' विमान उडवू देत नाही? मग मी शेकडो विमानांची मालकीणच बनून दाखवते! – InMarathi

विमान उडवू देत नाही? मग मी शेकडो विमानांची मालकीणच बनून दाखवते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विमान वाहतूक उद्योग! आकाशाला गवसणी घालणारा हा उद्योग म्हणजे पुरुषांचं वर्चस्व असलेलं क्षेत्र! पण दिल्लीतील एका मुलीने या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलंच नाही तर यशही मिळवलं आहे. हे व्यक्तिमत्व म्हणजे कनिका टेकरीवाल. वयाच्या २१व्या वर्षी कर्करोगाने त्रस्त असलेल्या कनिकाने या आजारावर मात करून भारतातील सर्वात मोठी खासगी जेट कंपनी स्थापन केली.

मित्रांनो ही कहाणी आहे याच कनिका टेकरीवाल यांची. ज्यांनी आपल्या ध्येयाचे पंख लावून अवघ्या आसमानला गवसणी घातली आहे.

आयुष्य आणि ती जगण्याची जिद्द या गोष्टी आपल्या जगण्याला एका वेगळ्या उंचीवर घेवून जातात. या जगण्याला जर आपल्या ध्येयाचे पंख लाभले तर मग क्या कहना…अवघं आकाश मुठीत आल्यासारखं वाटतं. अशीच काहीशी खरीखुरी गोष्ट आहे कनिकाची.

 

kanika im

 

कनिका टेकरीवाल या JetSetGo च्या CEO आणि संस्थापक आहेत. JetsetGo ही दिल्ली स्थित खाजगी विमान वाहतूक सेवा कंपनी आहे. कंपनी ही एक प्लेन एग्रीगेटर आहे. जी ओला , उबर प्रमाणे टॅक्सी सर्विस आहे पण हवाई टॅक्सी, तसेच JetSetGo लोकांना खाजगी जेट आणि हेलिकॉप्टर भाड्याने देते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कंपनी क्लाउड आधारित शेड्युलिंग, विमान व्यवस्थापन आणि सेवा आणि एक इनबिल्ट मार्केटप्लेस देखील देते. कनिकाला वयाच्या १६ व्या वर्षापासून विमान चालवण्याची आवड होती. याच तिच्या आवडीचे रूपांतर तिच्या व्यवसायात होईल असे तिला वाटले नव्हते.

मात्र वयाच्या एकविसाव्या वर्षी मात्र तिच्या आयुष्याला एक प्रकारे कलाटणी देणारी घटना घडली ती म्हणजे तिला झालेल्या कॅन्सर चे निदान! तिच्यावर ९ महिने उपचार झाले, त्यानंतर ती बरी झाली. कर्करोगावर मात केल्यानंतर, आयुष्याची पुन्हा नव्याने सुरवात करायची होती.

घरातलाच पारंपारिक व्यवसाय होता पण काहीतरी वेगळे करण्याची जिद्द देखील होती. कनिकाचे बोर्डिंग स्कूलचे शिक्षण दक्षिण भारतात झाले. ती नंतर अर्थशास्त्रातील अंडर-ग्रॅज्युएशन आणि डिझाईनमधील डिप्लोमासाठी मुंबईला गेली. तिने आपले एमबीएचं शिक्षण देखिल पूर्ण केलं. मग कनिकाने २०१४ मध्ये JetSetGo सुरू केले.

JetSetGo सुरू करण्याबद्दल सांगताना कणिका सांगते की, Jetsetgo चा प्रवास २०१२ मध्ये खाजगी विमान प्रवास प्रत्येकासाठी अधिक सुलभ, पारदर्शक, किफायतशीर आणि कार्यक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू झाला. माझ्या डोक्यात जवळपास तीन वर्षे ही कल्पना होती, पण जेव्हा मी माझे स्केच बोर्ड काढले आणि त्यावर काम करायला सुरुवात केली तेव्हा मला कर्करोग झाल्याचे निदान झाले, ज्यामुळे मला एक वर्ष मागे जावे लागले. माझ्यासाठी सुदैवाने, मी उपचार पूर्ण करेपर्यंत किंवा आत्तापर्यंत देशात इतर कोणीही असे काहीतरी करू शकले नव्हते.

Jetsetgo ही अशा प्रकारे देशातील पहिली हवाई टॅक्सी बनली.

 

kanika 1 im

 

JetSetGo हे स्टार्टअप आता इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (eVTOL) विमानाचा वापर करून भारतातील इंट्रा-सिटी कनेक्टिव्हिटीसह एअर टॅक्सी बनवत आहे.

कंपनी वापरत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे हवाई उड्डाण ग्राहकांच्या सोयीचे तर बनले आहेच पण त्यामुळे विमानांच्याही देखभालीचा खर्च कमी होण्यास मदत होते, एअरटाइम वाढतो, ग्राउंड टाइम कमी होतो, ज्यामुळे नफा जास्त होतो. किंबहुना, यामुळे चार्टर्ड विमानांची किंमतही लक्षणीयरीत्या कमी होते.

खडतर प्रवास

उद्योग सुरु करताना सुरुवातीचे सहा महिने खूपच खडतर होते. बरेच प्रयत्न करूनही एकही ग्राहक कंपनीला मिळाला नाही.

कनिकाला भारताच्या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये खाजगी जेट स्पेसमध्ये एग्रीगेटरची गरज वाटली त्यासाठी कनिका अनेक लोकांना भेटली. त्यातून हे समजले की भारतातील खाजगी जेट बुकिंगचा अनुभव खूपच वाईट आहे. तसेच अनेक खाजगी जेट मालक असे होते जे विमानांच्या देखभालीच्या वाढत्या किमती, नियमित दुरूस्ती आणि इतर समस्यांमुळे त्यांची विमाने विकत होते.

दरम्यान, यूकेमधील एका सहकाऱ्याशी बोलताना कनिकाला JetSetGo ची कल्पना सुचली.

सुरुवातीला, JetsetGo चे उद्दिष्ट असे होते की जे ग्राहक त्यांच्या कामासाठी एका दिवसात तीन ते चार शहरांमध्ये जातात, जे पर्यटक आहेत किंवा आपत्कालीन परिस्थितीत विमान भाड्याने घेऊ इच्छितात. पण तिच्या कल्पनेला म्हणावे तसे यश येत नव्हते. मात्र तिचा मित्र सुधीर परला सह-संस्थापक म्हणून कंपनीत रुजू झाला आणि बदल घडायला सुरवात झाली.

jetsetgo ने ग्राहकांना लक्झरी सेवा तसेच विमान मालकाला नफ्यातील एक भाग देण्यास सुरुवात केली. यामुळे कंपनीचा एअर टाइम वाढू लागला.

 

kanika 2 im

 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे JetSetGo ला बाहेर जाऊन निधी शोधण्याची गरज पडली नाही. कंपनीचे ग्राहक स्वत:च कंपनीचे गुंतवणूकदार बनले आहेत यात क्रिकेटपटू युवराज सिंग आणि सीमेंट व्यवसायीक पुनीत दालमिया यांचाही समावेश आहे आणि आता कंपनीत सुमारे २०० कर्मचारी काम करतात.

कंपनीने स्वत:ची विमाने देखील विकत घेतली आहेत. २०२०-२१ या वर्षात कंपनीने ६००० उड्डाणे केली आहेत. जवळपास १ लाख फ्लायर्सनी कंपनीच्या विमानातून हवाई प्रवास केला आहे. हे खूप मोठे यश आहे.

दिल्ली-मुंबई, हैदराबाद-दिल्ली आणि मुंबई-बेंगळुरू या हवाई मार्गांवर jetsetgo च्या विमानांचे सर्वात जास्त प्रवास होतात आणि त्यांची जवळपास ५% उड्डाणे वैद्यकीय आणीबाणीसाठी वापरली जातात.

 

plane im

 

आज कनिकाची कंपनी JetsetGo ची उलाढाल १५० कोटी रुपये आहे. या वर्षी जेटसेटगो ही विमान थेट आयात करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.

jetsetgo हे कनिकाचे केवळ स्वप्न नाही तर तिची जगण्यासाठीची जिद्द होती असे म्हणणे चुकीचे नाही. jetsetgo ने कनिकाला जगण्याची उर्मी दिली.

२०१६ मध्ये कनिका टेकरीवाल हिला फोर्ब्सने रिटेल आणि ईकॉमर्सच्या बाबतीत आशियातील ३० वर्षाखालील यादीत स्थान दिले होते. कनिकाला कोटक वेल्थ हुरून- लीडिंग वेल्थी वुमन, २०२० या यादीतही स्थान मिळाले आहे.

मित्रांनो, कनिका टेकरीवालची कथा आपल्याला शिकवते की स्वतःवर विश्वास ठेवा आणि फक्त पहिले पाऊल टाका, रस्ता आपोआप तयार होतो. प्रत्येक परिस्थितीत पुढे जा आणि योग्य वेळ साधा. आयुष्य तुम्हाला हात नक्कीच देईल. लेख कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?