Site icon InMarathi

एकनाथ शिंदे: कोणत्याही पार्श्वभूमी विना राजकीय स्थान भक्कम करणारा ठाण्याचा वाघ

shinde dighe im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हा भारत आहे. इथे काहीही घडू शकते. इथली जनता जशी एका चहा विकणाऱ्या हरहुन्नरी व्यक्तीला आपला प्रधानमंत्री म्हणून संधी देवू शकते तशी एका रिक्शावाल्याला महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या महत्वाच्या खात्याचा मंत्री बनवू शकते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महाराष्ट्रात राजकारणाची देखील एक वेगळी परंपरा आहे. अनेक धुरंधर राजकारणपटू महाराष्ट्राने दिले आहेत. त्यातील एक महत्वाचे नाव आहे ‘एकनाथ शिंदे.’ कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त कर्तुत्व आणि मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चे स्थान पक्के करणारे सध्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा आयुष्याचा आणि राजकीय अस्तित्वाचा प्रवास असाच प्रेरणादायी आहे.

 

 

१९८० च्या दशकात शिवसेनेत शाखाप्रमुख म्हणून दाखल झालेले शिंदे हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शिवसेनेसोबत अनेक आक्रमक आंदोलनांमध्ये भाग घेतला, ज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांना ४० दिवस तुरुंगात राहावे लागले.

कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची प्रतिमा आहे. शिंदे यांच्याबद्दल असे बोलले जाते की त्यांच्याकडे मसल पॉवर आणि पक्षाची तिजोरी भरण्याचे कौशल्यही आहे.

सातार्‍यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव, पण शिक्षणासाठी त्यांनी ठाणे गाठले आणि इथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती आनंद दिघे यांच्या संपर्कात आल्यावर!

 

 

ठाण्यातील मंगला हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये त्यांनी ११ वी पर्यंतचे शिक्षण घेतले परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्ध्यातून सोडावे लागले. त्यानंतर काही दिवस त्यांनी एका फिशिंग कंपनीत सुपरवायझर ची नोकरी केली. पण आमदनीचा मेळ काही बसेना तेव्हा त्यांनी ठाण्यातच रिक्षा चालवण्यास सुरवात केली, त्याचवेळी ते शिवसेनेच्या आनंद दिघे यांच्या संपर्कात आले.

त्या काळात शिवसेनेचा तरुण वर्गावर प्रभाव होता. आनंद दिघे ठाण्यात शिवसेना बळकट करण्यात मग्न होते. त्यांना एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एक सर्वोत्तम पर्याय सापडला आणि दिघे यांचा विश्वास शिंदे यांनी सार्थ ठरवला. मितभाषी, संयमी पण कामामध्ये आक्रमक असणारे शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.

१९९७ साल शिंदे यांच्यासाठी खूप महत्वाचे ठरले. त्यावर्षी त्यांना ठाणे महापालिका निवडणुकीचे तिकीट मिळाले. या निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. नगरसेवक पदाच्या दोन टर्म्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही.

 

 

२००४ मध्ये त्यांनी कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. तेव्हापासून सलग चार वेळा ते या मतदार संघातून निवडून येत आहेत.

२०१५ ते २०१९ या काळात ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. आणि सध्या आघाडी सरकारमध्ये ते नगरविकास मंत्री आहेत.

दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यात शिंदे यांचे योगदान मोठे आहे. ठाणे महापालिकेपासून जिल्हापरिषद, अंबरनाथ नगरपरिषद, कल्याण-डोंबिवली महापालिका, बदलापूर नगरपरिषद ते नाशिक पर्यन्त शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. या भागातील राजकरणावर त्यांची पकड आहे. तिथे शिंदे यांचा शब्द प्रमाण मानला जातो.

परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण न करू शकल्याचे शल्य वाटणार्‍या एकनाथ शिंदे यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवी परीक्षा पास केली ते ही ७७.२५ टक्के गुण घेवून! आपले स्वत:चे शिक्षण पूर्ण करू शकले नसले तरी त्यांनी आपले चिरंजीव श्रीकांत शिदे यांना डॉक्टर केले. श्रीकांत हे देखील कल्याण विधानसभा मतदारसंघातिल विद्यमान खासदार आहेत.

 

 

२०१९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यास उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे हे प्रमुख नाव चर्चेत होते. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकरे कुटुंबाबाहेरील सर्वात प्रभावशाली शिवसैनिक म्हणून पाहिले जाते.

 

 

एकनाथ शिंदे या कट्टर शिवसैनिकाचा हा होता संघर्षमय पण प्रेरणादायी जीवन प्रवास!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version