' लक्षात येत नाही, पण हॉटेलमध्ये चालू असणारी गाणी तुमचे खिसे रिकामे करण्याची भन्नाट युक्ती आहे – InMarathi

लक्षात येत नाही, पण हॉटेलमध्ये चालू असणारी गाणी तुमचे खिसे रिकामे करण्याची भन्नाट युक्ती आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो, आपण हॉटेलमध्ये जेवायला का जातो? तर आपल्या सध्याच्या धावपळीच्या जीवनातून काही विसाव्याचे क्षण आपल्याला मिळावेत, आपल्या कुटुंबिय, मित्र-मैत्रिणींसोबत काही वेळ घालवता यावा यासाठी, हो ना?

अशावेळी आपण आपल्या खिशाचा किंवा बजेटचाही विचार बाजूला ठेवतो आणि हॉटेलमधील वातावरण किंवा बसण्याची जागा, खाद्यपदार्थांची चव अशा गोष्टी पाहतो. यात आणखी एक गोष्ट समाविष्ट असते, ती म्हणजे हॉटेलमध्ये वाजणारे पार्श्व-संगीत!

हो, अगदी बरोबर. हॉटेल सुविधेमध्ये असलेली पार्श्वसंगीत ऐकण्याची सोय ही ग्राहकाच्या आनंदासाठी असली तरी आपल्या हे लक्षात ही येत नाही की हॉटेलमध्ये चालू असणारी गाणी ही आपले खिसे रिकामे केली जाण्याची एक भन्नाट युक्ती आहे. कशी? चला पाहूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सांगीतिक वातावरण निर्माण करते :

आपल्या आवडीच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना जर सोबत मंद आवाजातले संगीत सुरू असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या खाण्याच्या टेबलवर वेळ घालवता आणि अधिकाधिक खाद्य-पदार्थांचा आस्वाद घेता.

शांत आणि मंद संगीत आपल्याला रीलॅक्स कररात असल्याने आपला टेबल टाइम निश्चितच वाढतो.

शास्त्रीय संगीताचा प्रभाव :

उत्तम प्रतीचे शास्त्रीय संगीत, गझल किंवा गीते जेवणाचा उत्तम अनुभव देतात आणि असेही आढळून आले आहे, की अशा प्रकारचे संगीत जेवणाच्या चवीवर देखील परिणाम करते आणि जर जेवणाची चव छान असेल, तर अर्थातच आपण त्याचा जास्तीत जास्त आस्वाद घेतो.

जलद गतीचे किंवा उडत्या चालीचे संगीत :

 

hotel im feature

 

असे निरीक्षण आहे, की संगीत मंद गतीचे असेल तर ग्राहकाचा टेबल टाइम वाढतो आणि जर ते जलद गतीचे असेल तर ते ग्राहकाच्या खाण्याचा उत्साह वाढवते. अशावेळी ग्राहक खाण्यावर जास्त पैसे खर्च करण्यास तयार असतो.

उच्च आवाजातील संगीत :

पंजाबी म्युझिक बिट्ससारखे संगीत वेगवान असते जे आपला खिसा अजूनच हलका करू शकते. कारण अशा प्रकारचे संगीत आपल्या जेवणाची क्वांटिटी वाढवते आणि आपण त्या संगीताच्या तालानुसार जलद गतीने खातो, पितो.

पॉप, रॅप, म्युझिक किंवा डांस बिट्स :

मित्रमैत्रिणी सोबत असतील आणि जर सोबत पॉप, रॅप अशा पद्धतीचे संगीत असेल तर क्या केहेने? मग तर पहायलाच नको. आपण हॉटेलमध्ये जास्तीत जास्त काळ रेंगाळतो आणि जास्तीत जास्त खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतो.

 

pub im

 

बार म्युझिक :

मंद गतीच्या संगीतासोबत आपण मद्याचा जास्तीत जास्त आस्वाद घेतो. त्यामुळे अशाठिकाणी मुद्दाम मंद संगीत लावले जाते, जेणेकरून अधिक प्रमाणात मद्य घेण्याकडे आपला कल वाढावा.

सुसंवादासाठी संगीत :

आपण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना जर एखाद्याशी संवाद साधत असू आणि त्याजागी सोबतीला जर मंद-मधुर संगीत असेल तर आपल्याकडून तो संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातो आणि आपला टेबल टाइम वाढतो.

तेव्हा मित्रांनो, आपल्याला आकर्षित करण्यासाठी आणि आपला खिसा मोकळा करण्यासाठी हॉटेलवाल्यांकडून ज्या युक्त्या वापरल्या जातात, त्यात हे असे वेगवेगळे संगीत वापरुन आपला खिसा मोकळा करण्याची हॉटेलवाल्यांची ही युक्ती आपल्यासाठी खर्चीक असली तरी भन्नाट आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?