' आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘बागबान’मध्ये अमिताभ ऐवजी दुसराच चेहरा असणार होता! – InMarathi

आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘बागबान’मध्ये अमिताभ ऐवजी दुसराच चेहरा असणार होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एका एव्हरग्रीन कथेवर आधारित एक एव्हरग्रीन चित्रपट असा बागबानचा उल्लेख करता येईल. एव्हरग्रीन यासाठी, की जोपर्यंत या जगात पालकांच्या उतारवयात स्वार्थीपणा करणाऱ्या मुलांची पिढी अस्तित्वात आहे, तोपर्यंत या कथेला आणि चित्रपटाला मरण नाही.

विशेषतः भारतीय पालकांच्या आवडीचा असा हा विषय आहे. म्हणूनच बागबान सिनेमा भारतीय पालकांना इतका आवडणारा ठरला. बागबान म्हटलं की हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन ही जोडी अगदी सहज आठवते.

 

baghban IM

 

ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला नसेल त्यांनी सुद्धा बागबानमधील या जोडीबद्दल अगदी नक्कीच ऐकलं असेल. पण तुम्हाला हे माहित आहे का, की अमिताभ बच्चन हा या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हता. हे असं नेमकं का होतं? कुणाला होती या भूमिकेसाठी पहिली पसंती आणि अमिताभला हा रोल कसा ऑफर केला गेला, चला जाणून घेऊयात.

पहिली पसंती :

चित्रपट निर्माते बी आर चोप्रा यांनी बागबान हा सिनेमा बनवण्याचा विचार सर्वप्रथम केला होता. त्यावेळी त्यांचे लाडके अभिनेते दिलीप कुमार हे मुख्य भूमिकेसाठी त्यांची पहिली पसंती होते. कादंबरीच्या लेखिका अचला नायर यांनी याविषयी खुलासा केला असल्याचं समोर आलं आहे.

बी आर चोप्रा यांना फार आधीच हा चित्रपट बनवण्याची इच्छा होती. दिलीप कुमार यांनी ही भूमिका नाकारल्यामुळेच हा चित्रपट त्यावेळी बनवला गेला नाही.

 

dilip kumar ignored inmarathi

 

नेमका का नाकारला चित्रपट?

दिलीप कुमार यांना बागबानमधील भूमिका साकारण्याआधी मनात एक प्रश्न पडला होता. त्यांची सहकलाकार नेमकी कोण असेल? या प्रश्नाचं हवं तसं उत्तर त्यांना मिळालंच नाही. मीनाकुमारी आणि नर्गिस या दोघींना तोपर्यंत देवाज्ञा झाली होती. राखी यांनी सुद्धा चित्रपटात काम करणं बंद केलं होतं.

प्रसिद्धी आणि वरिष्ठता या दोन्ही पातळ्यांवर दिलीप कुमार यांना साजेशी ठरेल अशी दुसरी कुठलीही अभिनेत्री सापडणं अशक्य होतं. सोबत काम करण्यासाठी साजेशी अभिनेत्री मिळत नाही म्हटल्यावर दिलीप कुमार यांनी ही भूमिका स्वीकारणं टाळलं. बी आर चोप्रा यांची पहिली पसंती असूनही, दिलीप कुमार यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला.

तब्बल वीस वर्षानंतर :

दिलीप कुमार यांना मुख्य भूमिकेत घेऊन बागबानची निर्मिती करण्याचं बी आर चोप्रा यांचं स्वप्न साकार झालं नाही. पुढे त्यांनी आपला मुलगा रवी चोप्रा याला ती स्क्रिप्ट देऊ केली. दिग्दर्शक रवी चोप्रा यांनी मात्र ही संधी दवडली नाही. २००३ साली बागबानची निर्मिती करून एक अजरामर कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणली.

अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या नशिबात ही मुख्य पात्र साकारण्याचं भाग्य लिहिलं होतं असं म्हणायला हवं. या दोघांसह सलमान खान आणि परेश रावल हे दोन दिग्गज कलाकार बागबानमध्ये पाहायला मिळाले.

 

baghban starcast IM

 

२००३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमन वर्मा, समीर सोनी, नासिर खान, महिमा चौधरी, रिमी सेन यांची सुद्धा वर्ण लागली. कुठला सुपरहिट आणि एव्हरग्रीन चित्रपट कुठल्या कारणासाठी कुणाच्या वाट्याला येईल हे सांगता येत नाही हेच खरं!

दिलीप कुमार यांनी चित्रपट नाकारला नसता, तर काही वर्षं आधीच या चित्रपटाची निर्मिती झाली असती. अमिताभ आणि हेमा यांना मात्र या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नसती.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?