आरे कॉलनी घडवण्यात, समृद्ध होण्यामागे पंडित नेहरू आहेत…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आरे, आरे, आहारे आरे… ही जाहिरात तुम्ही सर्वांनी रेडियोवर ऐकली असेल आणि बर्याच चित्रपट किंवा सिरियल्स मध्ये तुम्ही आरे परिसर पाहिला असेल. आरे म्हणजे मुंबईची श्वासदायीनी आहे, पण गेल्या काही वर्षांपासून आरे वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे.
आरे येथे प्रस्तावित मेट्रोच्या कारशेडला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला होता. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच त्यांनी आरे येथील प्रस्तावित कारशेड कांजुरमार्ग येथे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र कांजुरची जागा वादात सापडली. त्यामुळे कारशेड नक्की कोठे होणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत होता, त्यातच मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसीएल) मेट्रोच्या चाचणीसाठी आरेजवळ मरोळ येथे तात्पुरत्या कारशेडची उभारणी सुरू आहे.
सरकारने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केल्याशिवाय आणि सामाजिक संस्थांशी चर्चेविना आरेमध्ये कोणतेही काम करू नये, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कांजुरमार्ग, बीकेसी अथवा कलिना येथील जागांचा कारशेडसाठी विचार करावा. तसेच त्यांचा डीपीआर द्यावा. त्यातच आता शिंदे सरकार आल्याने त्यांनी पुन्हा एकदा आरेमध्ये कारशेडला परवानगी दिली आहे.

आरे वसाहतीतील दुसऱ्या टप्प्याला लवकर जंगल घोषित करावे, मिठी नदीजवळ केलेले सिमेंट काँक्रिटीकरण काढून टाकावे, आरेतील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात येत आहे.
मुंबईचे फुफ्फुस म्हणवल्या जाणाऱ्या आरेच्या जंगलातील संकटाचा एवढा गदारोळ झाला, लोक रस्त्यावर आले आणि झाडांना चिकटून रडले. अशा आरे वसाहत आणि जंगलाची निर्मिती कशी झाली याचीही एक रंजक कहाणी आहे.
आरे कॉलोनी अस्तित्वात कशी आली?
१९५१ मध्ये पंडित नेहरूंनी मुंबईतील डेअरी उद्योगाला चालना देण्यासाठी आरे मिल्क कॉलनीची पायाभरणी केली होती. नेहरूंच्या वृक्षारोपणानंतर इतक्या लोकांनी येथे रोपे लावली की काही वर्षांतच या भागाचे जंगलात रूपांतर झाले.
मुंबईत दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी १९४९ मध्ये आरे मिल्क कॉलनी स्थापन करण्याची कल्पना मूळची दारा खुरोरी यांची होती, ज्यांना मुंबईतील डेअरी क्षेत्राचे प्रणेते मानले जाते. दारा यांना १९६३ मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आरे येथील संपूर्ण संपूर्ण वनक्षेत्र ३१६६ एकरांवर पसरलेले आहे.
साई, गुंडेगाव, फिल्मसिटी, रॉयल पाम्स, दिंडोशी, आरे, पहारी गोरेगाव, व्यारावल, कोंडिविता, मरोशी किंवा मरोळ, परजापूर आणि पासपोली या १२ गावांचा समावेश असलेल्या आरे मिल्क कॉलनीची व्याप्ती लक्षणीय आहे.

या सर्व परिसरांना एकत्र करून आरे मिल्क कॉलनीची संकल्पना मांडण्यात आली आणि १९७७ मध्ये या भागात चित्रपटांच्या शूटिंगसाठी २०० हेक्टर क्षेत्रात फिल्मसिटी सुरू करण्यात आली, जो मुंबईचा अतिशय प्रसिद्ध परिसर आहे.
नेहरूंनी केलेल्या वृक्षारोपणानंतर, वृक्षारोपणाच्या व्यापक मोहिमेमुळे जंगल बनलेली आरे कॉलनी काही वर्षांत सुंदर आणि हिरव्यागार जंगलात रूपांतरित होऊन मुंबईच्या हृदयाची धडकन बनली होती. त्याचे नैसर्गिक सौंदर्य मोहक होते आणि १९५८ मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांनी त्यांच्या मधुमती चित्रपटासाठी येथे शूट केलं.
खरं तर, बिमल दा यांनी या चित्रपटासाठी नैनितालमध्ये शूट केलं होत आणि जेव्हा त्यांना ते दृश्य जुळण्यासाठी शूटकरायचं होत तेव्हा त्यांनी आरेच्या जंगलात नैनितालची झलक पाहिली होती. आरे मिल्क कॉलनी हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मुंबईसाठी खूप महत्त्वाचे आहे.
बागा, पशुसंवर्धन, रोपवाटिका आणि तलाव आहेत. पिकनिक स्पॉट म्हणून छोटा काश्मीर नावाचे एक ठिकाण आहे, जे हिरवेगार आणि तलावाने वेढलेले आहे आणि पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण आहे. यासोबतच एक प्राणीसंग्रहालय आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानही आरेला लागून आहे.
कार शेड अंतर्गत होणार्या वृक्ष कटाईला विरोध करणारी निदर्शने मायानगरीतील रस्त्यावर सुरू आहेत, दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत झाडे तोडण्यावर तात्काळ बंदी घातली असून महाराष्ट्र सरकारला जाब विचारला आहे. आरे कॉलनीचा वाद बघितला तर तो बराच जुना आहे, मग तो जंगल परिसर असो की इको झोन, त्याचा इतिहासही तितकाच रंजक आहे.
मुंबई मेट्रो प्रकल्प :
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या अडचणी स्पष्ट होत आहेत, लाखो प्रवाशांचा बोजा वाहून नेणारी लोकल ट्रेनशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही. २०१४ मध्ये जेव्हा येथे पहिली मेट्रो आली तेव्हा लोकांना ती खूप आवडली होती, त्यानंतर तिच्या विस्ताराची चर्चा होती.
विस्तारादरम्यान, मेट्रो शेडची गरज असताना, आरे कॉलनीच्या जंगलाची कारशेड बनहण्यासाठी निवड करण्यात आली आणि तिथेच ठिणगी पडली. इतर ठिकाणी शेडसाठी जागा न मिळाल्यास आरेतील झाडांमध्येच शेड बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यावर मुंबईत हालचाली सुरू झाल्या, सर्वसामान्यांपासून ते राजकारणी आणि अभिनेत्यांपर्यंत सर्वांनी #SaveAarey मोहीम सुरू केली.
हे प्रकरण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी), मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पण आधी एनजीटीचीही परवानगी मिळाली आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही जंगल मानण्यास नकार दिला. महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळताच झाडे तोडण्याचे काम तातडीने सुरू केलं होत.
–
- भायखळा, विलेपार्ले, कुर्ला ही असली स्टेशनची नावं नेमकी आली कुठून?
- मुंबई ते ठाणे नव्हे, तर ‘या मार्गावर’ धावली आहे भारतातली पहिली रेल्वे!
–
एकूण २६०० झाडे तोडली जाणार होती, त्यापैकी २००० हून अधिक झाडे तोडण्यात आली. परंतु हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आतापर्यंत किती झाडे तोडण्यात आली याची नोंद घेऊन झाडे तोडणे तातडीने थांबवण्यास सांगितले. मात्र, मेट्रोसाठी त्यांना तोडावी लागणारी सर्व झाडे तोडण्यात आल्याचे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे.
हे सर्व सुरू असतानाच आरे येथील जंगलात होणार्या नशिल्या पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आदि गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याची दबक्या आवात चर्चा देखील सुरू झाली. तशी शंका ही व्यक्त केली जाऊ लागली, त्यामुळे आरे पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे.
मित्रांनो, जंगलाचीही एक स्वतंत्र दहबोली असते. ज्या दुग्ध क्रांतीसाठी आरे चा जन्म झाला ती डेअरी कधीच बंद झाली आहे. आता सुरू आहे तो जंगल हस्तगत करण्याचा आटापिटा. जंगल त्याचे उत्तर देईलच पण ज्यांना ही जंगलाची भाषा कळणार नाही त्यांना ती कळावी ही अपेक्षा पर्यावरणवादी करत आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.