“कठीणसमय येता धोनी कामास येतो” – हॅप्पी बर्थडे माही !!!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – अभिजित देशपांडे
—
महेंद्रसिंग धोनी – बस नाम हि काफी है!!!
भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेलेला खेळाडू!!! जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट मधल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंची नावं घेतली जातील – महेंद्र सिंग धोनी हे नाव त्या यादीत अग्रणी असेल….
माही रांचीसारख्या छोट्या शहरातून येऊन भारतीय क्रिकेट संघाला तू दिलेले योगदान हे अतुलनीय आहे. राष्ट्रीय संघात विकेटकिपर म्हणून आलास आणि स्थिरावलास तो मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून!

धावांचा पाठलाग करताना कुठल्याही दडपणाशिवाय खेळण्याची क्षमता बाळगून कित्येक सामने कठीण परिस्थितीत तू भारतीय संघाला सहज जिंकून दिलेस आणि “कठीणसमय येता धोनी कामास येतो” असं समीकरणच आम्हा तमाम भारतीय क्रिकेटरसिकांसाठी तू तयार करून ठेवलंस…..
तुझ्याबद्दल आवडणाऱ्या कित्त्येक गोष्टींपैकी एक म्हणजे तुझं मैदानावरचं सहज आणि शांत अस्तित्व!!! एक चॅम्पियन खेळाडू म्हणून तू जपलेल्या मर्यादा आणि जोपासलेली खिलाडूवृत्ती या गोष्टी तुला खूप मोठे करून जातात.
तुझ्यातल्या Streetsmart क्रिकेटरने तर प्रेक्षकांचीच नाही तर समीक्षक आणि दिग्गज खेळाडूंचीसुद्धा कायमच वाहवा मिळवली, मग ते बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात एका हातातला ग्लोव्ह काढून चित्त्याच्या चपळाईने केलेला रन आऊट असो, कि इंग्लंडविरुद्ध स्टम्प्सकडे पाठमोरा उभा राहून घेतलेली रन आऊट विकेट, विजेच्या गतीने केलेले स्टंपिंग्स आणि तितक्याच स्फूर्तीने घेतलेल्या कॅचेस!!!
जेव्हा जेव्हा तुझ्या क्रिकेटिंग करिअर बद्दल बोलले जाईल तेव्हा तेव्हा तुझ्या फलंदाजी आणि कर्णधार म्हणून साध्य केलेल्या रेकॉर्ड्सचीच जास्त चर्चा होईल आणि हा तुझ्यातल्या एका क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासातल्या सर्वोत्कृष्ट विकेटकीपरवर अन्याय असेल.
एका छोट्या शहरातून येऊन एवढे उत्तुंग यश मिळवूनसुद्धा तुझे पाय कायमच जमिनीवर राहिले आणि यातूनच तू पुढच्या कित्त्येक पिढ्यांसमोर एक आदर्श घालून ठेवलायस.
एक खेळाडू, एक लीडर, आणि भारतीय क्रिकेटचा अविभाज्य घटक बनून भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल समस्त क्रिकेट चाहते आणि देश तुझा कायमच ऋणी राहील…
भारतीय क्रिकेटमधल्या तुझ्या गौरवशाली कारकिर्दीला सलाम आणि खूप साऱ्या शुभेच्छा!!!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com |वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com | त्या मतांशी सहमत असेलच असं नाही.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.