' अस्सल पैठणी ओळखायची कशी? बनावट आणि खऱ्या पैठणीत आहे एक मोठा फरक – InMarathi

अस्सल पैठणी ओळखायची कशी? बनावट आणि खऱ्या पैठणीत आहे एक मोठा फरक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ हा हट्ट कितीतरी जुना आहे. हा हट्ट पैठणी शंभर टक्के पूर्ण करते. नव्हे तीच तिची खासियत आहे. शांता शेळके यांनी पैठणी कवितेत आजीच्या पैठणीचे वर्णन किती सुरेख केले आहे.

महाराष्ट्राचे महावस्त्र अशी ओळख असलेली पैठणी हे ऑल टाईम हिट फॅशन आहे. एक काळ असा होता की पैठणी फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांचीच मक्तेदारी होती.

 

paithani inmarathi

 

पैठणी ही सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नव्हतीच, पण काळ बदलला. पैठणीमध्ये सेमी पैठणी आली आणि किंमती थोड्या परवडतील अशा झाल्या. त्यामुळे साधारण घरातील स्त्रियांची पैठणीची हौस काही अंशी तरी पूर्ण झाली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आता तर पैठणीचे ड्रेस मटेरिअल, पर्सेस, मोबाईल पाऊच, टॉप्स अशा अनेक प्रांतात आता पैठणीने मुशाफिरी केलेली आहे आणि विशेष म्हणजे महिलावर्गात हे ट्रेंड चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.

थोडक्यात, पैठणी आता केवळ साडी पुरती मर्यादित राहिलेली नाही. पैठणीच्या पर्सेस, मोबाईल पाऊच, टॉप्स, कुर्तीज या पैठणीइतक्याच महाग असतात पण तरीही ही फॅशन जोमात आहेच.

 

paithani dress inmarathi

 

पण अस्सल पैठणी कशी ओळखावी हा एक प्रश्नच आहे. कारण आता परत एकदा पैठणीचा ट्रेंड जोरात आहे, त्यामुळे अस्सल नसलेली पैठणी पण अस्सल आहे असे सांगून विकायची अपप्रवृत्ती वाढू लागली आहे.

असली पैठणी अतिशय महाग असते. अगदी सात ते दहा हजारांपासून लाखाच्या घरात हिचे दर असतात. का इतके जास्त दर असतात या पैठणीचे?

पैठणी इतकी महाग का असते? आणि ती खरी पैठणी आहे का? कशी ओळखायची ती खरी पैठणी? रिअल पैठणी म्हणून दुकानदार आपली गळ्यात बनावट पैठणी तर मारत नसेल ना? काय आहेत खरी पैठणी ओळखायचे निकष?

पैठणी दोन प्रकारे विणली जाते. त्या विणकामानुसार त्याचे दोन प्रकार आहेत.

१. हातमागावर विणलेली पैठणी

२. मशीनवर विणलेली पैठणी 

हातमागावर विणली जाणारी पैठणी ही फार महाग असते. कारण हीच अस्सल पैठणी असते. ही पैठणी विणायला खूप मेहनत आणि वेळही लागतो.

 

paithani im 1

 

या पैठणीचा पोत, रंग डिझाईन अतिशय सुंदर असतो. त्याचमुळे ही पैठणी खूप किंमत घेते. पैठणीच्या पदरावर जे मोरांचे डिझाईन असते ते उलट आणि सुलट बाजूला एकसारखे दिसते.

या पैठणीचा पदर आणि बॉर्डर एकसारखेच असतात. यात धागा कुठेही कापलेला नसतो. सलग विणकाम असते. अस्सल पैठणीच्या विणकामात रेशीम आणि सोन्याची जर पण वापरतात. त्यामुळे या पैठणीचे काठ वर्षानुवर्षे तसेच्या तसे राहू शकतात. त्याला कधीही काळेपणा येत नाही.

तीन चार पिढ्या ती पैठणी वापरू शकतील इतके मजबूत विणकाम हातमागावर विणलेल्या पैठणीचे असते. अस्सल पैठणी ही हातमागावरच तयार केली जाते.

एक पैठणी तयार होण्यासाठी एक महिना इतका काळ लागतो. येवला आणि पैठण या दोन शहरात ही पैठणी तयार होते. शुद्ध जर आणि रेशीम वापरून तयार केलेल्या पैठणीची किंमत १० हजार ते २५ हजार पर्यंत असते. सोने वापरले तर लाखाच्या घरात जाते.

थोडक्यात अस्सल जर रेशीम आणि कामगाराची मेहनत या गोष्टी अस्सल पैठणीची किंमत वाढवतात.

 

paithani saree inmarathi

 

अस्सल पैठणी घेताना काय बघाल?

१. पदर आणि बॉर्डर एकसारखी आहे का?

२. विणकामाचे धागे आतून दिसत नाहीत ना?

३. पैठणीचे विणकाम आतून आणि बाहेरून एकसारखेच दिसते आहे ना?

४. तलमपणा जाणवतो का?

जर या सर्वांचे उत्तर हो असेल तर डोळे मिटून ती पैठणी घ्या. अन्यथा समजून चला की मशीन मेड पैठणी दुकानदार आपल्याला अस्सल म्हणून विकत आहे.

हे निकष तपासून तुम्ही अस्सल पैठणी ओळखून खरेदी करू शकता आणि याहून सोपे म्हणजे जे परंपरागत पैठणी विकणारे, बनवून देणारे विश्वासार्ह लोक आहेत त्यांच्याकडूनच खरेदी करा.

 

paithani im 2

 

मशिनवरील पैठणी-

ही पैठणी हातमागावरील पैठणीपेक्षा हलकी असते. तिचे डिझाईन आतील बाजूला किंचित वेगळे जाणवते. आतील बाजूला त्या विणकामाचे धागे दिसून येतात.

त्या पैठणीच्या पदराला आतून नेट लावल्याशिवाय नेसताच येत नाही. कारण मोराचे किंवा इतर डिझाईन तयार करताना इतके धागे दिसत असतात की, ते धागे सहजासहजी जाता-येता कुठे न कुठे अडकून त्या साडीचा ग्रेस घालवू शकतात.

तिची जर काही काळाने काळपट पडते. मशिनवरील पैठणीचा पोत हा हातमागावरील पैठणीपेक्षा थोडासा रफ असतो. त्यामुळे मशीन वरील पैठणी फक्त बजेटमधील हौस म्हणूनच घेता येते.

पण ज्यांना अस्सल पैठणीच हवी आहे त्यांनी नीट पाहून मगच खरेदी करावी. शेवटी जर खूप पैसे घालून तुम्ही एखादी वस्तू घेत असाल, तर त्याची पारख करून मगच घ्यायला हवी नाहीतर पैसा गेला आणि त्या दर्जाची वस्तू न मिळता फसवणूक झाली तर ते खूपच त्रासदायक होते. म्हणून थोडीशी काळजी घ्या, तपासून बघा आणि मस्त पैठणी खरेदी करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?