OYO असो वा ताज – हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट्स असण्यामागे आहे “हे” विशिष्ट कारण…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मंडळी…आपण सर्वजण कधी ना कधी मोठ्या हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये मुक्कामासाठी जातो. हॉटेलमधील छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्या हॉटेलबद्दल खूप काही सांगून जातात.
हॉटेलच्या रूममधील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हॉटेलमधील सुयोग्य व्यवस्थापनाची अनुभूती देते, तर रूम सर्व्हिस हे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे काम दाखवते.
जर बारीक निरीक्षण केलं, तर तुमच्या लक्षात आलं असेल, की बहुतेक तुम्ही मुक्कामी असलेल्या हॉटेल्समधील खोल्यांच्या बेडशीट्स पांढऱ्या रंगाच्याच असतात. आता हे का? ते जाणून घ्यायचं असेल तर हा लेख पूर्ण वाचा….
पांढरा रंग म्हणजे स्टँडर्ड!
हॉटेल्ससाठी त्यांचे स्वच्छतेचे स्टँडर्ड सिद्ध करण्याचा पांढरा रंग हा एक प्रभावी मार्ग आहे. ज्याप्रमाणे श्रीमंत लोक स्वच्छ दिसण्यासाठी पांढरे कपडे घालतात, ज्यापद्धतीने नेते पांढरे शुभ्र आणि स्वच्छ कपडे घालून ‘व्हाईट कॉलर’चा कित्ता मिरवतात, तसेच हॉटेल्स लक्झरी दाखवण्यासाठी सर्व पांढरे कपडे वापरतात.
खरंतर १९९० च्या दशकात हॉटेल्ससाठी पांढऱ्या कपड्यांचे कपडे वापरण्याच्या ट्रेंड लोकप्रिय करण्याचे श्रेय वेस्टिनला जाते.
एका ब्रँडच्या डिझाईनच्या तज्ज्ञांच्या मते, पांढऱ्या चादरीचा बेड फस्ट इम्प्रेशन पाडण्यासाठी बेस्ट असतो आणि अतिथींना त्यांच्या खोलीचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे असे वाटते.
पांढरे बेडशीट वापरण्यामागचे ‘असेही’ गुपित!
पांढर्या बेडशीटची ज्याप्रमाणे आपण स्टँडर्ड असलेली बाजू बघितली त्याचप्रमाणे आणखी एक गुपित आहे.
हॉटेल्सच्या व्यवसायातील एक अतिशय व्यावहारिक बाजू म्हणजे तिथे आपल्या घरातल्या सारख्या एक किंवा दोन रूमच्या बेडशीट नसतात तर कमीत कमी दहा-पंधरा खोल्यांच्या बेडशीट एकत्र धुतल्या जातात, त्यामुळे साहाजिकच काहीतरी शक्कल लढवली जाणार.
या सर्व बेडशीट एकत्रचं धुतल्या जातात आणि विविधरंगी रंगाच्या बेडशीट असतील तर कपड्यांचा रंग लागणे, पसरणे, रंग जाणे या गोष्टी घडू शकतात.
या सर्वांवर नामी उपाय म्हणजे एकाच रंगाच्या आणि त्यातल्या त्यात पांढऱ्या रंगाचे कापड असेल तर एकत्र धुणे ही होईल अन रंगाची कटकटही कमी होईल.
सर्व-पांढऱ्या रंगाची थीम बाथरूममध्ये म्हणजे टॉवेल आणि बाथरोबसाठीही नेली जाते. हॉटेलचे कर्मचारी जेव्हा वॉशिंग करतात, तेव्हा ते बेड लिनन्स, टॉवेल आणि इतर कोणतेही घाणेरडे कपडे त्याच वॉशिंग मशिनमध्ये फेकून देऊ शकतात कोणत्याही रंगाची काळजी न करता. पांढरी चादर ब्लीच करणे खूप सोपे असते, त्यामुळे या रंगाला प्राधान्य दिलं जातं .
फक्त बेडशीट्सच नाही… पडदे आणि टॉवेलही ‘व्हाईट’!
आता विषय जरी बेडशीट्सचा असला तरीही तुम्ही जर नीट पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की हॉटेल रूम्सच्या बेडशीट्स सोबत टॉवेल आणि पडदेही पांढरे असतात. त्याला ही बेडशीट्सचेच सर्व उपाय लागू तर होतातच, मात्र आणखी एक गोष्ट पडद्याबाबतची म्हणजे पडदे हे विशेष करून भिंतींच्या रंगाला मॅच करून लावले जातात.
आता भिंतीचा रंग कोणता? त्याला मॅच होणारा पडद्याचा रंग कोणता? हे सर्व बघत बसण्यापेक्षा ‘पांढरा’ हा सर्वसमावेशक रंगाचा पडदा लावल्यास ‘कार्यक्रम करेक्ट’ होतो!
—
- लक्षात येत नाही, पण हॉटेलमध्ये चालू असणारी गाणी तुमचे खिसे रिकामे करण्याची भन्नाट युक्ती आहे
- हॉटेल धंद्याच्या ५ ट्रिक्स समजून घेतल्यात, तर बाहेर खायला गेल्यावर तुमचे खूप पैसे वाचतील
—
मंडळी, प्रत्येक व्यवसायाच्या ज्याप्रमाणे ग्राहकांसाठी उपयुक्त अश्या बाबी असतात, त्याचप्रमाणे त्या व्यवसाय चालवणाऱ्या लोकांसाठीही सोयीच्या गोष्टी बघितल्या जातात. मग सुवर्णमध्य साधून ‘ग्राहकांची आवड अन कर्मचाऱ्यांना काम ही कमी’ असे बघून काही निर्णय घेतले जातात अगदी तसाच हा पांढऱ्या बेडशीट्सचा विषय!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.