डेझर्ट जेवणाच्या शेवटी नव्हे सुरुवातीला खावेत, वाचा आयुर्वेद काय सांगतंय…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय आहार हा चौरस आहार आहे. सारे षड्रस त्यात समाविष्ट असतात. खारट, आंबट, तिखट, गोड, कडू, तुरट या सहा रसांनी युक्त आहार हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. आयुर्वेदाने तर ही गोष्ट सिद्धच केली आहे.
सणावाराला, शुभ कार्यात गोड पदार्थ नाही असे आपल्याकडे होतच नाही. कोणतीही चांगली बातमी, आनंदाचा प्रसंग हा गोड खाण्यानेच साजरा होतो. वेगवेगळ्या मिठाया, घरगुती पदार्थ यात गोडाचा समावेश असतोच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आनंदाच्या प्रसंगी काही नाही तरी देवासमोर साखर ठेवून आनंद व्यक्त केला जातो. सणासुदीला गोडधोडाच्या नैवेद्याने भरलेलं रसरशीत पान पाहून भूक चाळवते.
हे सारे पदार्थ आपल्या पूर्वजांनी इतके विचारपूर्वक ठरवले आहेत. सुरुवातीला वरण भात, मग असेल तर मसाले भात, नंतर जे काही गोडाचे पदार्थ असतील ते सहसा पुरणपोळी आणि शेवटी दही भात खाऊन जेवण पूर्ण केले जाते. वर्षानुवर्षे हीच पद्धत सुरु आहे. मात्र आता दिवस बदलले आहेत. बहुतांश वेळा लोक हॉटेल मध्ये जेवायला गेले की, स्टार्टर मग मेन कोर्स आणि सर्वात शेवटी डेझर्ट म्हणून एखादी स्वीट डिश, फ्रूट सलाड, आईस्क्रीम असा काही गोडधोडाचा एखादा पदार्थ खाऊन जेवणाचा शेवट केला जातो.
—
रोजच्या वापरातील ‘या’ २ पदार्थांचं मिश्रण आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी
हापूस फळांचा राजा आहेच पण; या १० दुर्मिळ आंब्यांचा स्वाद तुम्ही अनुभवलाच पाहिजे!
—
खूपदा बघा रात्रीचं जेवण झाल्यानंतर देखील पाय मोकळे करायला म्हणून शतपावली करायला तुम्ही कधी बाहेर पडला तर येता येता एखादा आईस्क्रीमचा स्कूप, कप अगदी घेताच घेता. उन्हाळ्याच्या दिवसात तर आईस्क्रीम अगदी हवंच हवं असं वाटलं नाही तरच नवल आणि आईस्क्रीमच्या इतक्या व्हरायटी बाजारात आलेल्या आहेत की त्याची नावे ऐकून खावे न वाटले तर नवल!
पण आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून हे बरोबर आहे का?
या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञ देतात ते असं, आपल्या जेवणाच्या, आहाराच्या सवयी या नीट विचारपूर्वक ठरवल्या नाहीत तर शरीरातील आम वाढतो आणि शरीरातील चेतनेचा ऱ्हास होतो. प्राचीन आयुर्वेदाच्या संहितेनुसार आहारातील मधुर रस अर्थात गोड पदार्थ हे शरीरातील ऊर्जा आणि चैतन्य प्रदान करतात.
आयुर्वेद असे सुचवतो की, गोड पदार्थ जेवणात सर्वात शेवटी खाऊ नयेत. कारण गोड पदार्थ हे पचायला जड असतात. त्यामुळे ते पचायला तसा वेळ लागतो. आतड्याची पचनासाठी जास्त शक्ती खर्च होते. म्हणून आयुर्वेद असे स्पष्ट सांगतो की जेवताना गोडाचे पदार्थ हे सर्वात आधी खावेत. याचे कारण केवळ पचनाला त्रास होऊ नये असे नाही तर जेव्हा आपण गोड पदार्थांचे सेवन जेवताना सर्वात आधी केले तर जीभेच्या पृष्ठभागावर असलेल्या रुची ज्ञान कालिका किंवा ज्ञान पेशी ज्याला टेस्ट बड्स असे आपण म्हणतो त्या कार्यक्षम होतात.
आपण ज्याला भूक चाळवणे, तोंडाला पाणी सुटणे असे म्हणतो ते म्हणजे हेच. त्यामुळे आपल्या शरीरातील पाचक रस स्त्रवू लागतात आणि भूक लागून जेवण व्यवस्थितपणे होते.
मात्र जेवण झाल्यानंतर गोड खाल्ले तर त्याने पचनसंस्थेवर ताण येतोच शिवाय शरीरांतर्गत अन्नाची किण्वन म्हणजे आंबण्याची प्रक्रिया सुरु होते आणि पित्त वाढून अपचन होण्याचा संभव असतो. शरीरात गॅस वाढून पोट फुगण्याची शक्यता वाढते.
म्हणून आहार तज्ज्ञ सांगतात की जेवणानंतर गोड खाण्यापेक्षा आधी गोड खा आणि अपचनाच्या त्रासाच्या शक्यता संपवून टाका.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.