराष्ट्र दौरे सुरु असायचे.

दिवसभर मंत्रालयात काम केल्यानंतर दुपारी ते रेडियशनसाठी हॉस्पिटलमध्ये जात.

 

 

तब्बल ३६ वेळा रेडिएशन सारखे कठीण उपचार त्यांना घ्यावं लागल्याचं त्यांनी भाषणात सांगितलं होतं.

हे व्यसन लागलं नसतं तर…

कॅन्सर हा अत्यंत कठीण आजार असून एखादं व्यसन, एखादी जूनी सवय मोडली तर त्याचा धोका टळतो असंही पवार म्हणतात.

४० वर्षापुर्वी सुपारी खाण्याचं व्यसन लागल्यानं कॅन्सरसारख्या रोगाशी झुंज द्यावी लागते, त्यामुळे त्यावेळीत कुणीतरी सावध केलं असतं, ही सवय मोडण्यास भाग पाजलं असतं तर आज कदाचित या रोगाशी दोन हात करावे लागले नसते असंही ते म्हणतात.

२००४ सालापासून पवार कॅन्सरसारख्या क्लिष्ट आणि वेदनादायी रोगाचा सामना करत आहेत, एकीकडे रोगाचं वाढत प्रमाण, दुसरीकडे वृद्धापकाळातील समस्या मात्र असं असूनही केवळ जिद्दीच्या बळावर ते आजही कार्यरत आहेत.

 

 

 

भर पावसात सभा घेणं असो वा राजकारणाची सुत्रं आपल्या हाती घेणं, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढणाऱ्या पवारांपुढे आजारानेही शरणागती पत्करली हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version