Site icon InMarathi

राज ठाकरेंच्या सभा गाजण्यामागे आहे खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला कानमंत्र!

raj balasaheb 1 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘होणार होणार’ म्हणून गाजत असलेले राज ठाकरे यांचे भाषण अखेर रविवारी पुण्यात रंगले आणि माध्यमांमध्ये ही ब्रेकिंग न्युज आवडीने पाहिली गेली. त्याची तीन कारणे होती, पहिले कारण राज यांच्या नावात ‘ठाकरे’ हा शब्द आहे आणि ठाकरे हे नाव राजकीय बातम्यांच्या विषयासाठी पुरेसे असते.

दुसरे कारण राज ठाकरे यांची भाषणशैली बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणासारखी आहे. त्यामुळे हे भाषण गाजले आणि तिसरे कारण म्हणजे राज यांनी विरोधकांवर जबरदस्त तोफ डागली आणि आक्रमक शैलीत हिंदुत्वाचा विषय मांडला.

 

 

मित्रांनो विषय तसा हार्ड आहे. आता भाषण करणे काय खाऊचे काम आहे का? आपले पूर्वज पण सांगून गेले जेव्हा दहा हजार लोक जन्माला येतात त्यातला एक कोणीतरी वक्ता होतो. ‘वक्ता दशसहस्त्रेषू’ म्हणतात ते काय उगाच नाही.

तर मुद्दा म्हणजे चार लोकांसमोर बोलणे आणि नुसतेच न बोलता आपला मुद्दा पटवून देणे खरच कौशल्याचे काम आहे. त्यात जर समोर भाषण ऐकणारे पब्लिक रांगड्या मातीमधील असेल तर प्रसंगी वक्त्याला सुद्धा धोबीपछाड देणार असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तर मुद्दा हा की भाषण, आता भाषण करणारे बरेच असतात त्यात वक्ता आणि प्रवक्ता दे दोन मुख्य गडी. त्यातही वक्ता महत्वाचा. आता तुम्ही म्हणाल की हे वक्त्याचं नमन का बारे लावलंय? याला एकाच कारण, ते म्हणजे ,”लाव रे तो विडियो.? ” काय लागली का टोटल? राज ठाकरे !

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा वारसा लाभलेले त्यांच्यासारखेच मनस्वी, कलाकार आणि वादळी व्यक्तिमत्व.

आज राज ठाकरेंची सभा म्हटले की डोळ्यासमोर बाळासाहेबांच्या तुडुंब भरलेल्या सभेची आठवण येईल इतकी गर्दी निश्चितच असते. हा तोच करिश्मा राज यांच्याकडे आहे जो बाळासाहेबांच्या वक्तृत्वात होता.

 

 

पण मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का? की राज पूर्वी भाषण करायला कचरत असत. पण बाळासाहेबांनी दिलेल्या एका कानमंत्राने राज यांची सभा देखील गर्दी खेचते. तुम्हालाही हवाय का तो कानमंत्र? वाचा तर मग

एका मुलाखतीत राज यांनी एक आठवण सांगितली होती, विद्यार्थी सेनेत काम करत असताना एकदा फी वाढीविरोधात मुंबईत एक मोर्चा काढला गेला होता. हा मोर्चा राज यांच्या आयुष्यातील पहिलाच मोर्चा होता. त्यावेळी ते भाषणं वगैरे करत नसत. पण मोर्चा संपल्यानंतर त्यांनी २-४ मिनिटांचं एक छोटसं भाषण केलं होतं.

दरम्यान भाषण ऐकण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने जवळच्या फोन बुथवरून बाळासाहेबांना फोन करून हे भाषण ऐकवलं होतं. फोनवरून भाषण ऐकल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी राजना घरी बोलावून घेतलं होतं.

 

 

बाळासाहेबांची झोपायची वेळ झालेली असूनही ते जागे होते. राज घरी आल्यानंतर त्यांनी म्हटलं की, “माझ्या बापाने मला जे सांगितलं ते आज मी तुला सांगतोय. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल. आपण किती हुशार आहोत, हे भाषणातून कधी सांगू नको. लोकं कशी हुशार होतील, हे भाषणातून येऊ देत. आज मी काय बोललो यापेक्षा आज मी भाषणातून काय दिलं, याचा विचार करून भाषण कर,” असा कानमंत्र बाळासाहेबांनी राज ठाकरेंना दिला होता.

बाळासाहेबांचा हाच कानमंत्र राज ठाकरेंना आजही उपयोगी पडत आहे. तुम्हीही हे पहात असालच की राज यांच्या कोणत्याही भाषणातील मुद्दे हे तमाम पब्लिकवर गारुड करणारे असतात. त्यांचे भाषण म्हणजे कानाला झणझणीत मेजवानी असते.

राज म्हणतात ,”मी राजकारणी असल्याने माझी बोलण्याची शैली वेगळी आहे. लोक म्हणतात राज ठाकरे हुबेहूब बाळासाहेबांच्या शैलीत भाषण देतात. मात्र मला याची संधी बाळासाहेबांमुळेच मिळाली. मला बाळासाहेबांनी पहिल्यांदा भाषण करण्याची संधी थेट शिवतीर्थावर दिली. त्यांनी दिलेल्या संधींमुळेचं आज मी सभेत भाषण ठोकतो.

मी शाळेत असताना मला वक्तृत्व स्पर्धेची भीती वाटायची, पण जे बोलत त्यांचे कुतूहल वाटायचे. लहानपणापासून मी बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकले आहेच, पण त्याचसोबत जाॅर्ज फर्नांडिस, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेकांची भाषणे ऐकली पण मी भाषण करेन, असे मला वाटले नव्हते.

१९९२ ला बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानच्या टिमला भारतात खेळू देणार नाही, असे दसऱ्याच्या मेळाव्यात सांगितले आणि त्यानंतर पाकिस्तानने दौरा रद्द केला. हा आपला विजय असल्याने शिवाजी पार्कवर विजयी मेळावा घेण्याची कल्पना राज यांनी बाळासाहेबांना सुचवली, ते त्यास तयार देखील झाले.

 

 

सभेत ५० फुटी पाकिस्तानी रावण तयार केला गेला होता, संपूर्ण शिवाजी पार्क भरले होते, व्यासपीठावर सगळे बसलेले असतांना राज यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मला ‘तू बोलणार आहेस ना?’ असे विचारले. त्यावर राज त्यांना ‘‘असले काही करू नका मी येथून निघून जाईन’’ असे सांगितले.

त्यानंतरही त्यांनी राज यांना शिवाजी पार्कवर ऐनवेळी भाषण करायला लावले. हे ठरले राज यांचे अधिकृत पहिले भाषण!.

 

 

मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांनी राज यांना जो कानमंत्र दिला त्याचा परिपाक म्हणजे राज यांच्या भाषणाची मुलुख-मैदान तोफ! कोणी काही म्हणो, राजकीय विश्लेषक काही मत व्यक्त करोत सबळ पुराव्यांसोबत आपल्या विरोधकांना निरुत्तर करणार्‍या राज यांनी बाळासाहेबांचा कानमंत्र आजअखेर जपला आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version