' डायनॉसोरचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस कसा होता? रोचक कहाणी…! – InMarathi

डायनॉसोरचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस कसा होता? रोचक कहाणी…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१९९३ मध्ये ‘ज्युरासिक पार्क’ नामक एक सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आणि आपल्याला ‘डायनासोर’ नामक एका अजस्त्र प्राण्याची ओळख झाली. महाकाय उंची आणि जिवंत माणसांना एका घासात खाऊन टाकण्याची क्षमता असलेल्या या प्राण्याने सिनेमा प्रदर्शित होताच लोकांमध्ये त्याच्याबद्दल एक प्रकारची अनाहूत भीती निर्माण केली होती.

‘ज्युरासिक पार्क’ सिनेमा बघून आल्यानंतर टेबलावर ठेवलेल्या ग्लास मधील पाणी जरी हललं तरी लोकांना “डायनासोर खरंच आला की काय?” अशी भीती वाटायची.

हॉलीवूडच्या या सिनेमाने भारतात विक्रमी व्यवसाय केला होता. ज्युरासिक पार्कची टोपी, टी-शर्ट या सर्व गोष्टींनी भारतीय मार्केटने धूम केली होती. लहान मुलांच्या बागेत डायनासोर नावाच्या प्राण्याच्या नवीन मूर्तीने जागा घेतली आणि अमेरिकन दिगदर्शक स्टीव्हन स्पिलबर्गच्या नजरेतून पहिल्यांदा बघितलेला डायनासॉर हा सर्वांच्या ओळखीचा झाला.

 

dinasour IM

 

प्रत्यक्षात जेव्हा डायनासोर पृथ्वीवर जिवंत होते तेव्हा ते कसे रहात असावेत? त्यांचा पृथ्वीवरून नायनाट होण्यासाठी काय कारणीभूत ठरलं असावं? पृथ्वीवरील त्यांचा शेवटचा दिवस कसा होता ? याचं कुतूहल आजही सर्वांना आहे.

आपल्या लहान मुलांनी जर हे प्रश्न आपल्याला विचारले तर उत्तर देता यावेत म्हणून याबद्दल जाणून घेऊयात.

२०२० मध्ये शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे की, मॅक्सिकोच्या वाळवंटी प्रदेशात एक १३० मीटर लांबीचा खडक सापडला आहे ज्यामध्ये डायनासोर शेवटचं वास्तव्य केलं होतं.

आजपासून हजारो वर्षांपूर्वी इथे ‘एस्ट्रोईड’ नावाचं मोठं वादळ आलं होतं. या वादळाची तीव्रता इतकी अधिक होती की, त्यामध्ये डायनासॉर सुद्धा स्वतःला वाचू शकले नाहीत.

इंग्लंड आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी या संशोधनाबद्दल अधिक माहिती देतांना सांगितलं आहे की, “मॅक्सिको मध्ये आलेलं हे वादळ इतकं भयंकर होता की, त्यानंतर मॅक्सिकोच्या वाळवंटात एक १०० किमी लांबीचा आणि ३० किमी खोल इतका एक खड्डा तयार झाला होता.”

 

dinasour 3 IM

 

मॅक्सिको मध्ये ‘चिक्स्लब’ या भागात आजही या वादळाचे अवशेष बघायला मिळतात. १३० मीटर लांबीचा सापडलेला हा दगड या भूकंपाच्या आधी पाण्याखाली होता असं त्या दगडावर करण्यात आलेल्या संशोधनात समोर आलं आहे.

टेक्सास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सिन गुलीक यांनी डायनासोरवर केलेल्या संशोधनात हे सांगितलं आहे की, हे सगळं एकाच दिवसात घडलं आहे. मॅक्सिको मध्ये त्या दिवशी त्सुनामी देखील आली होती जी की, विमानाच्या वेगाने प्रवास करत होती, दगडं उडवत होती. पाण्याखाली दडलेलं सल्फर हे तेव्हा वातावरणात पसरलं होतं. वातावरण इतकं थंड झालं असावं की, त्यामध्ये कोणत्याही प्राण्याला श्वास घेणं शक्य नव्हतं. त्या एका दिवसात या भागातील सर्व वनस्पती, प्राण्यांनी जीव टाकला होता. डायनासोर देखील त्याला अपवाद नव्हते.

३२५ गिगा टन इतकं सल्फर हे त्या एका दिवसात वातावरणात पसरलं होतं. कोणत्याही ज्वालामुखीत बाहेर पडणाऱ्या सल्फर पेक्षा हे सल्फर अधिक होतं. रोग प्रतिकारक शक्ती अधिक असलेले काही प्राणी या त्सुनामीत वाचले देखील असावेत. पण, डायनासोरला श्वसनासाठी आवश्यक असलेली हवेतील उष्णता ही त्या दिवशी अजिबातच उपलब्ध नव्हती.”

‘रिले ब्लॅक’ नावाच्या एका अमेरिकन वैज्ञानिक लेखकाने लिहिलेल्या ‘लास्ट डेज ऑफ डायनासोर’ या पुस्तकात मॅक्सिकोत घडलेल्या या घटनेला दुजोरा देण्यात आला आहे. अमेरिकेतील मोंटाना या भागातील खडकांमध्ये डायनासोरचे अवशेष सर्वाधिक बघायला मिळतात.

 

last days of dinosaurs IM

 

मॅक्सिको पासून कमी अंतरावर असलेल्या मोंटाना या भागात जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयावरील सर्व अभ्यासकांनी आपलं संशोधन केलं आहे. आपल्या पुस्तकात रिले ब्लॅक यांनी डायनासोरबद्दल असलेल्या बऱ्याच समज, गैरसमजांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

डायनासोरबद्दल माहिती देतांना बीबीसी या वृत्तवाहिनीने ‘द डे डायनासोर डाईड’ नावाचा एक माहितीपट प्रकाशित केला होता. या महितीपटात हे सांगण्यात आलं होतं की, “पृथ्वीवर त्या दिवशी आलेलं ‘एस्ट्रोईड’हे वादळ जर ३० सेकंदाने उशिरा आलं असतं तर त्याचा पूर्ण प्रभाव हा समुद्रात गेला असता आणि जमिनीवर रहाणारे डायनासोर हे जिवंत राहिले असते. पण, तसं झालं नाही आणि या वादळाने मॅक्सिकोच्या भागातील सर्व जीवांचा खात्मा केला. ४० हजार किमी प्रति तास इतक्या वेगाने आलेल्या ‘एस्ट्रोईड’ या वादळाने समुद्रातील खडकांची टक्कर झाली आणि ते सल्फर वातावरणात पसरलं आणि ते इतकं घातक होतं की, त्यामुळे पूर्ण जीवसृष्टी संपण्याची शक्यता होती. पण, ते एस्ट्रोईड समुद्रात गेल्याने हा धोका टळला.”

डायनासोर हे पृथ्वीतलावर मनुष्य अस्तित्वात येण्या आधीची प्रजाती मानली जाते. ही विज्ञानाची ताकत आहे की, आज आपण हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेच्या खोलाशी जाऊ शकतो आणि कोणत्यातरी निदानावर पोहोचू शकतो.

डायनासोर हे पृथ्वीवर परत बघायला मिळतील का? याचं उत्तर येणारा काळच देईल. पण, त्यांचा शेवट हा खूप करूण होता याबद्दल प्राणीमात्रांवर दया करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाईट वाटेल हे नक्की.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?