' प्रेमासाठी कायपण! फेसबुकवरील प्रियकरासाठी बांग्लादेशातून ही बया चक्क पोहत भारतात आली! – InMarathi

प्रेमासाठी कायपण! फेसबुकवरील प्रियकरासाठी बांग्लादेशातून ही बया चक्क पोहत भारतात आली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्यार अंधा होता है, असा वापरुन गुळगुळीत झालेला डायलॉग आहे. प्रेमात पडलेले, वेडे झालेले लोक अधून मधून आपल्या कृतीतून हे सिध्दही करत असतात. असाच एक किस्सा घडला कोलकत्त्यात.

फेसबुकवर प्रेमात पडणं काही नविन गोष्ट राहिली नाही. मात्र काहीजणांच्या बाबतीत ऑनलाईन फ्लर्ट इतकंच हे प्रकरण रहात नाही. ते खरोखरंच अगदी जोरदार प्रेमात पडतात. इतके की त्यांना लग्न वगैरे करावसं वाटायला लागतं.

 

facebook affairs IM

 

आता हे ही काही फार विचित्र नाही मात्र सगळ्यांच्याच नशिबात पडलो प्रेमात, केलं लग्न. हे असं इतकं साधं सोपं समीकरण नसतं. जालिम दुनिया दुष्मन बनून प्रेमी युगुलात दिवार बनून उभी असते. कृष्णा मंडल आणि अभिक मंडल यांच्या प्रेमातला अडथळा मात्र वेगळा होता.

कायदा यांच्या प्रेमातली दिवार होता. त्याचं झालं असं की, कृष्णा ही बांग्लादेशची रहिवासी आहे आणि अभिक भारताचा नागरीक आहे. दोघांचा परिचय फेसबुकवर झाला आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला मात्र ते इतकं सहज शक्य होणारं नव्हतं कारण दोघांकडेही पासपोर्ट नव्हता.

पासपोर्ट शिवाय देशाबाहेर जाणं शक्य नसल्याने यांना लग्न करता येत नव्हतं. असल्या किरकोळ अडथळ्यांनी खचेल तर ते खरं प्रेम कसलं? नाही का? प्रेमात सुध बुध हरवलेल्या या युगुलानं एक अनोखा निर्णय घेतला.

 

marriage IM 2

 

अवघं २२ वय असणार्‍या कृष्णाने बेकायदेशिररित्या भारतात प्रवेश करण्याचं ठरवलं. त्यानुसार ती आधी सुंदरबनमधे दाखल झाली. भारत आणि बांगलादेश या दरम्यान असणारं सुंदरबन १० हजार वर्ग किमी क्षेत्रात पसरलेलं आहे.

जंगलाची, जंगली श्वापदांची भिती वगैरे काहीच वाटण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. तिला एकच ध्यास लागलेला, साजन के घर जाना है. सुंदरबनात वाघांची संख्या लक्षणीय आहे मात्र प्रेमात पडलेली ही वाघीण चार पायांच्या वाघांनाही न भिता बनातून प्रवास करत होती.

सुंदरबनानंतर आणखिन एक मोठा अडथळा होता आणि तो म्हणजे वाटेत लागणारी माल्टा नदी.

या बहाद्दरणीनं चक्क ही माल्टा नदीही पोहत पार केली. सिनेमात सात समंदर पार मैं तेरे पिछे पिछे आ गयी असं ठुमकत गाणारी नायिका काय करेल? असं धाडस वास्तवातल्या या प्रेमदिवाणीने केलं.

 

krishna mandal IM

 

माल्टा नदी पोहून पार करुन ती पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कैखली गावाच्या किनारी येऊन पोहोचली. या ठिकाणी तिचा सपनों का राजकुमार अभिक, कार घेऊन तयारच होता. माल्टा पोहून आलेल्या कृष्णासमवेत त्यानं थेट कोलकत्ता गाठलं आणि तिथे जाऊन त्यांनी एका देवळात लग्न केलं.

खरंतर एखाद्या प्रेमकहाणीचा हा साधासुधा, घिसापिटा शेवट होता. ॲण्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ़्टर! पण नाही. या युगुलाच्या बाबतीत नियती हसत होती आणि म्हणत होती, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.

लग्न करुन दोघे संसार करायला लागले मात्र अभिकच्या आजूबाजूला रहाणार्‍यात कृष्णा कुतुहलाचा विषय बनली. प्रेमाखातर नदी, सीमा ओलांडून आलेली स्त्री म्हणून तिची चर्चा होऊ लागली. ही चर्चा पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचली आणि पोलिस वाजत गाजत सरकारी वरात घेऊन कृष्णाच्या दारात दाखल झाले.

बेकायदेशिररित्या सीमा ओलांडल्या गुन्ह्याप्रकरणी कृष्णाला अटक करण्यात आली. एका लग्नाची गोष्ट ही अशी सुंदरबनातून माल्टा नदीतून पोलिसस्टेशनपर्यंत जाऊन संपली. कानून के लंबे हात हा या प्रेमी युगुलाचा नविन दुष्मन बनला आहे.

lady_justice-inmarathi

 

भारतीय पोलिसांनी एकदम विधीविधान से या नया नवेल्या दुल्हनला सीमेवर बांग्लादेशी दुतावासाकडे सुपूर्द केलं. आपल्या नव्या पत्नीला अशा प्रकारे विदाई करताना अभिकला प्रचंड दु:ख झालं मात्र काही इलाजही नव्हता.

कारण प्यार झुकता नही है हे खरं असलं तरिही प्यार की तरह कानून भी अंधा होता है आणि तो सगळ्यांसाठी सारखाच असतो. सच्च्या प्रेमापुढे मायेचा पाझर फक्त हिंदी सिनेमातल्या पोलिसांना फ़ुटतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?