जाणून घ्या, साऊथचे हे १२ अभिनेते एका चित्रपटासाठी किती पैसे घेतात…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत भारतीय चित्रपट म्हटलं की बॉलिवूड असं समीकरण होतं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये प्रादेशिक सिनेमांनी कात टाकल्यानंतर जनतेने त्यांना भरघोस प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आणि सगळ्यांसकट बॉलिवूडच्या नजराही प्रादेशिक सिनेमांकडे वळल्या.
बॉलिवूडच्या सिनेमांइतकंच प्रादेशिक सिनेमांकडेही गांभीर्याने पाहिलं जातंय हा सुखद बदल आहे. काही वर्षांपूर्वी ‘सैराट’ या आपल्या मराठमोळ्या चित्रपटाची देशभरात चांगलीच हवा झाली आणि ‘धडक’ या नावाने त्याचा रिमेकही झाला. त्यानंतर बराच काळ ‘सैराट’च्याच यशातच रमलेल्या आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला अलीकडे पुन्हा सुगीचे दिवस आल्याचं पाहायला मिळतंय.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मात्र गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांचा सातत्याने बोलबाला आहे. काही वर्षांपूर्वी आलेला ‘बाहुबली’ आणि अलीकडे आलेल्या ‘पुष्पा, ‘आरआरआर’ सारख्या चित्रपटांना देशभरातल्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेणं याचीच साक्ष देतं.
‘साऊथ इंडस्ट्री’कडे आता मानाने पाहिलं जातंय. बॉलिवूडचे आघाडीचे कलाकारही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये कामं करताना दिसू लागले आहेत.
साउथचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू लागल्यानंतर साऊथच्या आघाडीच्या कलाकारांची वटही वाढली आहे.
बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार एकेका चित्रपटासाठी करोडो रुपयांचं मानधन घेतात हे आपण ऐकून असतो. पण साउथचे आघाडीचे कलाकारही आजच्या घडीला यात मागे नाहीत. साउथचे हे १२ अभिनेते एका चित्रपटासाठी किती करोड रुपयांचं मानधन घेतात हे पाहू.
१. रजनीकांत :
७० च्या दशकापासून केवळ दाक्षिणात्यच नाही तर देशविदेशातल्या करोडो रसिकांच्या मनावर राज्य करणारे सुपरस्टार रजनीकांत आपल्या सगळ्यांचेच लाडके आहेत. आशियातील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ते ओळखले जातात.
रजनीकांत यांनी तामिळ, कन्नड, हिंदी, तेलगू आणि अमेरिकेतल्या चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, रजनीकांत एका चित्रपटासाठी १०० करोड रुपयांचं मानधन घेतात.
२. अल्लू अर्जून :
‘पुष्पा’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर अल्लू अर्जून हे नाव घराघरात पोहोचलं. या चित्रपटासाठी त्याने ५० करोड रुपये मानधन घेतल्याचं समजतं.
३. महेश बाबू :
टॉलिवूडच्या बड्या स्टार्सपैकी एक असलेल्या महेश बाबू यांनी आजवरच्या आपल्या कारकिर्दीत डुकुडु, अथाडु, श्रीमंथुड, नेनोक्कडाइन, पोकिरी सारख्या अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. महेश बाबू एका चित्रपटाकरता ४५ करोड रुपयांचं मानधन घेतात.
४. कमल हसन :
—
- OTT वर येऊनसुद्धा थिएटरमध्ये ‘पुष्पा’ची छप्परफाड कमाई; यशाची ४ कारणं…
- डोकं बाजूला न ठेवताही ‘पैसा वसूल’ सिनेमा देता येतो हे बॉलीवूडने KGF कडून शिकायला हवं!
—
भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेते म्हणजे कमल हसन.
२०० हून अधिक चित्रपटांमध्ये कामं केलेल्या कमल हसन यांनी तेलगू, कन्नड, तामिळ, हिंदी, बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. कमल हसन एका चित्रपटासाठी २५ कोटी रुपये मानधन घेतात असं समजतं.
५. मोहनलाल :
पाक्शे, कमलादलम, थूवनथुम्बिकल, गांधीनगर २ स्ट्रीट, किरीदम यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केलेले मोहनलाल हे साऊथ इंडस्ट्रीतलं एक बडं नाव. ते एका चित्रपटासाठी ६४ करोड रुपयांचं घसघशीत मानधन घेतात.
६. धनुष :
अभिनेता, निर्माता आणि गायक असलेला साऊथचा स्टार धनुष कुणाला माहीत नाही! त्याचं ‘कोलावेरी डी’ हे गाणं काही वर्षांपूर्वी चांगलंच गाजलं होतं.
‘रांझणा’ या हिंदी चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेला रसिकांचं भरभरून प्रेम मिळालं. अलीकडेच तो ‘अतरंगी रे’ या हिंदी चित्रपटातून दिसला होता. धनुष एका चित्रपटासाठी जवळपास ३२ करोड रुपयांचं मानधन घेतो.
७. ज्युनियर एनटीआर :
ज्युनियर एनटीआरला साऊथ इंडस्ट्रीतल्या सगळ्यात मोठ्या ऍक्शन हिरोजपैकी एक समजलं जातं. सध्या त्याच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाची जगभरात सगळीकडे हवा आहे. समोर आलेल्या बातमीनुसार, ज्युनियर एनटीआर एका चित्रपटासाठी ४५ करोड इतक्या रकमेचं मानधन घेतो.
८. राम चरण :
ज्युनियर एनटीआरच्या बरोबरीने सध्या लगेचच आठवणारा साऊथचा दुसरा अभिनेता म्हणजे राम चरण. ‘आरआरआर’ या चित्रपटात त्याने अल्लूरी सीताराम राजू नावाचं पात्रं साकारलं आहे. या चित्रपटासाठी त्याला ४५ करोड रुपये दिले गेले होते.
९. यश :
‘केजीएफ : चॅप्टर १’ या चित्रपटानंतर यश या साऊथ स्टारचा ‘केजीएफ : चॅप्टर २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात काम करण्यासाठी त्याला २० करोड पेक्षा जास्त मानधन दिलं गेल्याची बातमी समोर आली आहे.
१०. अजित कुमार :
अजित कुमार यांनी तेलगू चित्रपटात एक सहाय्यक अभिनेता म्हणून आपल्या अभिनयाच्या करियरची सुरुवात केली होती. मात्र, तामिळ चित्रपटांमधल्या त्यांच्या योगदानासाठी ते ओळखले जातात.
‘एके ६२’ या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांना तब्बल १०५ करोड रुपये दिले गेले होते असं समजतं.
११. थलपति विजय :
थलपति विजय या नावाने ओळखला जाणारा जोसेफ विजय चंद्रशेखर हा दाक्षिणात्य अभिनेता प्रामुख्याने तामिळ चित्रपटांमध्ये कामं करतो. याचबरोबरीने बाकीही बऱ्याच भारतीय भाषांमधल्या चित्रपटांतून तो दिसतो.
हा अभिनेता एका चित्रपटासाठी २० करोड रुपये मानधन घेतो अशी बातमी समोर आली आहे.
१२. प्रभास :
‘बाहुबली’च्या यशानंतर देशभरातल्या रसिकांच्या गळ्यातला ताईत झालेला हा साऊथचा स्टार. साऊथ चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक प्रभास आहे.
‘बाहुबली’च्या आधी तो एका चित्रपटासाठी जवळपास ७ करोड रुपये मानधन घ्यायचा. पण आपल्या या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर तो एका चित्रपटाकरता सुमारे ८०-८५ करोड रुपये घेतो.
एखाद्या चित्रपटाला रातोरात मिळालेलं यश त्यातल्या अभिनेत्याचं आयुष्य किती बदलून टाकतं याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
साऊथच्या या स्टार्सना मिळणाऱ्या मानधनाचे आकडे पाहून त्यांचा केवळ मोठ्या पडद्यावरच दबदबा नाही तर आपल्याला मिळायला हवी ती रक्कम चोख वसूल करून घेण्याचं कसबही त्याच्याकडे आहे हे आपल्याला दिसून येतं.
एक भारतीय म्हणून साऊथ इंडस्ट्रीने केलेली ही प्रगती अभिमान वाटावा अशीच आहे. पण एक मराठी प्रेक्षक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीनेही भविष्यात अशीच मोठी मजल मारावी असं मनापासून वाटतं.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.