' गुजरातच्या ३ जिल्ह्यांमध्ये अवकाशातून पडत आहेत रहस्यमयी वस्तू: वाचा नक्की प्रकार काय आहे! – InMarathi

गुजरातच्या ३ जिल्ह्यांमध्ये अवकाशातून पडत आहेत रहस्यमयी वस्तू: वाचा नक्की प्रकार काय आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

निसर्गाने मानवाला कायमच विस्मयचकित केलेलं आहे. मग ते कधी अत्यंत मनोहर अशी स्थळं दाखवून तर कधी फारच विध्वसंक रूप घेऊन!

 

water 2 im

 

विज्ञानाने जरी प्रचंड प्रगती केली असली, तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगत होत असलं तरी अशी एक शक्ती आहे जी विज्ञानापेक्षाही मोठी आहे, कायम असणार आहे याची जाणीव निसर्ग आपल्याला वेळोवेळी करून देत आलेला आहे. म्हणूनच अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत या भ्रमात आपण असतो तेव्हातेव्हा आपल्याला या भ्रमातून खाड्कन जागं करत वस्तुस्थिती अशी नाही याची जाणीव आपल्याला निसर्ग करून देतो. कोरोना हे त्याचं अगदी चपखल उदाहरण म्हणता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आजही निसर्गात अशी अनेक गूढं आहेत ज्यांची उकल करता आलेली नाही. आकाशातून गारा, तारे, उल्का पडतात हे आपल्याला माहितीये. पण आपलं आयुष्य रोजच्यासारखं सुरू असताना अचानक एक दिवस आकाशातून एक मोठा गोळाच खाली पडला तर? हे अचानक काय घडलं असं वाटून कुणीही आधी घाबरून जाईल आणि मग आकाशातून पडलेली ही अज्ञात वस्तू आपल्यासाठी धोकादायक तर नसेल असं वाटून जास्तच घाबरेल. अशीच काहीशी घटना गुजरातच्या ३ जिल्ह्यांमध्ये नुकतीच घडली आहे.

या ३ जिल्ह्यांमध्ये आकाशातून रहस्यमयी असे धातूचे गोळे पडलेत. तिथल्या नागरिकांची यावर काय प्रतिक्रिया होती? त्या गोळ्यांचं नंतर काय केलं गेलं? जाणून घेऊ.

 

metle im

 

१२ तारखेला गुरुवारी संध्याकाळी सुमारे ४.४५ वाजता गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील भालेज येथे साधारण ५ किलोचा एक काळ्या रंगाच्या धातूचा गोळा आकाशातून खाली पडला. त्यानंतर खंभोलज आणि रामपुरा या ठिकाणीही आकाशातून असेच गोळे खाली पडले. ही गावं एकमेकांपासून १५ किलोमीटरच्या अंतरावर आहेत.

जमिनीवर काहीतरी जोरात पडल्याचा आवाज ऐकून या तिन्ही गावांमधले गावकरी बाहेर आले. आकाशातून एक ‘उल्का’ सदृश्य वस्तू खाली पडल्याचं त्यांना दिसलं. हा गोळा पाहून गावकरी चकित झाले आणि भूकंप झाला की काय अशी भीती वाटून पटकन आपापल्या घरांतून बाहेर पडले.

खंभोलजमधील एका घरावरच्या कथिलाच्या छताचं यातल्या एका गोळ्यामुळे नुकसान झालं. या तिन्ही गावातल्या गावकऱ्यांनी घाबरून जाऊन आपापल्या ठिकाणच्या पोलिसांना घडलेला वृत्तांत सांगितला आणि काय घडलंय ते पाहायला कर्मचारी तिथे पोहोचले.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार हा धातूचा गोळा मोडतोड झालेला उपग्रह असल्याचा संशय आहे. आणंद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजित राजियान म्हणाले, “संध्याकाळी ४.४५ च्या सुमारास पहिला गोळा पडला आणि त्यानंतर थोड्याच वेळात दुसऱ्या दोन ठिकाणांहून अशीच वृत्तं समोर आली. सुदैवाने कुणालाही काही दुखापत किंवा अपघात झाला नाही,

ही आहेत ६ पाण्याखालील प्राचीन आणि अज्ञात शहरे! वाचा काय आहे रहस्य…

या अजब मंदिरात होतात अशा काही गोष्टी ज्यांची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल!

खंभोलजमधल्या एका घरावर हा गोळा पडला तर दुसऱ्या दोन ठिकाणी हा गोळा खुल्या परिसरात पडला. हा नेमका कसला गोळा आहे हे आम्हाला कळू शकलेलं नाही. पण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा गोळा आकाशातून खाली पडला आहे.” जिल्हा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून यासंदर्भात तपास करण्यासाठी त्यांनी ‘फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी’च्या तज्ञांना बोलावलं आहे. हा धातूचा गोळा एका उपग्रहाचा अवशेष असल्याचा संशय आहे. हे गोळे कदाचित रॉकेटचे भाग असल्याचाही संशय आहे. या वस्तू मिश्रधातूंपासून बनलेल्या असून त्यांची घनता जास्त आहे अशी माहिती आणंद पोलीस अधीक्षक राजियान यांनी दिली.

 

metle balls im

 

या गोळ्यांमुळे वनस्पती, माणसं, प्राणी यांच्यावर परिणाम होणार नाही ना याचा शोध फॉरेन्सिक सायन्सचे तज्ञ घेत आहेत. १४ मे ला भलेजपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडा जिल्ह्यातील चकलासी या गावात असाच एक गोळा सापडला. १४ तारखेला वडोदऱ्यातील सावली या गावातही असाच एक गोळा सापडला.

बडोरा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रोहन आनंद यांनी सावली गावात सापडलेल्या वस्तू तपासण्यासाठी गांधीनगर येथील फॉरेन्सिक सायन्स संचनालयाकडे पाठवल्या आहेत.

या दरम्यान, राजियन यांनी खंभोजल, भालेज आणि रामपुरा येथे ३ वेगवेगळ्या टीम्स पाठवल्या आहेत. ते म्हणाले, “सुरुवातीला या वस्तू नेमक्या काय आहेत हे आमच्या लक्षात आलं नव्हतं आणि या तिन्ही ठिकाणी आधीच गर्दी जमा झाली होती. सध्या ते अवकाशात गुरुत्व बल नसताना अवकाशात उपग्रहांचा वेग तसाच ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे गोळे आहेत असं वाटतंय. या वस्तू काय आहेत हे ओळखण्यासाठी मदत व्हावी म्हणून आम्ही अहमदाबाद आणि गांधीनगरच्या फॉरेन्सिक तज्ञांना बोलवलं आहे.” समोर आलेल्या वृत्तांनुसार यावर्षी एप्रिलमध्ये महाराष्ट्रात अशाच प्रकारे एक कथित उल्का आकाशात आढळून आली होती.

 

gujrath im

 

उद्रेक झाल्यानंतर विमानसारखा आवाज ऐकू आला होता. न्यूझीलंडमध्ये लाँच केलेल्या एका उपग्रहाचे हे जळके अवशेष असल्याची माहिती नंतर सूत्रांनी दिली. जानेवारी २०१६ मध्ये व्हिएतनाममधील येन बाई, तुर्की, आफ्रिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया येथे अशाच प्रकारच्या घटनांची नोंद झाली होती.

गुजरातच्या ३ जिल्ह्यांमध्ये घडलेल्या या सगळ्या घटनांदरम्यान कुणालाही कुठल्याही प्रकारे इजा झाली नाही हा एक दिलासाच आहे.

हे गोळे नेमके काय आहेत याचा लवकरात लवकर तपास होऊ शकला तर पुन्हा अशी घटना घडल्यास लोकांच्या मनात भय उत्पन्न होणार नाही. किंवा, हे गोळे जर खरंच कुठल्याही प्रकारे धोकादायक असल्याचं आढळलं तर त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी लोकांना घेता येईल. हे खरोखरच उपग्रहांचे निरुपद्रवी अवशेष असतील अशी आशा करूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?