आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चक्रव्यूह हा शब्द साधारणपणे आपण कोणत्यातरी संकटात अडकल्यावर वापरतो, असं एक संकट ज्यातून बाहेर पडण्याचा मार्गच आपल्याला दिसत नसतो. त्याच त्याच ठिकाणी आपण घुटमळत राहतो, महाभारताही अशाच एका चक्रव्यूहात अभिमन्यू अडकला होता, चारही बाजूनी सैन्य आणि ‘यातून बाहेर कसं पडायचं’ या पेचप्रसंगात पांडवांना अडकवण्याचा कौरवांचा मानस होता.
असं म्हटलं जातं, की सैनिकांचे वेगवेगळ्या रचनेचे व्यूह महाभारतात रचले गेले होते. यातीलच एक रचना चक्राची होती. चक्रव्यूह रचनेअबबद्दल आपण बऱ्याच पुस्तकांमधून, कथा- कादंबऱ्यांमधून ऐकलेलं, वाचलेलं असतं, पण प्रत्यक्षात ही रचना कशी केली गेली असेल हे या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया
महाभारतातले चक्रव्यूह नेमके काय होते? हा प्रश्न सध्या quora वर खूप व्हायरल होतोय. याच प्रश्नाची काही सविस्तर आणि मुद्देसूद उत्तरं आजच्या लेखातून आपण जाणून घेऊया!
आशीष माळी यांचं उत्तर प्रथम आपण जाणून घेऊया :
चक्रव्यूह जमिनी वर उभे राहून पहिला तर दिसत नाही दिसत नाही म्हणजे अंदाज येत नाही कारण फक्त समोर सैनिकांचे स्तर (layer)दिसणार ,
चक्रव्यूह मध्ये सात थर होते,
- सातवा स्तर (म्हणजे सर्वात आतील) हा नेहमी सर्वात मजबूत सैनिकांचा असतो .
- सहावा वा स्तर (म्हणाजे सर्वात आतील दोन नंबरचा स्तर) हा 7 व्या स्तरामधील सैनिकापेक्षा कमी मजबूत सैनिकांचा असतो पण 5 व्या स्तरामधील सैनिकापेक्षा मजबूत असतो.
- पाचवा स्तर हा 6 व्या स्तर च्या सैनिकापेक्षा कमजोर पण ४ थ्या स्तर मधील सैनिक पेक्षा मजबूत .
अशा प्रकारे आतील थराचे सैनिक बाहेरच्या स्तरावरील सैनिकांपेक्षा मजबूत होते. सर्वात उत्तम योद्धे चक्रव्यूह मध्यभागी तर उतरत्या क्रमाने सर्वात सामान्य योद्धे बाहेरच्या वर्तूळात अशी योजना असते.
चक्रव्यूहच्या बाहेरील च्या बाहेरील थराला पायदळां आतील थर मध्ये रथ आणि हत्ती घोडदळांनी बनवले. प्रत्येक स्तरामधील तोंडावर मात्र चांगले शूरवीर आणि सैनिक ठेवतात.
चक्रव्यूह मध्ये सैनिक आणि योद्धे सतत चालत असते, त्यामुळे एक थर CLOCKWISE आणि एक थर ANTICLOCKWISE असे फिरणारी सैनिकांची सात थरे आहेत आणि ते इतक्या वेगाने फिरतात की शत्रू पूर्णपणे हरवून आणि गोंधळून जातो
सातवा स्तर डाव्या बाजूला सतत चालत असेल तर सहावा स्तर उजव्या बाजूला सतत चालत असेल , पाचवा डाव्या बाजूला चालत असेल तर चौथा उजव्या बाजूला चालत असेल असे सातही स्तर परस्पर विरोधी बाजूने फिरत असतात.
चक्रव्युहात रचना साधारणतः कांद्याच्या पाकळ्यांसारखी एकात एक अशी असते.आकाशातून बघितले असता,याची रचना एखाद्या ‘ सात पाकळ्याचे फूल /या प्रमाणे दिसते.
चक्रव्यूहच्या मध्यभागी, आक्रमण करणार्या योद्धाला ठार मारण्याच्या प्रतीक्षेत असलेले सर्वोत्तम योद्धा आहेत. त्यावेळी द्रोणाचार्य, कर्ण ,दुर्योधन दुशासन , भृगूंश्रवा इत्यादी होते . प्रत्येक थरात सुरुवातीला म्हणजे तोंडावर नेहमी एक अत्यंत कुशल योद्धा आणि त्याला रक्षण करणारे सैन्या असतातबाह्य बाहेरील थरांमधील सैनिकांची योद्धा प्रवेश हेच काम करायचे .
चक्रव्यूह मधील सैनिक आणि योद्धे सतत चालत असते
म्हणजे खालील चित्राप्रमाणे काळ ठिबकचा सैनिक नेहमी नेहमी डाव्या बाजूला फिरतो यामुळे साखळी क्रिया निर्माण होते जेथे समान थरातील प्रत्येक सैनिक पुढच्या सैनिकांनी रिक्त केलेले स्थान घेण्यासाठी डावीकडे पाऊल टाकते.पुढच्या रिंगमधील सैनिक त्याच्या दिशेने (उजवीकडील) साखळी प्रतिक्रिया चालू राहण्यासाठी करण्यासाठी पुढच्या दिशेने एक पाऊल उचलते .जेथे प्रत्येक सैनिक पुढच्या सैनिकाद्वारे रिक्त केलेली जागा भरण्यासाठी उजवीकडे सरकतो.
समजा शत्रू कडून एखादा सैनिक मारला गेला तर ती जागा त्याच्या उजव्या बाजूचा सैनीक तात्काळ भरून काढतो आणि संपूर्ण चक्र एका विशिष्ठ लयीत फिरते. त्यामुळे कितीही शत्रू कितीही चांगला योद्धा असला तरी त्याच्या समोर प्रत्येक वेळेला एक ताज्या दमाचा नवा योद्धा युद्धास सज्ज असतोच.
सतत लढल्याने या शत्रुयोद्ध्याची शक्ती क्षीण होत जाते आणि चक्रव्यूहातील एका पेक्षा एक सरस ताज्या दमाचे योद्धे पुर्ण सामर्थ्यानिशी त्याच्याशी लढण्यास सज्ज असतात.
त्याचवेळेस या चक्राकार सैन्याच्या वैशिष्ठयपूर्ण हालचाली मुळे संपूर्ण चक्र असे काही फिरते की शत्रू आपसूकच चक्रव्यूहाच्या तिसर्या वर्तुळात येऊन पोहचतो आणि परतीचा मार्गही बंद होतो. चक्राकार रचना एक भ्रम उत्पन्न करते आणि शत्रू अलगद जाळ्यात अडकतो.
उर्वरित थराच्या तुलनेत चक्रव्यूह तोंडाजवळ सैनिक नेहमीच मजबूत आणि अधिक कुशल असतात. तर, तोंडातून शिरल्यास योद्धा मारला जाण्याची शक्यता असते.जर “आत जाणाऱ्या योद्ध्याने त्याने प्रवेश केला तर त्या थराचे आत गेल्यावर तोंड बंद होते.
तोंड बंद झाल्यावर वर्तुळाकार फिरत असणाऱ्या सैनिकामुळे तो आणखी कुशल योद्धा ना तोंड तेस मध्यभागी असलेल्या सर्वात श्रेष्ठ युद्धापुढे येऊन पोचतो . त्यासाठी त्याला सात थरा वरच्या सर्व कुशल आणि अकुशल सैनिकांशी सामना करावा लागेल. शेवटी पोचतो पर्यंत तो खूप दमलेला असेल तो गोष्ट वेगळी .
आता समजा की, चक्रव्यूह भेदांच्या योद्ध्याने ठरवले कि आत मध्ये जायचे नाही तर वर्तुळाकार फिरणाऱ्या थरातून सतत फिरणारे सैन्यामधून तो अडकून जाईल की शेवटी त्या योद्ध्याला काळात नाही कि नक्की तो कुठे आहे. पण बहुतेक वेळा असं होत कि मध्यभागी पर्यंत पोचण्या अगोदर योद्धा मरण पावतो .
जर समजा एखाद्याने एक थर पूर्णपणे तोडला तर तो GAP किंवा अंतर लगेच भरून काढायला सैनिक असतात आणि आतल्या थरातील सैनिक हे बाहेरच्या थरातील सैनिकांपेक्षा अधिक कुशल आणि शूर असतात . जर तो ससतत असेच थर तोसात आत गेला तर सर्व सैनिकांना तोंड देत आत पर्यंत जाऊ पर्यंत तो अतिशय दमलेला असतो.
हा चक्रव्यूह तोडण्यासाठी, जास्तीत जास्त सैनिकांना ठार करणे शक्य होईल जेणेकरून थरांमधील अंतर वाढेल करावे लागेल. अर्जुनात सांगितले होते कि थर मध्ये प्रवेश करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य जागा आहे आणि तसे करण्यासाठी योग्य मार्ग आहे. शत्रुंमधील कमजोर कडी /किंवा योद्धे पाहून हल्ले करावे लागेल
आता चक्रव्यूह मधून बाहेर पडणे अवघड का आहे? जेव्हा तुम्ही मध्यवर्ती भागात पोचतात . तेंव्हा बाहेरचे सर्व थरांमधील सैनिकांचे आणि योद्ध्यांचे तोंड आतल्या बाजूला झालेले असते. आता येण्यासाठी जेवढी मेहनत घेतली असते तेवढीच मेहनत जास्त बाहेर येणासाठी घेतली असते. बाहेर पडताना त्या योद्ध्याला सर्वात आतला थर तोडण्याची आवश्यकता असते, आतील थरात सर्वात मजबूत योद्धा असतात.
—
- महाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दु:शासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’!
- महाभारतातले हे ५ अज्ञात प्रसंग आपल्याला ‘मानवी मूल्यांची’ शिकवण देतात!
—
याहून आणखीन एक वेगळं पण इंट्रेस्टिंग उत्तर चेतन कुमार यांनी दिले आहे :
महाभारत एक काल्पनिक कथा आहे , त्यातील चक्रव्युह लहान मुलांच्या खेळण्याप्रमाणे दाखवले आहे. ज्यात काचेची एक सपाट डबी असते त्यात चार गोळ्या असतात ज्या मधल्या भागात पोहोचवायच्या असतात. खरे चक्रव्यूह हे शत्रुला मारण्यासाठी नसुन प्रबळ शत्रुपासून मुख्य राजाचे अथवा अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी असते. यात सैन्याची अनेक स्तरांमध्ये गोलाकार रचना केली जाते , जेणेकरून शत्रु हे कडे तोडून आतपर्यंत मारा करू शकणार नाही.
सैनिकांच्या गोलाकार स्तर रचनेमुळे कोणत्याही बाजूने हल्ला झाला तर सर्वच बाजूला समान सैन्य संख्या असल्यामुळे प्रतिउत्तर देताना किंवा रक्षण करताना रचना बदलावी लागत नाही . महाभारतातील चक्रव्युहातील सैन्य देवीच्या पालखीप्रमाणे गोल गोल फिरत असलेले दाखवले आहे. पण प्रत्यक्षात हे अंतर काही किलोमीटरमध्ये असते, तेव्हा असे फिरून उगाच शक्तीक्षय सैन्य करत नाहीत.
खऱ्या चक्रव्यूहात सैन्य आपल्या जागी डटून राहातात, मेला तरच आपली जागा सोडतो. कारण आतील राजाचे, अधिकाऱ्यांचे रक्षण करणे ही खरी जबाबदारी असते. चक्रव्युहाची रचना जर युद्धक्षेत्र विस्तीर्ण आणि सैन्यसंख्या जास्त असेल तरच केली जाते.
खासकरून जे राजे लोक प्रत्यक्ष रणांगणात जाऊन लढण्यापेक्षा लढाई पाहात बसत हेच लोक चक्रव्यूह रचना करीत आणि दुरून लढाई पाहण्याचा आनंद घेत.
दूर अंतराचा मारा करणारे बाण हे चक्रव्यूहातील मुख्य व्यक्तिला मारु शकत होते अशी उदाहरणे इतिहासात घडलेली असणार आहेत.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.