‘खान’ करिता नव्हे तर “या” स्टारसाठी पाकिस्तानी थिएटर्समध्ये झाली तोबा गर्दी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत पाकिस्तान छत्तीसचा आकडा असला तरीही बॉलिवूडचे चाहते दोन्ही देशांमध्ये काही कमी नाहीत, हे नेहमीच दिसलेलं आहे. बॉलिवूडचे पिक्चर आणि त्यातही टॉपच्या स्टार्सचे म्हटल्यावर फॅन मंडळी खुळावतात. त्यांच्यासाठी लोक काय काय करतात हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. थिएटर्स भरून वाहतात.
पाकिस्तानातही हीच परिस्थिती आहे. पण एक वेळ अशी आली होती जेव्हा तीन खान मंडळींऐवजी एका वेगळ्याच माणसासाठी पाकिस्तानमध्ये थिएटर्सवर झुंबड उडाली होती.
हा बॉलिवूड स्टार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपला ‘सिरीयल किसर’ इमरान हाश्मी. खरंतर ऐकायला विचित्र वाटतं ना? हा काही हिरो मटेरियल नाही तरीही याच्या सिनेमाला एवढी गर्दी का झाली होती? हे प्रश्न आत्ता ज्यांचं वय ३०-३५ च्या आसपास आहे त्यांना विचारा. ते तुम्हाला सांगतील याची काय क्रेझ होती ते.
भट्ट कॅम्पचा सिनेमा आला की त्यात इमरान हाश्मी असणार म्हणजे असणार अशी परिस्थिती सुरुवातीला होती. पण नंतर हे फिस्कटलं, परत रुळावर आलं. रेग्युलर बॉलिवूड फॉलो करणाऱ्यांना हेही नवीन नाही. पण इमरान स्वतः एकदा म्हणाला होता, की त्याचं या क्षेत्रात येणं एक अपघात होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
त्याला कधीच इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं. इमरान सुरुवातीला इंडस्ट्रीत आला तेव्हा तो कसा होता? त्याला त्याच्या पहिल्या सिनेमातून हाकलून का दिलं होतं? पुढं त्यानं त्याची ‘सिरीयल किसर’ ही इमेज कशी मोडली?
अशा त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला या आर्टिकलमध्ये वाचायला मिळतील. मात्र हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचण्याची तयारी हवी.
सिरीयल किसर इंडस्ट्रीमध्ये आलाच कसा?
इमरान हाश्मी आणि भट्ट कॅम्प हे समीकरण इतकं घट्ट आहे की भट्ट कॅम्पचा सिनेमा इमरान शिवाय पूर्ण होऊच शकत नव्हता असाही एक काळ होता. पण इमरान महेश भट्ट यांचा भाचा आहे ही गोष्ट बऱ्याच लोकांना ठाऊक नाही. थांबा! भाचा आहे मग हे नेपोटीझम आहे वगैरे सुरुवात करू नका.
त्यालाही नात्यातला असून संघर्ष करावा लागला होता. कारण त्याला इंडस्ट्रीमध्ये येण्याची अजिबात इच्छा नव्हती. कॉलेजमध्ये असताना मित्रांबरोबर तो टपरीवर थांब, उनाडक्या कर असले उद्योग करत होता म्हणून त्याला नाईलाजानं इंडस्ट्रीमध्ये यावं लागलं असं त्याचं म्हणणं आहे.
असाच मित्रांबरोबर उनाडक्या करताना त्याला मुकेश भट्ट यांनी पाहिलं. मग त्यांनी त्याची आजी म्हणजे अभिनेत्री पूर्णिमा दास हिला सांगितलं. मग आजीच्या सांगण्यावरून इमरान भट्ट यांच्याकडं गेला. तेव्हा विक्रम भट्ट यांच्याकडं राज सिनेमाचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून तो कामाला लागला.
तेव्हा तो अभियानाचा कोर्सही करत होता. अशातच त्याला ‘ये जिंदगी का सफर’ या चित्रपटाची ऑफर आली. पण खराब अभिनय आणि वाईट ऍटिट्यूड यामुळं त्याची सिनेमातून हाकालपट्टी झाली.
—
- आजवर कुठल्याच अभिनेत्याला न जमलेली ‘ही’ गोष्ट मिथुनदांनी करून दाखवलीये!
- या १२ भारतीय चित्रपटांनी चीनमधल्या बॉक्स ऑफिसवर ही धिंगाणा घातला होता!!
—
हे त्याच्या जिव्हारी लागलं. मग त्यानं अभिनय सिरियसली घेतला आणि त्याची मेहनत बघून त्याला फूटपाथ या सिनेमात घ्यायचं ठरलं आणि तोच त्याचा पहिला चित्रपट होता.
ते ठीक आहे पण पाकिस्तानात गर्दी का झाली होती त्याच्यामुळं?
फूटपाथ नंतर त्याचा मर्डर आला आणि त्याला सिरीयल किसर हे नाव मिळालं. जे त्यानं ‘जहर’, ‘आशिक बनाया आपने’, ‘अक्सर’ आणि ‘गँगस्टर’सारखे सिनेमे करून सार्थ ठरवलं.
त्यानंतर त्याला अभिनेता म्हणून वेगळा प्रयोग करायचा होता, तो त्यानं ‘आवारापन’ सिनेमा करून केला. इमरान हाश्मीच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीमध्ये या सिनेमाची गणना होते.
आतापर्यंत तर इमरान प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलाच होता. पण कहर झाला तो २००८ मध्ये. त्यावर्षी ‘जन्नत’ रिलीज झाला आणि इमरान टॉप स्टार्सच्या लीगमध्ये जाऊन बसला. हा सिनेमा पाहिला नसेल अशी माणसं भारतात खूप कमी सापडतील.
मुळात इमरानचे सिनेमे म्हणजे त्यातले काही सिन चोरून बघावेत असेच आहेत. सिरीयल किसर हे नाव त्याला उगाच पडलेलं नाही.
असो, आपण होतो ‘जन्नत’मध्ये. मॅच फिक्सिंगवर आधारित या चित्रपटात इमराननं बुकीचा रोल केला होता. सट्टेबाजी कशी चालते, बुकीचं आयुष्य कसं असतं हे दाखवणारा हा सिनेमा हिट झाला होता.
सिनेमातले डायलॉग आणि काही सीन तर खास आहेतच. पण या चित्रपटाच्या प्रपोजल सीनचा चाहतावर्ग वेगळा आहे. आजही असं प्रपोज करावं अशी अनेक मुलांच्या मनातली सुप्त इच्छा आहे. ‘जन्नत’ जेव्हा पाकिस्तानात प्रदर्शित झाला, तेव्हा लाहोरमधल्या एका थिएटरमध्ये ‘जन्नत’ पाहण्यासाठी चेंगराचेंगरी झाली होती.
त्यानंतर इमराननं अनेक वेगवेगळे सिनेमे केले. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, एक थी डायन, शांघाय, अझहर, व्हाय चीट इंडिया, चेहरे असे बरेच सिनेमे केले. या सिनेमांनी त्याच्या पूर्वीच्या सिनेमांसारखा गल्ला कमावून दिला नाही, पण त्याला समाधान जरूर दिलं.
त्याचा सलमान खानबरोबरच टायगर ३ येणार आहे. पण सिरीयल किसर ते सिरीयस ऍक्टर हा प्रवास इमरान हाश्मीनं फार कमी कालावधीत पार पाडला हे नक्की!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.