थायरॉईडचा त्रास असणार्यांनी प्रोटीन कायमचं टाळावं, हे कितपत योग्य आहे?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सामान्यपणे उन्हाळा जीव नकोसा करणारा ऋतू असला तरीही ज्यांना वजन घटवायचे आहे अशांसाठी उन्हाळ्यात ते तुलनेनं झपाट्यानं उतरत असल्यानं वरदान आहे. आहार नियंत्रण आपोआप होऊन लिक्विड पदार्थ जास्त प्यायले जात असल्यानं वजन उतरविण्यासाठी पोषक डाएट आपोआप होतं. यातलाच एक घटक म्हणजे वजन उतरविण्यासाठी घेतली जाणारी प्रोटीन पावडर.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
साधारणपणे, तंत्रशुध्द हाय इंटेन्सिटी व्यायाम आणि सोबत प्रथिनांचं सेवन यामुळे स्नायुंना तयार करणं सोपं जातं. वजन कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग समजल जातो. मात्र जर तुम्ही थायरॉईड रुग्ण असाल तर तुमच्यासाठी हा मार्ग तितकासा चांगला नाही. कारण साधारणपणे जी प्रोटीन पावडर व्यायामासोबत वजन उतरविण्यासाठी खाल्ली जाते ती थायरॉईडसाठी चांगली नसते.
ज्यांना थायरॉईडची समस्या नाही असे व्हे प्रोटीन शेक सोबत व्यायाम करुन वजन आटोक्यात आणू शकतात. मात्र थायरॉईड असलेल्यासांठी या प्रोटीन शेकचा वेगळ्या प्रकारे विचार करणं गरजेचं असतं. डेअरी उत्पादनांबरोबर अनेक थायरॉईड रुग्णांत सोया किंवा ग्लुटेन हे घटक पदार्थही घातक असतात, जे काही प्रोटीन पाऊडरमधे आढळतात.
मग थायरॉईड असणार्यांनी प्रोटीन कायमचं टाळावं का? तर याचं उत्तर सुदैवानं नाही असं आहे. मात्र थायरॉईड रुग्णांनी त्यांचं प्रोटीन काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे.
आज बाजारात अनेक अशा प्रोटीन पाऊडरही आहेत ज्या थायरॉईड रुग्णांनी घेतल्या तरीही धोकादायक नसतं. या पाऊडर फक्त थायरॉईड असणार्यांसाठीच आहेत असं नाही तर ज्यांना असा कोणताही त्रास नाही त्या व्यक्ती देखिल ही प्रोटीन पाऊडर घेऊ शकतात. कोणत्याही gut inflammation किंवा थायरॉईड ग्रंथींना न दुखापत करता या प्रोटीन पाऊडर त्यांचं काम चोखपणे करतात.
थायरॉईड रुग्णांनी त्यांची प्रोटीन पाऊडर निवडताना फ़क्त खालील गोष्टींची काळजी घ्यावी –
१- तुमची प्रोटीन पाऊडर दुग्धजन्य पदार्थ मुक्त, सोय मुक्त आणि ग्लुटेन मुक्त असणं गरजेचं आहे.
२- तुमच्या प्रोटीन पावडरमधे अमिनो ॲसिडची विस्तृत श्रेणी आहे याची खात्री करून घ्या
३- अतिरिक्त लाभासाठी अशी प्रोटीन पावडर निवडा, ज्यात अतिरिक्त जीवनसत्वं आणि पोषक तत्वं आहेत. याचा तुमच्या थायरॉईडला लाभ होणार आहे.
४- वनस्पती आधारीत प्रथिने (मटार, तांदूळ इत्यादी) असणारी प्रोटीन पावडर पहा.
५- तुमच्या प्रोटीन पावडरमधे प्रत्येक सर्व्हिंगमधे १० ते २० ग्रॅम प्रोटीन असायला हवं आहे.
६- तुमच्या प्रोटीन पावडरमधे निष्क्रिय फ़िलर्स, बाईंडर्स, कृत्रिम रंग आणि चव नाही याची खातरजमा करा. हे सर्व असणार्या पावडर शक्यतो टाळा.
वर उल्लेखलेला गोष्टी लक्षात घेत प्रोटीन पावडर निवडली तर थायरॉईड रुग्णांना याचे सर्व फयदेही मिळतील.
प्रोटीन पावडरचे फ़ायदे आणि थायरॉईड रुग्णांनी ते का वापरावं?-
योग्य प्रोटीन पावडरच्या सेवनानं तुमचं वजन, थायरोईड आणि चयापचय यासाठी मदत होते. तुमचं वजन नियंत्रित करण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे घटक आहे, बेसल मेटाबॉलिक रेट किंवा बीएमआरशी संबंधीत घटक. प्रथिनं साधारणपणे भूकेवर नियंत्रण करण्याचं काम करतात.
चरबी आणि कार्बोदकं यांच्या तुलनेत प्रथिनं भूक शमन करण्यासाठी अधिक प्रभावी असतात. बर्याचशा थायरॉईड रुग्णांत साखरेचे पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असते.
प्रथिनांच्या सेवनानं या अतिरिक्त खाण्यावर नियंत्रण ठेवता येते. प्रोटीन शेकचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी दिवसाची सुरवात करताना प्रोटीन स्मुदीनं करा. यामुळे शरीराला जी ऊर्जेची आवश्यकता आहे हि मिळेल आणि नैसर्गिक रित्या भूक कमी लागेल.
अर्थात हा लेख केवळ एक माहिती देणारा आहे. तुम्हालाही थायरॉईड असेल, वजन कमी करायचं असेल आणि त्यासाठी प्रोटीन पावडरचा आहारात समावेश करायचा असेल तर तुम्ही तो नक्कीच करू शकता फ़क्त त्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरु नका.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.