Site icon InMarathi

आज दुपारी १ वाजताच्या पत्रकार परिषदेत मनसैनिकांना राज ठाकरेंकडून काय आदेश मिळणार?

raj thackrey loudspeakers IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेले काही दिवस महाराष्ट्रात एकच विषय ऐरणीवर आलाय तो म्हणजे मशिदींवरील लाऊडस्पीकरचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आणि तिथूनच या सगळ्या वादळाला सुरुवात झाली.

राज यांच्या त्या सभेतल्या वक्तव्यानंतर वेगवेगळे राजकीय पडसाद उमटले, बऱ्याच राजकीय नेत्यांनी यावर उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या, पण राज आणि मनसैनिकांनी मात्र हा मुद्दा चांगलाच लावून धरला.

 

 

त्यानंतरच्या उत्तरसभेत ईद पर्यंतचं ultimatum देत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची विनंती राज्य सरकारला केली. आणि नुकत्याच औरंगाबाद इथल्या सभेत त्यांनी पुन्हा लोकांना आव्हान केलं की ३ तारखेपर्यंत हे भोंगे उतरले नाहीत तर त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा.

यानंतर मात्र महाराष्ट्रात आता बरंच तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली असून काहींना पोलिसांनी अटकदेखील केली आहेत.

दुपारी १ वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असून आता नेमका कोणता आदेश राज त्यांच्या कार्यकर्त्यांना देणार याची उत्सुकता लागून आहे.

या पत्रकार परिषदेत राज आणखीनच आक्रमण होणार की एकंदरच या परिस्थितिवर काही वेगळी बाजू मांडणार ते थोड्याच वेळात आपल्याला कळेल.

 

 

एकंदरच राज यांच्या या आक्रमक भूमिकेवरून बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. मराठीचा मुद्दा सोडून मध्येच हिंदू मुद्दा हाती घेतल्याने बरीच लोकं राज यांच्यावर टीका करतायत, तर हे असं द्वेषाचं राजकारण करून राज हे देशात फुट पाडत आहेत असेही आरोप बरेच लोकांनी केले आहेत.

राज ठाकरे यांच्या या नवीन आक्रमक भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version