शिवसेनेतील बंडाळीचा इतिहास: राजकारणात रस असणाऱ्यांनी आवर्जून समजून घेतला पाहिजे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘महाराष्ट्रात राजकीय भूकंप’, ‘शिंदे विरुद्ध ठाकरे’, ‘शिवसेना कुणाची?’ हे आणि असे मथळे, अनेकांचे स्टेटस, सोशल मीडिया पोस्ट, कुणी समर्थक, कुणी विरोधक अशी एकूणच तापलेल्या राजकारणाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार गुवाहाटीत आहेत. काही खासदार सुद्धा त्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अस्तित्वात असलेलं महाविकास आघाडीचं सरकार टिकाव धरणार का? हा प्रश्न उभा राहिलेला दिसतोय.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं हे बंड शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड असल्याचं म्हटलं जातंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर झेंडा चित्रपटातील “असे अनेक धक्के आम्ही या आधी सुद्धा पचवले आहेत” हा संवाद सुद्धा सोशल मीडियावर अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय. हे तिन्ही धक्के बसले त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हयात होते.
हे मोठे धक्के नेमके कधी आणि कसे बसले होते? याआधी कुणी कुणी आणि कशी शिवसेनेसोबत बंडाळी केली होती, त्याबद्दल जाणून घेऊया.
त्यांनी ‘भुजबळ’ दाखवलं…
महाराष्ट्रात शिवसेनेचे अनेक आमदार निवडून आणण्यात छगन भुजबळ यांनी फार महत्त्वाची भूमिका निभावली होती. अनेक आमदार निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता असं म्हणता येईल.
मात्र विरोधीपक्ष नेतेपदी मनोहर जोशी यांची निवड बाळासाहेब ठाकरे यांनी केली. हा निर्णय छगन भुजबळ यांना पटला नाही. याविरोधात बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
१९९१ साली घडलेल्या या घटनेत, एकूण १८ आमदारांसह त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. उत्तम कामगिरी करूनही कौतुक न झाल्याची नाराजी, हे त्यांच्या बंडाचं कारण असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
सत्तेवर असलेल्या काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा सुद्धा भुजबळांनी यावेळी केली होती.
त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी १२ आमदार त्याच दिवशी शिवसेनेत परतले. बंड करणाऱ्या इतर आमदारांना मात्र वेगळ्या गटाची स्थापना करण्याची मान्यता देण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
त्यावेळी छगन भुजबळ यांच्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याच्या घटना सुद्धा घडल्याचं म्हटलं जातं. पुढे १९९५ साली शिवसेनेच्या बाळा नांदगावकर यांनी विधानसभा निवडणुकीत भुजबळांचा पराभव केला. नांदगावकर फार मोठे जायंट किलर मानले गेले होते.
राणेंनीही दिला धक्का…
पुढील चौदा वर्षांच्या काळात शिवसेनेत सगळं आलबेल राहिलं. मधल्या काळात राज्याच्या सत्तेची चवही शिवसेनेने चाखली. सध्या भाजपकडून केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं.
याच नारायण राणे यांनी २००५ साली मात्र शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. त्यांनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसचा हात धरण्याचा निर्णय घेतला. हा शिवसेनेला बसलेला दुसरा मोठा धक्का होता.
—
- शिंदे, ठाकरे आणि पवार: आजचा बंड म्हणजे १९७८ सालाचा सिक्वल!
- एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही ५ खरी कारणं राजकीय भूकंपाला कारणीभूत?…
…आणि शेवटी कुटुंब सुद्धा फुटलं
राणे यांनी दिलेल्या धक्क्यानंतर जवळपास वर्षभरात म्हणजेच २००६ साली बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेनेला तिसरा मोठा धक्का दिला. पक्षातून बाहेर पडून, महाराष्ट्र दौरा करून, त्यानंतर ‘महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना’ या नव्या पक्षाची स्थापना केली.
आज ज्या पद्धतीने शिंदे गटाकडून म्हटलं जात आहे, तसंच काहीसं म्हणणं राज ठाकरे यांनी मांडलेलं दिसलं होतं. पक्ष नेतृत्वाशी लढाई नसून, आजूबाजूला असणाऱ्या इतर व्यक्तींशी ही लढाई आहे.
पुढे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. राज ठाकरे यांच्याकडे मोठा तरुण वर्ग आकर्षित झाल्याचं सुद्धा त्यावेळी पाहायला मिळालं होतं.
राज ठाकरे यांच्या रूपात ठाकरे कुटुंबातील एक सदस्य सुद्धा बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावला होता. त्यामुळे हा धक्का केवळ शिवसेनेला बसलेला धक्का नसून ठाकरे कुटुंबाला बसलला धक्का मानला जातो.
राजकारणात बंडखोरी किंवा आमदारांची फोडाफोडी ही बाब नवी नसते. त्याचप्रमाणे शिवसेनेने यापुर्वी अनेकदा अशा पेचप्रसंगाचा सामना केला आहे. मात्र तब्बल ३० हून अधिक आमदारांसह एकनाथ शिंदेंसारख्या विश्वासू नेत्याने सेनेविरोधात पुकारलेले बंड हा मोठा हादरा मानला जातोय. हा धक्का सेना कसा पचवणार? सेनेचं भवितव्य काय? याचं उत्तर येणारा काळच देईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.