' चांदीच्या वस्तू काळ्या पडल्या असतील, तर या उपायांनी पूर्वीसारख्या लख्ख चमकतील – InMarathi

चांदीच्या वस्तू काळ्या पडल्या असतील, तर या उपायांनी पूर्वीसारख्या लख्ख चमकतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणतीही पूजा असो वा समारंभ ‘लखलख चंदेरी तेजाची’ पूजेची उपकरणे अथवा चांदीची भांडी पाहिली की मन कसे प्रसन्न होते ना?

मित्रांनो, या चांदीच्या वस्तु कधीकधी हवामानातील बदलामुळे काळ्या पडू शकतात, त्यांची चमक कमी होऊ शकते, तेव्हा त्यांची स्वच्छता कशी करावी या विचाराने आपल्या कपाळावर आठ्या जमतात, पण आता काळजी करू नका.

या लेखाच्या माध्यमातून आम्ही असे काही घरगुती नुस्खे घेऊन आलो आहोत, जे करायला सोपे तर आहेतच आणि तुम्हाला तुमच्या चांदीच्या वस्तु आणि भांडी स्वच्छ करण्यास मदत करतील.

१) टुथपेस्ट, टुथपावडर :

 

toothpaste allergy inmarathi

 

टूथपेस्ट किंवा टुथपावडर ही आपल्याकडे घरात उपलब्ध असतेच. चांदीच्या कोणत्याही वस्तूवर टुथपेस्टचा एक पातळ लेप लावून नंतर दहा-पंधरा मिनिट पेस्ट चांदीच्या वस्तूवरच थोडी सुकवावी. नंतर स्वच्छ मऊ कापडाने ती पेस्ट पुसून काढावी.

या उपायाने तुमची चांदीची वस्तु तर स्वच्छ होईलच, पण चमकायला देखील लागेल. मात्र यासाठी वापरावी लागणारी टूथपेस्ट सफेद असावी. तसेच आणखी एका उपायात भांडी स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत. भाड्यांवर तेलकट-तुपकटपणा किंवा खरखटे नसावे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोणत्याही कंपनीची पण सफेद टुथपावडर एका स्वच्छ मऊ कापडावर घेऊन त्या कापडाने भांडयांना चोळावी. कापड शक्यतोवर सिल्क किंवा कॅाटनचे असावे.

जरूरी पडल्यास भांड्यांवर थोडी-थोडी टुथपावडर शिंपडून कापडाने पुसावे. मग पुन्हा एका स्वच्छ कापडाने भांडी पुसून घ्यावी. या पद्धतीने चांदीचे दागिने किंवा भांडी अगदी नविन असल्या सारखी दिसू लागतात.

२) घरगुती वापराचे मीठ :

 

salt inmarathi

 

एक कप पाण्यात, एक चमचा (टेबलस्पून) मिठ टाकावे हे पाणी उकळून घ्यावे. यांत छोट्या अर्ध्या लिंबाचा रस पिळावा. यामध्ये चांदीची वस्तू पाच मिनिटांपर्यंत ठेवावी, नंतर साध्या पाण्याने धुऊन,स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. ती वस्तू चमकायला लागेल. (येथे एका वस्तूचे प्रमाण दिले आहे. तुमच्या जेवढ्या वस्तू आहेत त्या पाण्यात पूर्ण बुडतील, एवढे कप पाणी घ्यावे, त्या प्रमाणांत मीठ व लिंबु वाढवावे.)

गरज पडल्यास अधिक चमक येण्याकरीता टुथब्रशने साफ करावे. ब्रश मुळे स्क्रॅचेस येणार असतील तर ब्रशचा वापर टाळावा.

३) वॅाशिंग पावडर :

कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी वॅाशिंग पावडर गरम पाण्यात टाकून त्यामध्ये चांदीच्या वस्तू, वस्तूच्या काळेपणानुसार १० ते ३० मिनिटे भिजत ठेवाव्या, नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन व्यवस्थित कोरड्या कराव्यात. — वस्तू बुडतील एवढे पाणी असावे एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा वॅाशिंग पावडर असावी.

४) व्हीनेगर व बेकिंग सोडा :

दोन ग्लास गरम पाण्यात अर्धा कप सफेद विनेगार व दोन चमचा बेकिंग सोडा टाकावा. यामध्ये चांदीच्या वस्तू १० मिनिटे ते तासभर ठेवाव्या. नंतर स्वच्छ पाणी वापरुन धुऊन कोरड्या कराव्यात.

वस्तूंप्रमाणे सर्व घटकांचे व वेळेचे प्रमाण असावे. वस्तू फार नाजूक असेल तर सर्व घटक व वेळ कमी ठेवावे किंवा हा उपाय टाळावा. कारण यामध्ये चांदीची काही अंशी घट होत असते.

५) टोमॅटो केचअप :

 

silver im1

 

वरीलप्रमाणे अगदी सेम प्रयोग टुथपेस्टऐवजी टोमॅटो केचअप वापरुन देखील तुमची चांदीची भांडी तुम्ही स्वच्छ करू शकता.

तर मित्रांनो, आता लवकरच सणासुदीचे दिवस सुरू होतील, अशावेळी वर सांगितलेले उपाय वापरुन जर तुम्ही घरातील चांदीच्या वस्त किंवा पूजेची उपकरणी, भांडी स्वच्छ केलीत तर नक्कीच कमी वेळात आणि कमी खर्चात तुम्ही तुमच्याकडील चांदीच्या वस्तु घरच्याघरी पॉलिश करू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?