Site icon InMarathi

शिंदे गट मनसे बरोबर जाणं “या” ऐतिहासिक कारणांमुळे खरंच शक्य आहे!

eknath final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘आम्ही शेवटपर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, असं ठामपणे शिंदे गटातील आमदार गेल्या काही दिवसांपासून सांगत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाला अडीच वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांचे निष्ठावंत आमदार एकनाथ शिंदे यांनी चांगलाच दणका दिला आहे. विधान परिषदेच्या निकालाच्या रात्रीच एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतला गेले.

एकनाथ शिंदे पुढे आसामपर्यंत पोहचले, ते कसे पोहचले आपण बातम्यांमधून ऐकत होतो, पाहत होतो. सुरवातीला काही निवडक आमदार एकनाथ शिंदे घेऊन गेले होते, मात्र हळूहळू याची संख्या ४० पर्यंत गेली. या सगळ्या प्रकारावर संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे आपल्याच आमदारांवर तोंडसुख घेतले. तर इतर पक्षांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

 

 

एकनाथ शिंदेंचा गट हा पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज होताच ही नाराजी अखेर समोर आलीच, त्यामुळे आता शिंदे गट भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा असतानाच यात आणखीन एक ट्विस्ट आला आहे तो म्हणजे  एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात फोनवर एकूण चालेल्या प्रकारावर चर्चा झाली आहे असं बोललं जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार मनसेत प्रवेश करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मनसे प्रवेशाची हालचाल बडोद्यातून :

सुरतहुन आसामला गेलेले एकनाथ शिंदे हे पून्हा गुजरातमधील बडोदा येथे चर्चेसाठी आले होते. या चर्चेमध्ये अमित शाह, देवेंद्र फडणवीस देखील होते. आधीच हे प्रकरण कोर्टात गेल्याने कायदेशीर कारवाईमध्ये वेळ जाऊ शकतो म्हणून याला पर्याय म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटाने मनसेसोबत जाणे आणि पुढे भाजपसोबत सत्ता स्थापन करणे, अशी रणनीती आखल्याची चर्चा सुरु आहे.

 

 

शिंदे गट आणि मनसे शक्यता :

ज्येष्ठ नेत्यांचे भविष्य बघता आधीच शिवसेनेत तिकीट वाटपावरून कलगीतुरा रंगत असतो. शिवसेनेतील बडे नेते तिकीट वाटपावरूनच शिवसेना सोडून गेले होते. सध्या शिवसेनेत असलेले ज्येष्ठ नेत्यांपुढे पेच निर्माण झाला आहे, कारण शिवसेनेने आदित्य ठाकरे आणि त्यांच्या गोटातल्या लोकांना पक्षात मोठ्या प्रमाणावर संधी दिली जातआहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे दोन पदे आहेत. त्यामुळे शिवसेनेत चांगलीच चढाओढ आहे.

त्यामानाने मनसेमध्ये सगळी मंडळी नवी आहेत, वर्षानुवर्षे शिवसेनेसोबत काम केल्याने त्याचा फायदा मनसेला होऊ शकतो. मनसेचा आज एकमेव आमदार असल्याने पक्षात एकनाथ शिंदेच्या गटाला संधी मिळू शकतात.

हिंदुत्वाचा अजेंडा :

एकनाथ शिंदेचा गट कायमच ठाकरे आणि हिंदुत्वाशी एकनिष्ठ राहील असं वारंवार सांगत आहे. यातील दोन्ही मुद्दे मनसेकडे आहेत. मराठीच्या मुद्दयावरून आता राज ठाकरेंनी हिंदुत्वाची वाट धरली आहे तसेच बाळासाहेब ठाकरेंचे नाव देखील ते कायम घेताना दिसून आले आहेत. शिवसेनेत राहून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत राहताना अनेक मर्यादा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे या गटाकडे मनसे हा पर्याय राहू शकतो.

 

राजकीय भूकंप या देशाला नवे नाहीत. केंद्रातील सरकारं काही दिवसात कोसळली आहेत तिथं राज्याचं काय घेऊन बसलात. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा गट आता कोणतं पाऊल उचलणार याकडे माध्यमं टक लावून बसली आहेत. सामान्य माणूस मात्र आपल्या रोजच्या आयुष्यात इतका बुडला आहे की सरकार कोणाचं ही येवो आपल्याला काय? या अविर्भावात जगत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version