' ‘साऊथ बॉम्बे’ मध्ये रिक्षांना बंदी असण्यामागे नेमकं कारण काय? – InMarathi

‘साऊथ बॉम्बे’ मध्ये रिक्षांना बंदी असण्यामागे नेमकं कारण काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणत्याही गावाला जा, बस स्टँडवर एका ओळीत थांबलेल्या रिक्षा असतातच. मध्यमवर्गीय लोकांना रिक्षा हे अतिशय सोयीचे कमी पल्ल्याच्या अंतरावर जायला उपयुक्त वाहन आहे. मोठ्या अवजड बॅगा, जास्त समान, तीन जणांना सोयीस्कर अशी रिक्षा म्हणजे तात्पुरता रथच असतो असे म्हणायला हरकत नाही.

 

auto rickshaw f inmarathi

 

शाळेच्या विद्यार्थ्यांना ने आण करणारे रिक्षावाले काका पण किती जवळचे वाटतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खूप वेळा दुचाकी नेणे अशक्य असते, कधी अंतर कधी एखादा रुग्ण असेल तर दवाखान्यात न्यायला , एखाद्या कार्याला जायला रिक्षा किती उपयोगी पडते हे ज्याच्याकडे चार चाकी गाडी नाही त्यांना नक्की माहिती आहे.

हल्ली ओला, उबेर आल्यानंतर मोठमोठ्या शहरात रिक्षाचा भाव उतरला असला तरी आजही खेडोपाडी, मध्यम शहरात वाहतुकीचे परवडणारे साधन म्हणजे रिक्षाच आहे. पण असं कुठे ऐकलं आहे का, की या भागात रिक्षा आणू नयेत अशी सक्त ताकीद दिलेली आहे आणि त्या बाजूला रिक्षावाले फिरकतही नाहीत.

हो असा एक भाग आहे. तिथे रिक्षांना प्रवेश नाही. औषधालाही तुम्हाला रिक्षा दिसणार नाही. कोणता भाग आहे असा? हा भाग आहे आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीतील…म्हणजे मुंबईतील दक्षिण भाग, ज्याला साऊथ बॉम्बे म्हणून ओळखले जाते.

मुंबईत? चक्क रिक्षावर बंदी? थक्क झालात वाचून? हो, हे अगदी खरे आहे. साऊथ बॉम्बे मध्ये रिक्षांना बंदी आहे.

 

auto im

 

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. देशाची आर्थिक राजधानी पण हीच आहे. लोकल ट्रेन, टॅक्सी, रिक्षा ही येथील दळणवळण साधने . पण तरीही मुंबई मध्ये काही ठराविक भागापुरतीच रिक्षांना बंदी आहे. या भागात केवळ काळी पिवळी टॅक्सी किंवा कॅब दिसतात. काय आहे याचे कारण?

मुंबई हे सात बेटाचे शहर आहे. या शहरची विभागणी दोन विभागात केली आहे. बृहन्मुंबई ही साऊथ बॉम्बे म्हणून ओळखली जाते. या भागात बांद्रा, सायन इत्यादी भाग येतात.

महाराष्ट्र राज्य परिवहन खात्याच्या कायद्यानुसार फक्त मुंबई उपनगरे आणि ठाणे जिल्हा याच ठिकाणी रिक्षा चालवण्यास परवानगी आहे. मात्र दक्षिण मुंबई मध्ये ही पारवानगी नाही. इतकेच नव्हे तर या ठिकाणी रिक्षा चालवली तर रिक्षा चालकाकडून कायद्याने दंड आकारला जातो.

रिक्षा चालवाल, तर दंड!

महाराष्ट्र परिवहन कायदा कलम २२ (d) १७८ (३)(B) नुसार साऊथ बॉम्बे मध्ये रिक्षा चालवल्यास रिक्षा चालकाला १०० ते २०० रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे या भागात रिक्षा चालवण्यास रिक्षावाले जात नाहीत. काय आहे याचे कारण?

दक्षिण मुंबई जिला साऊथ मुंबई म्हणून ओळखले जाते हा भाग खूप जुना आहे. आज जर पहिले तर हा मुंबईमधील सर्वात भारी आणि महागडा भाग म्हणून ओळखला जातो. इथे असणारी ऑफिसेस, इमारती रस्ते हे अगदी चकचकीत आहेत. याचा विकास स्वातंत्र्योत्तर काळातच झाला. पण या भागातील रस्ते हे आतच्या ट्राफिकच्या नियमानुसार बनवलेले नाहीत.

 

traffic im

 

इथे तुम्हाला इतर भागात जसे उड्डाणपूल आहेत तसे उड्डाणपूल दिसत नाहीत. यामुळे इथे जर गर्दी वाढली तर ट्राफिक जाम होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. कारण साऊथ मुंबई मधील रस्ते हे बरेचसे चिंचोळे मार्ग, वन वे यांनी बनलेले आहेत. त्यामुळे इथे सिग्नल, पार्किंग या मोठ्या समस्या होऊ शकतात.

या भागात चारचाकी गाडी चालवणे हे एक आव्हानच आहे. त्या गाड्या आणि त्यात रिक्षांची भर पडली तर ट्राफिकवर कितीतरी ताण येऊ शकतो.

पूर्वी रिक्षांची संख्या मर्यादित होती. आता मात्र ती खूपच वाढली आहे. त्यामुळे या भागातील ट्राफिक नियंत्रित राहावे या उद्देशाने या भागात रिक्षा चालवण्यास बंदी आहे.

या निर्णयाची दुसरी बाजू अशी आहे, मुंबईमध्ये टॅक्सीचालकांची युनियन आहे. या टॅक्सी मुख्यत्वे दक्षिण मुंबईत दळणवळण करण्यासाठी वापरल्या जातात. यांचे भाडे रिक्षांच्या तुलनेत जास्त असते.

जर या भागात रिक्षांना परवानगी दिली तर त्यांचे भाडे हे प्रवाशांना परवडणारे असल्यामुळे बहुतांश लोक रिक्षा करणेच पसंत करतील आणि याचा परिणाम टॅक्सी चालकांच्या धंद्यावर होणार हे शंभर टक्के आणि म्हणूनच या भागात रिक्षा चालवण्यावर बंदी आहे.

 

taxi im

 

या मुद्द्यावर आजपर्यंत खूपदा रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक समोरासमोर आले आहेत पण आजवर ही बंदी उठलेली नाही.

याशिवाय अजून एक भाग असा आहे, दक्षिण मुंबई हा अतिशय पॉश एरिया मानला जातो. कुलाबा वरळी हे भाग एकदम पॉश एरिया आहेत. या भागात बरीचसी फाईव्ह स्टार हॉटेल्स, आहेत. अतिशय उच्चभ्रू या भागात राहतात. कितीतरी उच्चभ्रू व्यवसाय केंद्रे याच भागात आहेत. अनेक सरकारी ऑफिसेस याच भागात आहेत. त्यामुळे इथे रिक्षांना परवानगी देणे म्हणजे या भागाच्या सौंदर्याला बाधा आणणे आहे.

या भागात सुरवातीपासून उच्चभ्रु वस्ती अधिक होती, बडे कलाकार, शुटिंगची ठिकाणे, सेलिब्रिटींची घरे, बिझनेस हाऊस यांचा भरणा अधिक असल्याने बहुतांश नागरिक हे स्वतःच्या कारमधून फिरतात. त्यांना रिक्षाव्दारे केलेला प्रवास रुचत नाही.

 

car 1 im

 

याचे दाखले ब्रिटीश काळापासून मिळतात, बग्गी किंवा चारचाकी वाहनांतून फिरणाऱ्या ब्रिटीशांना अन्य वाहने आवडत नसल्याने या भागात कधीच रिक्षांना उघड मान्यता दिली गेली नाही.

त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी हा एक यक्षप्रश्न ठरेल. रिक्षा चालकांचे दे मार ड्रायव्हिंग, त्याने होणार अपघात, वाटेतच पार्किंग अशा अनेक समस्या उभ्या राहतील. यासाठी खुद्द साऊथ मुंबईतील रहिवासी सुद्धा या भागात रिक्षा असाव्यात म्हणून तयार नाहीत. हे रहिवासी आपला वट सरकारवर ठेवण्या इतके मोठे आहेत. त्यामुळे सरकारला त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागते.

 

taxi driver im

 

या भागातील जागांच्या किमतीच्या आकड्यांनी कोटीची उड्डाणे केव्हाच पार केली आहेत. आणि या भागात रिक्षा असणे म्हणजे या किंमतीला, या भागाच्या सौंदर्याला बाधा आणे आहे असे मानले जाते. आणि हे टाळण्यासाठीच सरकारने या भागात रिक्षा चालवण्यावर बंदी घातली आहे.

सामाजिक दृष्ट्या हे चूक असेल, असमानतेचे द्योतकही असेल पण या भागांना बकालपण येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक घेतलेला हा निर्णय आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?