' संभाजीनगरची “सिटी ऑफ गेट्स” ही ओळख होण्यामागे या ७ दरवाज्यांचा मोठा इतिहास आहे – InMarathi

संभाजीनगरची “सिटी ऑफ गेट्स” ही ओळख होण्यामागे या ७ दरवाज्यांचा मोठा इतिहास आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

औरंगाबाद हे शहर आता संभाजीनगर या नावाने ओळखले जाईल. यापूर्वी आपण एकदा औरंगाबादची खासियत असलेल्या हिमरू शालींची माहिती इथेच वाचली आहे, पण त्याच बरोबर या गावाला ‘सिटी ऑफ गेट्स’ म्हणजे दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते हे तुम्हाला माहीत आहे का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

प्रत्येक शहराचा आपला असा एक इतिहास असतो. आपली अशी एक कहाणी असते, आपलं असं एक वैशिष्ट्य असतं. काही शहरे खूप जुनी असतात. शाही असतात. त्यांचा एक वेगळा थाट असतो.

असंच एक ऐतिहासिक आणि शानदार शहर म्हणजे औरंगाबाद. हे महाराष्ट्रातील अतिशय प्राचीन शहर. या नगराची रचना करायचं काम मलिक अंबर या निजामशहाच्या अतिशय शूरवीर सेनापतीने केले.

१६१० साली या शहराची निर्मिती झाली. तेव्हा काही या गावाचं नांव औरंगाबाद नव्हतं. त्याने या गावाचं नांव ठेवलं होतं खिडकी. मलिक अंबरच्या कालावधीत त्याने एकूण कलाकारीला खूप प्रोत्साहन दिले. आपल्या कार्यकालात त्याने खूप मशिदी, महाल बांधले, पाणीपुरवठा व्हावा म्हणून कालवे बांधले.

मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने या खिडकी गावाचे नांव बदलून फत्तेपूर असे ठेवले. नंतर जेव्हा हे शहर औरंगजेबाच्या अखत्यारीत आले तेव्हा याचे नामकरण झाले औरंगाबाद.

 

aurangabad inmarathi

 

आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध औरंगजेबाने इथेच घालवला. त्याची पत्नी, राबिया दुरानीची कबर इथेच आहे.त्याला बीबी का मकबरा असं म्हटलं जातं. तो अगदी ताजमहालासारखा बांधला आहे म्हणूनच त्याला पश्चिमेतील ताजमहाल असही म्हटलं जातं.

या औरंगाबादच्या वैशिष्ट्यासोबत अजून एक वेगळेपण आहे या शहराला असलेले दरवाजे. एकूण ५२ दरवाजे असल्यामुळे या गावाला ‘सिटी ऑफ गेट’ असंही म्हणतात. एवढे दरवाजे कशासाठी बांधले असतील?

त्यावेळी मराठ्यांनी मुघलांना विशेषतः औरंगजेबाच्या फौजेला सळो की पळो करून सोडले होते. शिवरायांच्या नंतर मराठी स्वराज्याचे छत्रपती संभाजी राजांची निर्घृण हत्या औरंगजेबाने केली. त्यामुळे मराठे त्याच्यावर चिडून होतेच. तो जिथे सापडेल तिथे लूट, नासधूस करून त्यांनी त्याला जेरीला आणले होते.

त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणून औरंगाबाद या शहराभोवती भव्य तटबंदी बांधली. आणि त्या तटबंदीमध्ये लहान मोठे ५२ दरवाजे केले. आज या दरवाजांची माहिती पाहूया.

१) भदकल गेट-

 

bhadkal gate im

 

या दरवाज्याचे दुसरे नांव विजयद्वार. हे गेट स्वत: मलिक अंबरने १६१२ साली मुघलांवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून उभारले.

२) दिल्ली गेट-

हे पण ऐतिहासिक गेट आहे. याचे नांव दिल्ली गेट असायचे कारण म्हणजे दिल्लीमधील लाल किल्ल्याचे लाहोर गेटसारखेच हे गेट दिसते. शहराच्या उत्तरेस हे गेट आहे. हे गेट औरंगजेबाने बनवले.

३) पैठण गेट-

 

paithan gate im

 

शहराच्या दक्षिणेला असलेले हे गेट पैठण गेट म्हणून ओळखले जाते. याचा आकार थोडा लहान आहे.

४) मक्का / मकाई गेट-

हे शहराच्या पश्चिम दिशेला असलेले गेट. या एकमेव गेटवर तोफ लावलेली आहे. याला मक्का गेट म्हणायचे कारण म्हणजे या गेटचे तोंड मक्केच्या दिशेला आहे.

५) रोशन गेट-

या गेटचे नांव औरंगजेबाची बहीण रोशन आरा हिच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. रोशन आरा या बहिणीसोबत औरंगजेबाचे विशेष सख्य होते. ती त्याची केवळ बहीणच नव्हती तर त्याची मैत्रीण, सल्लागार सुद्धा होती.

६) रंगीन दरवाजा-

 

rangeen darwaja im

 

हे गेट पण औरंगजेबानेच बांधले. हा अतिशय आकर्षक दरवाजा आहे. म्हणूनच याचे नांव रंगीन दरवाजा असे ठेवले.

७) काळा दरवाजा-

या दाराने आपण किला-ए-अर्क कडे जाऊ शकतो. या किल्ल्याकडे जाण्यासाठी या काळा दरवाजा सोडून अजून पाच दरवाजे होते. पण आता काळाच्या ओघात त्यांचीही पडझड झाली आहे.

याशिवाय औरंगाबाद मधील अजूनही कांही दरवाजे आहेत ज्यांच्या बद्दल आता विशेष माहिती उपलब्ध नाही. ते दरवाजे आता फक्त फोटोमधूनच समजून घेता येतील. यातील काही छोटे मोठे दरवाजे आहेत त्यांची नांवेच फक्त घेतली जातात. जसे बेगम दरवाजा, खूनी दरवाजा, इस्लाम दरवाजा, मीर आदिल दरवाजा, छोटा भदकल दरवाजा, बारापुला गेट, महमूद गेट, जफ्फर गेट, नौबत गेट वगैरे.

काळाच्या ओघात बरेच दरवाजे त्यांच्या नावानिशी नामशेष झाले आहेत. पण तरीही अजूनही काही दरवाजांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहेच आणि इतिहासाच्या पाउलखुणादेखील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?