' ‘गाढवांचा देश’, पाकिस्तानात का झपाट्याने वाढतेय गाढवांची संख्या? – InMarathi

‘गाढवांचा देश’, पाकिस्तानात का झपाट्याने वाढतेय गाढवांची संख्या?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याकडची एक म्हण प्रसिद्ध आहे, ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ त्या म्हणीचा अर्थ आहे, की जेव्हा वेळ येते तेव्हा शहाण्या-सुरत्या माणसालाही गाढवाचे ( इथे जाणकारांनी शब्द्श: अर्थ घेऊ नये.) अर्थात मूर्ख माणसाचे पाय धरावे लागतात.

आपल्या एका सख्ख्या शेजारी देशाच्या अर्थव्यवस्थेला या गाढवांनीच आपला हातभार लावला आहे. आहे ना काहीतरी हटके? चला तर मग पाहू नक्की काय आहे फंडा?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपला शेजारी देश पाकिस्तान, सध्या श्रीलंकेप्रमाणेच आर्थिक ओढताणीतून जात आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. इम्रान खान यांच्यानंतर आलेल्या शाहबाज सरकारने पाकिस्तानातील जनतेवर महागाईचा बोजा वाढवला आहे.

अलीकडेच सरकारने पेट्रोलच्या दरात वाढ करून जनतेला मोठा धक्का दिला आहे. याशिवाय तूप, तेल या मूलभूत वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. वीज संकटामुळे नागरिकांना दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे.

याला सामोरे जाण्यासाठी सरकारने इस्लामाबादमध्ये रात्री १० नंतर विवाहसोहळ्यांवर बंदी घातली आहे आणि कार्यालयांना शनिवारची सुट्टी जाहीर केली आहे.

आर्थिक नियोजन डळमळल्याचा फटका देशाच्या आर्थिक व्यवस्थेला बसला असून ही घसरगुंडी थांबवण्याचे तिथल्या सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत आणि यात गाढवांचा महत्वाचा वाटा आहे, इतका की २०२१ मध्ये पाकिस्तानचा हिट अॅनिमेटेड चित्रपट ‘द डोकी किंग’ चीनमध्ये प्रदर्शित झाला.

हे राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे आहे- गेल्या वर्षी गाढवांची संख्या वाढली असताना, इम्रान खान सरकारला नॅशनल असेंब्लीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र विरोधाचा सामना करावा लागला, इम्रान विरोधातील राजकीय नेत्यांनी “गाढव राजा की सरकार नही चलेगी” असा नारा दिला होता.

 

donkey im

 

आपली आर्थिक घडी स्थिरस्थावर होण्यासाठी करत असलेल्या उपायांमध्ये पाकिस्तान शेती आणि पशुधनाला प्राधान्य देत आहे. अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी जारी केलेल्या ताज्या आर्थिक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की पाकिस्तानचा जीडीपी मागील इम्रान खान सरकारने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा वेगाने वाढला आहे.

देशात राजकीय अशांतता असूनही जीडीपी वाढीचा दर ५.९७ टक्के राहण्याचा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. हा एक महत्त्वाचा डेटा पॉइंट असला तरी, दरवर्षी गाढवांच्या लोकसंख्येमध्ये १ दशलक्षने होणारी वाढ हे दाखवते की कर्जबाजारी देश पशुधन निर्यातीकडे कसा वळत आहे.

पाकिस्तानातील २०२१-२०२२ च्या आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, “देशातील आर्थिक वाढ, अन्न सुरक्षा आणि गरिबी निर्मूलनासाठी सरकारने पशुधन क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे”.

या आर्थिक सर्वेक्षणानुसार, २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात GDP मध्ये पशुधनाचे योगदान अंदाजे १४ टक्के आहे. पाकिस्तानमध्ये ८० लाखाहून अधिक ग्रामीण कुटुंबे पशुधन उत्पादनात गुंतलेली आहेत. पशु पालनातून त्यांना पैसेही मिळत आहेत.

पशु उत्पादकतेला चालना देण्यासाठी सरकारच्या धोरणात्मक हस्तक्षेपांचे स्पष्टीकरण करताना, सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे की “पशुवैद्यकीय आरोग्य कव्हरेज, पालन पद्धती, पशु प्रजनन पद्धती, कृत्रिम रेतन सेवा, प्राण्यांसाठी संतुलित रेशनचा वापर करून प्रति युनिट पशु उत्पादकता वाढवणे हे नियामक उपायांचे उद्दिष्ट आहे.

मित्रांनो या गाढवांच्या पैदास, पालन आणि विक्री मध्ये एक छुपी मेख देखील आहे ,ती म्हणजे ‘गाढवाचे चामडे आणि जिलेटिनला’ चिनी औषधांमध्ये खूप महत्त्व आहे. आणि जिओ न्यूजनुसार , चिनी कंपन्या पाकिस्तानमध्ये गाढवपालनात ‘$3’ अब्ज गुंतवणूक करण्यास तयार आहेत.

 

donkey im1

 

‘पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा’ या दोन्ही राज्यांच्या सरकारांनी विशेषतः चीनला गाढवांची निर्यात करण्यासाठी गाढवांचे वेगळे फार्म देखील तयार केले आहेत.

चीन हा जगात गाढवांचा सर्वात मोठा प्रजनन करणारा देश असल्याचे म्हटले जाते. त्यांचा जैवतंत्रज्ञान उद्योग ‘एजियाओ’ नावाच्या चिनी औषधाचा पारंपरिक प्रकार तयार करण्यासाठी महत्वाचा घटक म्हणून गाढवाच्या चामड्यांचा वापर करतो.

हे रक्त परिसंचरण चांगले करण्यासाठी, अशक्तपणा आणि पुनरुत्पादक समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते तथापि, त्याची वैद्यकीय परिणामकारकता सिद्ध झालेली नाही.

पाकिस्तान चीनला मोठ्या प्रमाणात गाढवांची निर्यात करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानला एका गाढवाच्या कातडीचे १८ ते २० हजार रुपये मिळतात. गाढवाच्या कातडीतून काढलेले जिलेटिन अनेक महागडी औषधे बनविण्यासाठी वापरले जाते. हा ही या गर्दभ आख्यानामागील हेतु आहे.

२०१९-२०२० मध्ये पाकिस्तानात ५.५ दशलक्ष गाढवे होती आणि २०२१-२०२२ मध्ये पाकिस्तानातील गाढवांची संख्या ५.७ दशलक्ष झाली आहे. गाढवांच्या या वाढत्या संख्येमुळे खुद्द पाकिस्तानात तो विनोदाचा विषय झाला आहे.

या विषयावरील अनेक जोक्स आणि मिम्स तेथील सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत. तेथील एक पत्रकार हमीद मीर यांनी तर टिप्पणी केली की, “मला आशा आहे की लाहोरमध्ये मिळणार्‍या कबाबात अजून तरी गाढवाचे मांस दिले जात नाही.”

तर मित्रांनो गाढवाच्या कातडी आडून केली जाणारी चीन आणि पाकिस्तानची ‘फायनान्स स्ट्रेटजी’ तुमच्या लक्षात आली असेलच, पण गाढवाने कितीही सिंहाचे कातडे ओढले तरी ते सिंह होऊ शकत नाही हे ही तितकेच खरे आहे, हो ना?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?