Site icon InMarathi

बाबा रामदेव यांच्या पाठिंब्याने बहरलेली ‘राणा’ प्रेमकहाणी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेम,प्यार,लव्ह, इश्क़ कितीतरी नावे आहेत त्याची आणि रूपेही! कोणी प्रेमासाठी जगते तर कोणी मरते. रोमिओ-ज्युलिएट, शिरी-फरहाद, असे अनेक प्रेमवीर आजवर आपल्या प्रेम कथांमधून अमर झाले. ते सामान्यातले असामान्य होते असे म्हणू हवेतर, पण असे ही काही सामान्य आहेत ज्यांनी जगावेगळे प्रेम करताना भाषा, जात यांच्या चौकटी तर मोडल्याच पण प्रेमाखातर आपली प्रसिद्धी, प्रतिष्ठा, घर, कुटुंब या सर्वांच्या पुढे जाऊन विचार केला.

अशाच एका दांपत्याची ही प्रेमकहाणी! हनुमान चालीसा हा सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणातला कळीचा मुद्दा ठरतोय आणि याच मुद्द्याला धरून शिळ्या कढीला ऊत आणला जातो आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यातही हा मुद्दा गाजतोय तो ‘राणा’ दाम्पत्यामुळे, त्याचं कारण आहे ते म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिलेलं आव्हान. त्यानंतर झालेला संघर्ष आणि त्यानंतर राणा दाम्पत्याला झालेली अटक.

 

 

तुम्हाला हे माहिती आहे का नवनीत आणि रवी राणा यांचा प्रेमविवाह झाला, तो ही योग गुरु रामदेवबाबांच्या उपस्थितीत! आहे ना युनिक लव्हस्टोरी? चला तर जाणून घेऊ नवनीत आणि रवी यांची प्रेमकहाणी.

रवी राणा यांचा अमरावतीत फ्लोटिंग आणि इमारत उभारणीचा व्यवसाय आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून रवी राणा यांनी घरातली जबाबदारीही सांभाळली आहे. सुरूवातीला रवी राणा हे शाळेत दहावीच्या मुलांना परीक्षेच्या दरम्यान पाणी पुरवण्याचंही काम करत होते.

नवनीत कौर यांचे आई वडील हे मूळचे पंजाबचे आहेत. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. नवनीत यांनी बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी छंद म्हणून मॉडेलिंग सुरू केलं. एक चांगल्या मॉडेल म्हणून काम करत असतानाच त्या अभिनेत्री झाल्या.

 

 

मॉडेलिंग करत असताना त्यांनी म्युझिक अल्बममध्येही काम केलं. त्यानंतर दर्शन नावाच्या एका कन्नड सिनेमात काम केलं.

२००९ ते २०११ हा काळ दोघांच्या आयुष्यातील खूप खास काळ होता, कारण याच काळात ते दोघे एकमेकांना भेटले.रवी राणा आणि नवनीत यांची ओळख २००९ ते २०११ च्या दरम्यान मुंबईत झाली. त्यावेळी पहिल्यांदाच रवी राणा हे बडनेरातून आमदार झाले होते.

रामदेव बाबांच्या आश्रमात आयोजित एका योग शिबिरात त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्री प्रेमात कधी बदलली त्या दोघांनाही समजले नाही.

नवनीत, स्वामी रामदेव यांना पित्याच्या जागी समजतात. म्हणून जेव्हा त्यांनी रवी राणा यांच्याशी लग्न कराचे ठरवले तेव्हा त्यांनी स्वामींचा सल्ला घेतला आणि मगच रवी राणा यांना होकार कळवला. नवनीत आणि रवी राणा त्यानंतर विवाह बंधनात अडकले.

 

 

मात्र लग्न करताना ते साधेपणाने व्हावे असा रवी राणा यांचा आग्रह होता म्हणून अमरावतीमध्येच ४ हजार १२० लोकांच्या एका सामुदायीक विवाह सोहळ्यात त्यांचा विवाह झाला. त्यावेळी ठरवलं असतं तर रवी राणा हे थाटामाटात लग्न करू शकले असते. मात्र या दोघांनी साधेपणाने लग्न केलं आणि एक वेगळा आदर्श निर्माण केला.

इतकेच नाही तर त्यांच्या लग्नात खर्च होणारी सारी रक्कम त्यांनी गरिबांमध्ये दान केली. दरवर्षी होणार्‍या दिवाळी उत्सवात राणा कुटुंबीय धान्य वाटप करतात.

रवी राणा यांच्याशी लग्न केल्यानंतर नवनीत राणा या देखील पतीसह राजकारणात सक्रिय झाल्या व त्यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने निवडणूक लढवली होती. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांचा पराभव केला.

यानंतर आपला पराभव विजयात परावर्तित करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडक लढवली आणि आनंदराव अडसुळ यांना हरवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

 

 

सध्या हे दांपत्य महाराष्ट्रात कित्येकांची झोप उडवण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे. अर्थात आता या केसचा निकाल काय लागणार ते येणारी वेळच ठरवेल, पण राजकारणातसुद्धा सॉलिड ड्रामा असलेली राणा जोडप्याची ही लव्ह स्टोरी आपल्या कायम लक्षात राहील!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version