' जागृत व्हा: तुमची दुधाची पिशवी कापण्याची पद्धत पर्यावरणाच्या विनाशास हातभार लावतीये – InMarathi

जागृत व्हा: तुमची दुधाची पिशवी कापण्याची पद्धत पर्यावरणाच्या विनाशास हातभार लावतीये

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या काही वर्षात आपण सर्वचजण काही प्रमाणात कचर्‍याच्या व्यवस्थापनाविषयी थोडे जागृत झालेलो आहोत. पंतप्रधान मोदींनी राबविलेल्या मोहिमेनुसार प्लॅस्तिकचा कमीत कमी वापर आणि पर्यायानं कचरा निर्मितीवर थोडंफ़ार का होईना नियंत्रण आपण आणलेलं आहे.

या मोहिमेचाच एक भाग म्हणून भाजीवाल्यांकडे सर्रास मिळणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या बंद झालेल्या आहेत. लोकांना कापडी पिशवी बाळगणं सवयीचं झालेलं आहे.

 

plastic bags IM

 

कापडाच्या वगैरे दुकानांमधून पूर्वी प्लॅस्टिअकच्या पिशवीतून सामान दिलं जायचं ते आता सुती किंवा कागदी पिशव्यांमधून दिलं जात आहे. सुरवातीला जरी हे कटकटीचं वाटलं असलं तरिही आता लोकांच्या अंगवळणी पडलं आहे.

ओला कचरा आणि सुका कचरा ही विभागणी घरातूनच केली जात असून आता दोन्ही कचरे वेगवेगळे गोळा केले जातात. पर्यावरणाच्या दृष्टीनं हे खूप मोठं पाऊल आहे. कारण या दोन्ही प्रकारच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याच्या पध्दतीत फरक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे असं असलं तरी अजूनही अजाणता आपण अशा काही चुका करत आहोत की यानं हा उद्देश पूर्णपणे सफल होऊ शकत नाहीये. काही अशा सवयी ज्यामुळे आपण अजूनही प्लॅस्टिकला पर्यावरण घातक बनवत आहोत. कसं?

तर पहा, तुमच्याकडेही बहुसंख्यांकडे येतं तसं पॅकेट दूध येतं? तुमच्याही घरात मसाल्याची, चिप्सची पाकिटं येतात? आता नीट लक्षात घ्या, ही पाकिटं तुम्ही कशी कापता? तर दूध किंवा तेलाची किंवा तत्सम पातळ पदार्थ असणारी पाकिटं साधारणपणे कोपरे कापण्याची पध्दत आहे.

 

milk bags 2 IM

 

या कापलेल्या छोट्या त्रिकोणी कोपरांचं पुढे काय होतं? मसाले किंवा चिप्सच्या पाकिटांची वरची कड कापून टाकली जाते. या कडेचं पुढे काय होतं? या छोट्या तुकड्यांना मायक्रोप्लॅस्टिक म्हणलं जातं.

जर हे तुकडे एखाद्या नॉन बायोडिग्रेडेबल बिनमधे टाकले गेले तर हे सगळे छोटे छोटे तुकडे पुढे जातात आणि आपल्या इको सिस्टिममधे प्रवेश करतात आणि प्राणीमात्रांना हानी पोह्चवितात, मायक्रोबीडस पाण्यात प्रवेश करतात आणि नकळतपणे समुद्रीजीव यांना खातात आणि त्यांचा मृत्यू होतो.

त्याशिवाय हे छोटे तुकडे लॅण्ड्फीलचा मार्गदेखील शोधते आणि प्रवाही पाण्यात अडथळा बनते. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की दुधाच्या पॅकेटच्या छोट्या त्रिकोणी कडा प्रतीवर्षी प्लॅस्टिकच्या कचर्‍यात चिंताजनक आकडेवारीत योगदान देत आहे.

दररोज घरोघरीच्या या फेकून दिलेल्या कचर्‍यातील एक तृतियांश ब्रॅण्डेड प्लॅस्टिक डेअरी उत्पादनाच्या पॅकेजमधून येते.

 

milk plastic waste IM

 

दुधाच्या पाकिटापासून तयार होणारे हे मायक्रोसीडस लॅण्डफ़ीलमधे वर्षानुवर्षे एकत्र पडून रहातात, साचत रहातात आणि जेंव्हा उन्हाळ्यात आग लागते तेव्हा जळताना क्लोरिनयुक्त प्लॅस्टिक कर्करोगास कारणीभूत ठरणारे फ़्युरन्स आणि डायऑक्सिन तयार करतात.

२०१९ साली कर्नाटक भाजपच्या उपाध्यक्षा तेजस्विनि अनंथकुमार यांचे एक ट्विट व्हायरल झाले होते. त्यांनी यात म्हणलं होतं की, एकट्या बेंगळूरुनं दुधाची पाकिटं योग्य कापली तर ५०,००,००० लहान प्लॅस्टिकचे तुकडे कचर्‍यात जाणं थांबवू शकतं.

 

milk bags 3 IM

 

आता कल्पना करा ही आकडेवारी फक्त एका शहराची आहे. संपूर्ण देशात याची आकडेवारी काय असेल? म्हणूनच त्याला काय होतंय? ही भूमिका थांबवा आणि दुधाच्या, तेलाच्या पिशव्या काळजीपूर्वक कापा.

दुधाचे पॅकेट लो डेन्सिटी पॉलिथिन (LDPE) चे बनलेले असते, जे प्लॅस्टिकचा उपवर्ग आहे. पुनर्वापरासाठी या प्रकारच्या प्लॅस्टिकला उच्च तापमान आणि विशिष्ट आकारात संकुचित करावे लागते. जर हे छोटे तुकडे रिसायकलींग युनिटपर्यंत पोहोचले नाहीत तर ते मायक्रोप्लॅस्टिकमधे विघटीत होतात.

पाऊस आणि वार्‍याने हे तुकडे ड्रेनेज सिस्टिममधे जाऊन अडकतात. दुधाच्या पाकिटांशिवाय पीईटी बाटल्यांच्या टोप्या, शीतपेयांच्या बाटल्यांचे क्राऊन कॉर्क देखील उच्च रिसायकल व्हॅल्यू असणारे आहेत परंतू हे देखिल रिसायकल युनिटपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

पिशवी कशी कापाल?

 

milk bags cut 2 IM

 

वरच्या बाजूने समांतर असा कट द्या आणि याला पिशवीपासून सुटं करू नका. समजा चुकून कड कापलीच तर ती मोठ्या पाकिटात घालूनच सुक्या कचर्‍यात टाका.

खरंतर ही अगदी छोटीशी कृती आहे, जी जाणीवपूर्वक केली, ही सवय अंगी बाळगली तर पर्यावरणाची खूप मोठी हानी आपण वाचवू शकणार आहोत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?