' प्रत्येकाचे बोटांचे ठसे वेगळे असतात, यापलीकडे फिंगरप्रिंट्सबद्दल हे माहिती आहे का? – InMarathi

प्रत्येकाचे बोटांचे ठसे वेगळे असतात, यापलीकडे फिंगरप्रिंट्सबद्दल हे माहिती आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“हाताची पाचही बोटं सारखी नसतात” ही म्हण आपण सर्वांना माहीतच आहे. ही म्हण बऱ्याच उदाहरणांसाठी वापरली जाते; जसं की, सगळी माणसं सारखी नसतात किंवा सगळे दिवस सारखे नसतात वगैरे.

आपल्या प्रत्येकाच्या हातांची रचना थोडीफार वेगळी असते. आपण इतकं बारीक निरीक्षण करत नाही, पण हे एका अभ्यासात समोर आलं आहे की, आपल्या बोटांवर ज्या रेषा असतात त्यांची रचना सुद्धा प्रत्येक हातासाठी वेगळी असते. हे एक मोठं आश्चर्य आहे.

आपल्या बोटांचे ठसे अर्थातच फिंगर प्रिंट्सची आपल्याला या तीन वेळेस प्रकर्षाने आठवण येते:

१. ऑफिसमध्ये रोज सकाळी वेळेच्या आत ‘पंचिंग’ करतांना.
२. आधार कार्ड सारखं कोणतंही सरकारी ओळखपत्र काढून घेतांना आणि
३. ज्यांना सही करता येत नाही त्यांना बँकेतून पैसे काढतांना.

 

biometric-inmarathi

 

आपल्या बोटांचे ठसे आपली ओळख इतरांपासून वेगळी ठेवतात, हे आपण हिंदी सिनेमात पोलिसांना सापडणाऱ्या पिस्तूलाच्या उदाहरणावरून लहानपणीच बघितलं आहे. बोटांच्या ठश्यांवरून पोलीस शेवटी गुन्हेगारापर्यंत कसे पोहोचतात? हे आपण कितीतरी डिटेक्टिव्ह सिरीजमध्ये सुद्धा बघितलं आहे. रोमांचक कथेची उकल ही या बोटांच्या ठश्यांवरून होते हे बघणं, वाचणं हे खूप गमतीचं होतं.

आता हाताच्या दहा बोटांच्या ठश्यांबद्दल १० गमतीशीर बाबी जाणून घेऊया:

१. जेव्हा कोणतंही बाळ हे १०-१५ आठवड्याच्या वयाचं होतं, तेव्हा बोटांवर या रेषा दिसायला सुरुवात होते. या वयापर्यंत बोटं नुसतीच मऊ असतात आणि त्यांचं मऊ असणं हे रक्तवाहिन्या आणि त्यांना जोडणाऱ्या मांसपेशींमुळे असतं.

 

baby-finger-inmarathi

 

१०-१५ आठवडे म्हणजेच साधारणपणे बाळ ४ महिन्यांचं होत असताना बोटांवर असलेला मऊ भाग ज्याला ‘वोलर पॅड’ म्हणतात, तो आपोआ आत ओढला जातो. त्याचवेळी हाताची सुद्धा वाढ होत असते आणि या प्रक्रियेत हातावर ‘चढ उतार’ तयार होतात ज्यांना पुढे जाऊन बोटाचे ठसे हे नाव दिलं जातं.

२. आपल्या हातावरील बोटाचे ठसे हे आपल्या पालकांच्या हाताच्या बोटांच्या ठश्यांसोबत मिळते जुळते असतात. पण सारखे कधीच नसतात.

३. बोटाचे ठसे हे बाळाच्या आईच्या गर्भाशयातील हालचालींवर आणि गरोदर स्त्रीचा रक्तदाब यावर सुद्धा अवलंबून असतं.

४. बोटांच्या ठश्यांना ‘डर्मटोगिल्फ’ या वैज्ञानिक नावाने ओळखलं जातं. ज्यापैकी ‘डर्मा’ म्हणजे त्वचा आणि ‘गिलफिक्स’ म्हणजे एकरूप किंवा घट्ट. कायम आपल्या हातासोबतच असणाऱ्या या ठश्यांना हे नाव अगदी बरोबर आहे.

हे ही वाचा – डिफेन्स मिनिस्टरपासून आयफोनच्या सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देणारा चलाख चोर!

५. बोटांचे ठसे हे तीन प्रकारचे असतात:

अ. ‘लुप्स’: हे असे ठसे आहेत, जे अंगठयाकडे किंवा करंगळीच्या दिशेने जाणारे असतात. हे आपल्याला बघितल्यावर दिसणार नाही, पण एक्स-रे काढल्यावर हे लगेच लक्षात येऊ शकतं. ६०% लोकांच्या बोटाचे ठसे हे असेच असतात असं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.

ब. ‘व्होर्ल्स’: या प्रकारचे हाताचे ठसे हे थोडे गोलाकार पद्धतीचे असतात. हे सुद्धा आपल्याला पटकन लक्षात येत नाही. या प्रकारचे बोटाचे ठसे हे ३५% लोकांची असतात.

क. ‘आर्चेस’: कमानीप्रमाणे असलेले हे बोटाचे ठसे हे काही जणांना एखाद्या लाटे प्रमाणे सुद्धा वाटू शकतात. या प्रकारचे बोटाचे ठसे हे फार दुर्मिळ म्हणजे फक्त ५% लोकांमध्ये आढळतात.

 

finger-print-types-inmarathi

 

६. ‘चिंपॅन्झी’ या प्राण्यांच्या पायाचे ठसे हे माणसांच्या हाताच्या बोटांप्रमाणे असतात. दोन्ही ठसे आजूबाजूला ठेवले तर कोणते माणसाचे आणि कोणते या प्राण्यांचे हा प्रश्न पडतो इतकं यात साम्य आहे. मानवाच्या उत्पत्तीच्या इतिहासातील सर्वात शेवटचा टप्पा असलेला हा प्राणी सध्या फक्त ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो.

 

chimpanzee-inmarathi

 

७. जुळे किंवा तीळे जरी झाले, तरीही त्यांच्यासुद्धा बोटाचे ठसे हे वेगवेगळे असतात. बोटांचे ठसे हे गुणसूत्रांवरून न ठरता बाळाच्या जन्माच्या वेळी त्याची गर्भाशयात झालेली हालचाल कशी आहे यावर ठरत असते.

८. काही लोकांना बोटाचे ठसे म्हणजेच ‘फिंगरप्रिंट्स’चा अभाव असतो. ही एक आनुवंशिक समस्या आहे. अशा बाळाचे दात मजबूत नसतात आणि त्यांना जास्त घाम येत नाही हेसुद्धा समोर आलं आहे.

 

no-finger-prints-inmarathi

 

९. ‘प्लास्टिक सर्जरी’ ने काहीही बदललं जाऊ शकतं हे आपण मान्य करतो. मात्र बोटावरचे ठसे हे जसे असतात तसेच राहतात. हाताच्या बोटावर मेण लावणे हा प्रकार आपण सिनेमात बघितला आहे. पण, त्यामुळे तुमच्या बोटावरचे ठसे बदलत नाहीत. ठसे हे बोटांवर नसतात.ती बोटांच्या आतील भागांवर असलेली रचना आहे.

१०. बोटांच्या ठश्यांवरून तुम्ही कोणतं औषध घेतलं आहे? हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना सांगता येतं. हाताच्या बोटाच्या ठसे नीट असतील तर मृत्यूनंतर दहा मिनिटांच्या आत त्याने मृत्यूआधी काय खाल्लं? हे सुद्धा लक्षात येतं. ‘पोस्ट मॉर्टेम’च्या वेळी हाताच्या बोटांचा रिपोर्ट हा एक पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो.

सर्वात खात्रीलायक असलेल्या बोटांच्या ठश्यांमुळे कित्येक लोकांना न्याय मिळाला आहे ही एक समाधानाची बाब आहे. हाताच्या या चाचणीला इतरही जसं की डीएनए चाचणी, डोळ्यांची चाचणी, बोलण्याची चाचणी हे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. पण, या चाचण्या तुलनेने जास्त वेळ लावणाऱ्या आणि खर्चिक असतात.

आपल्या हाताच्या बोटांवर हे ठसे कसे तयार होतात आणि त्याचे प्रकार जाणून घेणं तुम्हाला सुद्धा आवडलं असेल हे नक्की! आपल्याला इतरांपासून वेगळं ठेवणाऱ्या हातांना नेहमी स्वच्छ ठेवा आणि स्वतःच्या आरोग्याचे रक्षक स्वतःच व्हा.

 

washing-hands-inmarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?