आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अडीच वर्षांपूर्वी पहाटेच्या शपथविधीमुळे अनेकांची झोप उडाली होती. भाजप राष्ट्रवादीशी युतीला कायमच नकार घंटादेत होते आणि अखेर त्यांनाच जाऊन मिळाले होते. मात्र हे सरकार लगेचच पडलं होत. महाराष्ट्राच्या राजकारणात न भूतो न भविष्यती असा योग घडून आला, आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. अडीच वर्षांनी पुन्हा एकदा असाच एक प्रकार घडून आला आहे.
विधानपरिषदेत भाजपचे सर्व आमदार निवडणून आले आणि एकच विषय चर्चेत होता तो म्हणजे आमदार फुटण्याचा, त्याच रात्री आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक सुरतमध्ये पोहचले आणि एकच हाहाकार उडाला. सुरतमधून पुन्हा मुंबईला येणार का? अशी चर्चा होती मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी थेट आसाम गाठले.
या राजकीय भूकंपामुळे माध्यमं, राजकीय विश्लेषक यांच्यात चर्चा रंगू लागल्या आहेत. याच घटनेवर विश्वम्भर चौधरी यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहली आहे. विश्वम्भर चौधरी सामाजिक, राजकीय घडामोडींवर आपले मत ते कायमच मांडत असतात. सोशल मीडियावर देखील ते कायम लिहत असतात. त्यांची व्हायरल झालेली पोस्ट आपण जाणून घेऊयात…
चाळीस गुवाहटीत पोचलेत. अजून दहा शिंदेंसोबत आहेत असा दावा आहे. तसं असेल तर सेनेकडे फक्त चार आमदार उरतात. आदित्य ठाकरे सोडून इतर तीन निष्ठावान कोण एवढाच उत्सुकतेचा मुद्दा आहे.
दरम्यान गृहराज्यमंत्री परागंदा होतात पण ते पोलिसांना कळत नाही हे बुद्धीला पटत नाही. गृहखातं स्वतःकडे न ठेवण्याचा फटका मुख्यमंत्र्यांना बसला आहे. हा कट एका दिवसात शिजला नसणार. मात्र सीआयडीला त्याची खबर नसावी हे आश्चर्य आहे.
राज्याच्या गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांना धोका दिला असा याचा अर्थ आहे. गृहमंत्री गृहखातं चालवत असले तरी सगळं रिपोर्टींग मुख्यमंत्र्यांना मिळावं अशी व्यवस्था असते. ‘तुम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हा’ हा सल्ला उद्धवजींनी नाकारला असता आणि तेव्हाच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं तर प्रतिष्ठा गेली नसती. हा दिवस पहावा लागला नसता.
बाकी जे घडलं त्याचं बरंच श्रेय संजय राऊतांना द्यायला पाहिजे. दररोज सकाळी नऊ वाजता चॅनलवर येऊन भाजपाच्या रोषाच्या संपूर्ण फोकस शिवसेनेवर राहील याची काळजी त्यांनी घेतली. राजकारणात परतीचे दोर कधीच कापायचे नसतात, ते दररोज सकाळी नऊ वाजता सपासप कापून राऊतांनी अप्रत्यक्षरित्या किंवा नकळत राष्ट्रवादीला सेफ पॅसेज दिला. संजय राऊतांचा उद्देश तो नक्कीच नसणार पण घडलं मात्र तेच.
–
बंडखोर आमदारांची छावणी झालेल्या हॉटेलची “अंदर की बात”…
एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही ५ खरी कारणं राजकीय भूकंपाला कारणीभूत?…
–
तिकडे स्वतःचे दोन मंत्री आत टाकले तरी राष्ट्रवादीनं संयत प्रतिक्रिया देत दोर पूर्णतः कधीच कापले नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की एकवेळ भाजप-राष्ट्रवादी सरकार होईल पण भाजप-सेना सरकार बनणार नाही.
उद्धव ठाकरे हे एक अतिशय सज्जन गृहस्थ आहेत. कदाचित हा त्यांचा प्रांतच नव्हता किंवा आसपास सगळेच दगाबाज होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.