Site icon InMarathi

धर्मवीर आनंद दिघेंना दाऊदच्या तावडीत सापडू न देणाऱ्या माणसाची गोष्ट !

dighe dawood im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

”गद्दारांना क्षमा नाही” ही ताकीद असो वा ‘जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायचं नाही” हा धमकीवजा सल्ला, केवळ या दोनच वाक्यांनी आनंद दिघे हे झंझावाती व्यक्तीमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. दिघे साहेबांची ही गर्जा आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात घुमणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख कमाविलेल्या आनंद दिघे यांचा धगधगता जीवनप्रवास मांडणारा धर्मवीर हा मराठी सिनेमा आज प्रदर्शित झाला. सिनेमाचे नाव जाहीर केल्यापासूनच राज्यात याविषयी प्रचंड उत्सुकता होती.

 

 

प्रसाद ओकने हुबेहुब साकारलेली दिघे साहेबांची भुमिका, जुने ठाणे शहर, शिवसेनेची जडणघडण, अंतर्गत राजकारण आणि हिंदू मुस्लिम वाद हा सगळाच मसाल एकाच डिशमध्ये चाखायला मिळणार अशी आशा आहे, मात्र यानिमित्ताने दिघे साहेबांशी निगडित अनेक किस्से, आठवणी यांना उजाळा दिला जात आहे.

त्यातलाच एक किस्सा सध्या चविने चर्चिला जात आहे. ‘राजकारणात जेवढे मित्र तेवढेच शत्रू’ या उक्तीप्रमाणे आनंद दिघे यांच्याशी अनेकांचे वैर होते. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे कुख्यात गुंड दाऊद इब्राहम!

 

 

ज्याच्या नावानेही भल्याभल्यांना घाम फुटायचा, ज्याच्या एका शब्दावर मुंबईतील अंडरवर्ल्डची सुत्र हालायची, त्या दाऊदने एकदा भर दिवसा आनंद दिघेंना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तो प्लॅनही पद्धतशीरपणे आखण्यात आला होता. मात्र एका मराठमोळ्या माणसामुळे दिघे साहेबांचा जीव वाचला.

काय घडलं त्या दिवशी?

खरं तर आनंद दिघे यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती. घरादाराकडेही पाठ फिरवलेले आनंद दिघे शिवसैनिकांसह सार्वजनिक वाहतूकीनेच सगळीकडे फिरायचे. मात्र साहेबांना स्वतःचे वाहन असावे यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येत १९९८ साली वर्गणी गोळा करत एक गाडी विकत घेतली.

 

 

गाडी घेतल्यापासून गिरीश शिलोत्री यांच्याकडे दिघे साहेबांच्या गाडीचे सारथ्य करण्याची जबाबदारी आली, ती थेट ज्या दिवशी दिघे साहेबांच्या गाडीला अपघात झाला त्या अखेरच्या क्षणापर्यंत!

याच गाडीतून आनंद दिघे, चालक शिलोत्री आणि महत्वाचे कार्यकर्ते दरदिवशी ठाणे जिल्हा पिंजून काढायचे. त्याकाळी जिल्ह्याच्या सीमाही मोठ्या असल्याने दरदिवशी प्रवास हा ठरलेला असायचा.

अशातच एका दिवशी आनंद दिघे काही शिवसैनिकांसह मीरा रोड येथे पुजेसाठी निघाले होते. नेहमीप्रमाणेच कार्यक्रम, सभा यांचे नियोजन करत गाडी ठाण्याबाहेर पडली आणि वाहक गिरीश शिलोत्री यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

 

 

ठाण्यातून प्रवास सुरु झाल्यापासून एक गाडी त्यांचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आले होते. सुरवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र ठाण्याबाहेरही तिच गाडी दिसल्याने त्यांचा संशय बळावला.

 

 

दिघे साहेबांचा बेधडक स्वभाव, सत्यासाठी वाट्टेल त्याच्याशी वैर घेण्याची तयारी, मराठी माणसाच्या हक्कासाठी कुणाशीही लढण्याची जिद्द यांमुळे त्यांच्या शत्रुंची संख्या कमी नव्हती. यापुर्वीही त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या. त्यामुळे पाठलाग करणारी गाडी ही दिघे साहेबांच्या जीवावर उठल्याचेही शिलोत्री यांनी हेरले.

आनंद दिघे मृत्यु: अपघात की घातपात? आजही न सुटलेलं कोडं

जेव्हा आनंद दिघेंनी दिग्दर्शक विजु मानेंच्या आईला जगण्याचे बळ दिले

अधिक निरिक्षण करताच त्या गाडीतील लोकं हे कुख्यात गुंड दाऊदची माणसं असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली आणि क्षणभर त्यांचं धाबं दणाणलं. मात्र यावेळी गाडीत बसलेल्या सर्वांना ही बाब सांगितली तर विनाकारण गोंधळ उडेल असा विचार करत त्यांनी गाडी वेगाने नेण्याचा प्रयत्न केला तरी पाठलाग करणाऱ्या गाडीनेही आपला वेग वाढवला.

अखेरिस योग्य वेळी पावलं उचलली नाही तर दिघे साहेबांच्या जीवाला धोका निर्माण होईल असा विचार करत शिलोत्री यांनी गाडीचा मार्ग बदलला आणि तिथून काहीच अंतरावर असलेल्या मीरारोड पोलिस स्टेशनमध्ये थेट गाडी नेण्यात आली.

 

 

क्षणभर दिघे यांनाही काही कळेना, मात्र पोलिस स्टेशनमध्ये गाडी नेत त्यातून सुरक्षितरित्या दिघेंना खाली उतरविल्यानंतर शिलोत्री यांनी सगळा प्रकार समजावला. त्यानंतर पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली.

एकीकडे पक्षकार्यासाठी कुटुंबाकडे पाठ फिरवलेल्या दिघे यांनी हजारो शिवसैनिकांचे कुटुंब उभं केलं होतं. ठाण्यातील प्रत्येकजण दिघे यांना कुटुंबप्रमुख मानत होता, त्यामुळे घरातील वडिलधाऱ्या व्यक्तीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकजण पुढाकार घेत होता.

 

 

 

शिलोत्री यांच्या प्रसंगावधानामुळे त्या दिवशी दाऊदच्या गुंडांच्या तावडीतून दिघे हे सहीसलामन सुटले खरे मात्र २००१ साली वंदना टॉकिजजवळ झालेल्या अपघातापपासून मात्र त्यांना कुणीही वाचवू शकले नाही, त्याच अपघातात मार लागल्याने दोन दिवसानंतर त्यांची प्राणज्योत मावळली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version