Site icon InMarathi

एकेकाळी हाताने तयार केलं जाणारं आईस्क्रीम पोहोचलं ४५ देशांमध्ये! ही गोष्ट मराठी उद्योजकांनी वाचायलाच हवी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उन्हाळा आणि आइसक्रीम यांचे नाते टॉम आणि जेरी यांच्यासारखे! उन्हाळा आहे आणि आइसक्रीम खाली नाही असे कधीच होत नाही.

 

 

आजकाल तर कोणत्याही मौसमात, कोणत्याही वेळी अगदी स्वीट डिश म्हणून सुदधा आइसक्रीम खाले जाते. वेगवेगळ्या रंगांची, चवींची आईस्क्रीम्स पाहताना, त्यांचा आस्वाद घेताना प्रत्येक लहान थोरांच्या डोळ्यात आलेली चमक आपण सहज पाहू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बाजारात आजकाल अनेक कंपन्यांची आईस्क्रीम्स मिळतात. काही स्थानिक मंडळी थोड्या प्रमाणात आपले वेगळेपण जपत आईसक्रीमचे भन्नाट प्रकार आपल्यासमोर पेश करतात.

जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकांना आईस्क्रीमची चव देणारे मोजकेच ब्रँड होते, त्यापैकी एक म्हणजे गुजरातचा ‘वाडीलाल ब्रँड (वाडीलाल))’ , हा ब्रँड चार पिढ्यांपासून प्रत्येकाला आईस्क्रीमची चव देत आहे. वाडीलाल आईसक्रीमने पारंपारिक कोठी (हाताने चालवलेले देशी आईस्क्रीम मशीन) तंत्रज्ञान वापरून आईस्क्रीम विकण्यास सुरुवात केली,

 

 

आज ते आपल्यासाठी २०० हून अधिक फ्लेवर्सची आइसक्रीम बनवत आहेत. पण त्यापूर्वी या ब्रँडची सुरवात फाऊंटन सोडा विकण्यापासून झाली होती हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? चला तर मग जाणून घेवूया वाडीलाल आइसक्रीम ची गोष्ट.

वाडीलाल गांधी अहमदाबादचे रहिवासी होते, त्यांनी १९७० मध्ये वाडीलालची सुरुवात केली, त्यावेळी ते सोडा विकायचे तसेच कोठी तंत्राने आईस्क्रीम बनवायचे. सुरुवातीला हाताने चालवल्या जाणार्‍या यंत्राचा वापर करून बर्फ मीठ आणि दूध मिसळून आईस्क्रीम बनवले जात असे.

 

 

वाडीलाल गांधी हे त्यावेळी थर्माकोलच्या डब्यात आईस्क्रीम ठेवून होम डिलिव्हरी करायचे.त्यांचा व्यवसाय खूप यशस्वी झाला, नंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय त्यांचा मुलगा रणछोड लाल गांधी यांच्याकडे सोपवला, १९२६ मध्ये त्यांनी मशिनने आईस्क्रीम बनवण्यास सुरुवात केली, आईसक्रीमच्या टेंम्प्टिंग चविमुळे खूप कमी कालावधीत ते सर्वांच्या पसंतीस उतरले आणि काही दिवसांतच अहमदाबादमध्ये वाडीलालचे आणखी चार आऊटलेट्स सुरू झाले.

 

 

 

१९५० मध्ये त्यांनी आयकॉनिक इंटरनॅशनल फ्लेवर्ड कॅसाटा आईस्क्रीम बाजारात आणले, जे आईस्क्रीम्स च्या रेंज मधले युएसपी ठरले. वाडीलालने वेळोवेळी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आपल्या उत्पादनामध्ये अनेक बदल केले आहेत, मग ते फ्लेवर्स असो किंवा नवीन तंत्रज्ञान असो किंवा आईस्क्रीमचे पॅकेजिंग असो. वाडीलाल नेहमी आपल्या ग्राहकांसाठी काहीतरी नवीन करण्याचा विचार करतात.

डेझर्ट जेवणाच्या शेवटी नव्हे सुरुवातीला खावेत, वाचा आयुर्वेद काय सांगतंय…

उन्हाची काहिली घालवणारी कुल्फी सुद्धा थेट मोघलांच्या काळापासून अस्तित्वात आहे…

१९९१ मध्ये, वाडीलालने आईस्क्रीम व्यतिरिक्त प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि वाडीलाल क्विक ट्रीट सुरू केली , ज्यामध्ये फ्रोझन स्प्राउट्स, भाज्या, फळे, फळांचा लगदा, मिठाईसह सहज तयार करता येणार्‍या रेडी तो कुक पदार्थांचा समावेश आहे.

१९९५ मध्ये अमेरिकेत गोठवलेल्या भाज्या आणणारा वाडीलाल हा पहिला भारतीय ब्रँड बनला. कंपनीचे सीएफओ कपिल गांधी सांगतात की, त्यांच्या कंपनीची फ्रोझन उत्पादने परदेशात चांगलीच पसंत केली जातात, तसेच वाडीलाल हा अमेरिकेत सर्वाधिक विकला जाणारा भारतीय ब्रँड आहे.

 

 

 

आज वाडीलालच्या ४५ देशांमध्ये शाखा आहेत. जेव्हा सर्व आइस्क्रीम कंपन्या वाईट टप्प्यातून जात होत्या, तेव्हा वाडीलालने वन ऑन वन आइस्क्रीम फ्री योजना सुरू केली, जी आजपर्यंत लोकप्रिय आहे.

२०११ मध्ये वाडीलालने बडाबाईट, फ्लिंगो आणि गोरमेट सारखी प्रीमियम आइस्क्रीम लॉन्च केली, त्यानंतर वाडीलालला भारतीय आईस्क्रीम मार्केटमध्ये एक वेगळी ओळख मिळाली.

 

 

१९७० च्या दशकात बहुराष्ट्रीय आइस्क्रीम कंपन्या भारतात येण्यास सुरुवात झाली तेव्हा वाडीलालने भारतीय आईस्क्रीम मार्केटमध्ये शाकाहारामुळे आधीच वर्चस्व गाजवले होते. या कारणास्तव, वाडीलालची पहिली पंच लाईन होती – “उपवासाचे आईस्क्रीम”. वाडीलाल यांनी आपल्या मेहनतीने ग्राहकांना आवडतील असे फ्लेवर्स तयार करत आपल्या गुणवत्तेत सातत्य तर ठेवलेच आहे पण देश-विदेशातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

 

 

दररोज ८ लाख कप, १० लाख कँडीज, ६ लाख कोन, १ टन ड्राय फ्रूट्स आणि ३ टन द्रव चॉकलेट चे उत्पादन केले जाते ज्याची चव जगातील ४५ देशांतील लोकांची मने जिंकत आहे. वाडीलाल त्याच्या जाहिराती आणि ब्रँडिंगवर देखील खूप लक्ष देतो, आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो – “हर दिल बोले वाह वाडीलाल!” ,

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version