' चवीने पुरणपोळी खाताय? पण अस्सल मराठी असाल तर पुरणपोळीचा इतिहास वाचाच – InMarathi

चवीने पुरणपोळी खाताय? पण अस्सल मराठी असाल तर पुरणपोळीचा इतिहास वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सण म्हटले, की पटकन आठवणाऱ्या पदार्थांमधला आपला एक अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. अगदी हे नाव स्वतःशी उच्चारलं तर एका गोड-खरपूस गंधाची आपल्याला आठवण होते.

पूर्वी पुरणपोळी म्हटलं की घरोघरी केवढातरी घाट घातला जायचा. आजच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत अनेकांना पूर्वीसारखं मोठ्या प्रमाणात पुरणपोळ्या करणं जमत नसलं तरी सणाच्या निमित्ताने आजही थोड्या का होईना घरोघरी पुरणपोळ्या केल्या जातात.

या सगळ्यात पुरणपोळीच्या मागे काही इतिहास असेल का हा विचारही आपल्या मनात आलेला नसतो. आपल्याला अतिशय आवडणाऱ्या आणि सणांचा गोडवा वाढवणाऱ्या पुरणपोळीचा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला ठाऊक असायलाच हवा. जाणून घेऊ त्याविषयी.

पुरणपोळी या शब्दातील पुरण हा शब्द पूर्ण या शब्दावरून आला. जी पोळी पूर्ण भरलेली असते ती पुरणपोळी असा अर्थ त्यामागे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१२ व्या शतकातील ‘मंसोलस्सा’ या ग्रंथात आपल्याला पुरणपोळीचा उल्लेख आढळतो. कर्नाटकमधले राजे सोमेश्वरा तृतीय यांच्या काळात हा ग्रंथ लिहिला गेला होता.

१४व्या शतकात अल्लासनी पेड्डन यांनी लिहिलेल्या ‘मनुचरित्र’ या तेलगू ग्रंथात ‘बकशम’ या नावाने पुरणपोळीचा उल्लेख आढळतो.

१६व्या शतकातील ‘भावप्रकाश’ या ग्रंथात आरोग्याच्या दृष्टीने चांगला असणारा पदार्थ या अर्थाने एका गोड भरलेल्या पोळीचा आणि ‘भैषज्य रत्नावली’ या ग्रंथामध्येही एका गोड भरलेल्या पोळीचा उल्लेख आढळतो. हा उल्लेख पुरणपोळीचाच असण्याची शक्यता आहे.

अगदी १३व्या शतकात ज्ञानेश्वरांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातही पुरणपोळीचा उल्लेख आढळतो. आपल्याला जरी ‘पुरणपोळी’ हे पुरणपोळीचं एकच नाव माहीत असलं तरी भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी होळीगे, उबट्टी, वेडमी, बोबटलू, बोळी , ओपुट्टु अशा वेगवेगळ्या नावांनी पुरणपोळी ओळखली जाते.

 

puranpoli 3 IM

 

साधारणपणे चणाडाळीचं पुरण करून पुरणपोळी केली जाते. काही ठिकाणी तुरीच्या आणि मुगाच्या डाळीपासून पुरण बनवूनही पुरणपोळी बनवली जाते. चणाडाळ आणि तूरडाळीच्या मानाने मुगाच्या डाळीच्या पुरणाची पुरणपोळी फार कमी ठिकाणी करतात.

राजस्थानच्या मारवाड भागात आणि गुजरातच्या कच्छ भागात मूगडाळीची पुरणपोळी बनवली जाते. कर्नाटकात मुगडाळ उबट्टी आणि नारळा उबट्टी असे पुरणपोळीचे दोन प्रकार केले जातात. आपल्याकडे जशी कटाच्या आमटीसोबत पुरण पोळी खाल्ली जाते तशी केरळ आणि तामिळनाडूमध्ये पायसमसोबत पुरणपोळी खाल्ली जाते.

पेशवेकाळात पुरणपोळ्या बनवल्या जायच्या. पानिपतच्या युद्धानंतर पुरणपोळीची ही पारंपरिक संस्कृती ठिकठिकाणी रुजवली गेली.

अब्दालीने वेगवेगळ्या देशांकडून पैसे घेतले होते. तो पानिपतचं युद्ध जिंकला पण त्यानंतर कंगाल झाला. युद्धातल्या काही कैद्यांना पानिपतच्या सरहद्दीवरच सोडलं गेलं, काही कैदी अब्दालीसोबत गेले तर काही जण तिथून पळून गेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले. जिथे जिथे ते राहीले तिथे तिथे त्यांनी पुरणपोळीची संस्कृती रुजवली.

आता त्या कुठल्याही ठिकाणी गेल्या तीनचार पिढ्यांपासून कुणी पुरणपोळी बघितलेलीही नाही. पण पुरणपोळी मराठी पक्वान्नांमधला एक महत्त्वाचा पदार्थ आहे हे त्यांना माहितीये. भारतातील प्राचीन राजघराण्यांच्या वंशजांनाही पुरणपोळीचं आजही महत्त्व आहे.

जपानमध्येही केली जाते पुरणपोळी :

 

puranpoli im

 

आपल्याला हे माहीत झाल्यावर आश्चर्य वाटेल पण अगदी जपानमध्येही पुरणपोळी केली जाते. फक्त आपल्याकडे पुरण बनवणं हे जसं जिकिरीचं काम असतं तसं ते जपानमध्ये नसतं.

चवळीसारख्या एका धान्यापासून तिथे पुरण बनवलं जातं ज्याला आंको असं म्हणतात. हे आंको घरी बनवलं जात नाही. तिथल्या बाजारांमध्ये ते उपलब्ध असतं. पुरणपोळीव्यतिरिक्त या आंकोपासून पॅनकेक, सॅन्डविच, केक आणि कुल्फी हे पदार्थही केले जातात.

पुरणपोळीव्यतिरिक्त कडबू, दिंडं, बोंडं, खीर असे अनेक पदार्थ महाराष्ट्रात केले जातात. मात्र पुरणपोळीची लोकप्रियता या सगळ्या पदार्थांपेक्षा बरीच जास्त आहे.

आपल्या उत्तम चवीमुळे पूर्वीचे अनेक पदार्थ सुदैवाने आजही कालबाह्य झालेले नाहीत. आपल्या आधीच्या पिढ्यांना त्यांचं जसं महत्त्व होतं तसं आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना असणार नाही.

पुरणपोळीचा इतिहास तर आपल्याला कळला. आपल्या आवडीच्या इतर पारंपरिक पदार्थांचा इतिहास आपल्याला कळेलच असं नाही. तरी या पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद आपल्याला पुढेही असाच लुटता यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?