' महिलांच्या ‘ब्रा’चे हूक मागच्या बाजूलाच का असतात? कारण जाणून डिझायनरला सलामच ठोकाल! – InMarathi

महिलांच्या ‘ब्रा’चे हूक मागच्या बाजूलाच का असतात? कारण जाणून डिझायनरला सलामच ठोकाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्त्री मग ती कोणत्याही वयोगटातील असो स्वत:ला कायम प्रेझेंटेबल ठेवण्याचा प्रयत्न करते. यामध्ये तिच्या ज्वेलरी, मेकअप यांबरोबरच तिच्या कपड्यांचा देखील समावेश असतो.

विषय जेव्हा तिच्या सौंदर्यापाशी येऊन थांबतो, तेव्हा ती जास्तच जागरूक असल्याचे आपल्याला दिसून येते. या जागरूकतेत तिच्या अंतर्वस्त्राचा विषय येतो तेव्हा तर ती जास्तच विचार करून कपडे निवडते.

विषय कपड्यांचा असेल तर ती वापरत असलेली ब्रा तिची जवळची सखी म्हणावी लागेल. नियमित वापरात असूनही बरेचदा या ब्रा ला असलेले हुक पाठीकडे किंवा मागच्या बाजूला का असतात याचा फारसा विचार होत नसावा किंवा केला आत नसावा.

या लेखातून आपण या ‘ब्रा’चे हुक मागे का असतात याची काही इंटरेस्टिंग कारणं आणि ‘ब्रा’चा शोध लावणार्‍या डिझायनरच्या क्रिएटिव्हिटीला सलाम करू.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘ब्रा’चा वापर जवळपास प्रत्येक महिला करत असते आणि अनेक बाबतीत ब्रा घालणेही आवश्यक असते, परंतु ती घालणे किंवा न घालणे हे तुमच्या स्वतःच्या आवडीवर अवलंबून असते.

आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वापरल्या जाऊ शकतात, परंतु एक सामान्य गोष्ट जी जवळजवळ प्रत्येक ‘ब्रा’मध्ये दिसते ती म्हणजे त्यांच्या मागे एकाच आकाराचे तीन हुक्स असतात.

पातळ स्ट्रॅपच्या ‘ब्रा’मध्ये एकच हुक असतो, पण तोही तीन थरांमध्ये. ‘ब्रा’च्या या अशा रचनेमागे असलेली कारणे पाहूया….

 

bra hook im

 

१. बरेचदा शारीरिक विविधतेमुळे महिलांच्या ‘ब्रा’च्या कपचा आकार आणि बँडचा आकार यात फरक असतो.

प्रत्येक शरीर वेगळे असते आणि कधी कधी एकच कप आकार असल्‍याने, स्‍त्रीच्‍या शरीरात पाठीची चरबी जास्त असू शकते, यामुळे पुढे ओपन होणारी ब्रा घालणे गैरसोयीचे होते.

२. ‘ब्रा’चे हुक ज्या पट्टीला चिकटवलेले असतात ती स्ट्रेच करण्यायोग्य असते आणि कालांतराने ती सैल होते. त्यामुळे नवीन ब्रा आल्यावर ती पहिल्या हुकमध्ये घालावी आणि कालांतराने ती सैल झाल्यावर एक एक करून स्टेप पुढे जावे.

ब्रा चे हे वैशिष्ट्य त्याचे शेल्फ लाइफ वाढवते आणि ती पुढे बराच काळ वापरली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, जर कपचा आकार खराब झाला नसेल, तर ती ब्रा अनेक महिने वापरता येते.

 

bra im

 

३. पाठीमागे हुक असलेली ब्रा स्तनांना खूप चांगला आकार आणि आधार देते. या प्रकारच्या डिझाइनसह, स्तन किंचित उचलले जातात आणि सरळ राहतात. बॅक सपोर्टसह ते खूप सोयीस्कर होते. त्यामुळे खासकरून ब्रा च्या मागच्या बाजूला हुक लावले जातात.

जर सर्व प्रकारच्या ‘ब्रा’मध्ये पुढच्या बाजूला हुक असतील तर मोठे स्तन असलेल्या महिलांना खूप त्रास होईल आणि अस्वस्थ वाटेल. यासोबतच ज्या महिलांच्या स्तनांमध्ये अंतर असते त्यांनाही समोरच्या हुकचा त्रास होऊ शकतो.

४. स्तनाच्या आधारासोबत पाठीचा आधारही खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही ब्रा घातली असेल, तर ती अशी असावी की ती समोर आणि पाठीमागे सपोर्ट देईल. मागच्या बाजूला असलेले हुक पाठीला सपोर्ट करतात. अशा प्रकारची ब्रा तुमचे खांदे सॅगिंग होण्यापासून रोखू शकते.

५. शेवटी, सर्वात महत्वाची गोष्ट. हे हुक आणि सपोर्ट सेटिंग्ज ‘ब्रा’चे शेल्फ लाईफ वाढवतात, तर फ्रंट क्लॅप असलेली ब्रा अधिक लवकर झिजते आणि म्हणून ती धुताना अधिक काळजी घेणे आवश्यक असते आणि एकदा ‘ब्रा’चे इलास्टिक ताणले गेले की ती पुन्हा घालता येत नाही. ती तिचा आधार गमावते.

याच कारणामुळे ‘ब्रा’च्या मुख्य डिझाइनमध्ये हुक मागच्या बाजूला लावले जातात, त्यामुळे त्याचे फायदे देखील खूप मोठे आहेत, जर दिवसभराच्या कामादरम्यान पाठीच्या सपोर्टसाठी ब्रा घालायची असेल तर फक्त आणि फक्त पाठीमागे हुक असलेली ब्रा घालणे कधीही चांगले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?