' व्हाट्सॲपवर समोरच्याने डिलीट केलेले मेसेज तुम्ही या युक्तीने वाचू शकता, अगदी १००% – InMarathi

व्हाट्सॲपवर समोरच्याने डिलीट केलेले मेसेज तुम्ही या युक्तीने वाचू शकता, अगदी १००%

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आठवतात पूर्वीचे म्हणजे व्हाट्सॲपच्या सुरवातीचे दिवस? एक बार कमिटमेंट कर ली तो कर की प्रमाणे एकदा मेसेज पाठवला की तो डिलिट करण्याची सोय नव्हती. व्हाट्सॲपवर एकदा पाठवलेला मेसेज हा काळ्या दगडावरची रेघच जणू! त्यामुळे व्हायचं काय की, चुकून बोलून माती खाल्लेल्यांची पंचाईत व्हायची.

मग व्हाट्सॲपच्या तंत्रज्ञांनी यावर काम केलं आणि पाठवलेला मेसेज डिलिट करण्याची सोय झाली. म्हणजे समजा चुकून तुम्ही भलता मेसेज भलत्या व्यक्तीला किंवा ग्रुपवर चिकटवला तर तो पुसून टाकण्याची सोय झाली.

 

wa deleted msg im1

 

आपल्या बाजूनं पहाता ही एक मोठी सोय आहे. आपण चुकून केलेले मेसेज तिथून पुसून टाकले, की आपण आपण अडचणीत येणं टळतं. आता दुसर्‍या बाजूनं बघता इतरांनी डिलिट केलेल मेसेज आपल्या डोक्यात उगाचंच कुतूहलाचा किडा सोडतात.

समजा हे डिलिट केलेले मेसेजही वाचता आले तर? व्हाट्सॲपला फसवून हे डिलिट केलेल मेसेज वाचता येणं सहज शक्य आहे असं वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही युक्ती अस्तित्वात आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधल्या काही सेटिंग्जमधे छोटासा बदल करावा लागणार आहे.

व्हाट्सॲपच्या सेटिंग्जमधे जाऊन चॅट बॅक अप ऑन ठेवला, तर व्हाट्सवरचा प्रत्येक मेसेज सेव्ह केला जातो. तुम्ही व्हाट्सॲप अनइंस्टॉल करुन रिइन्स्टॉल केलं की तुम्हाला सर्व चॅट हिस्टरी पहायला मिळेल.

दुसरी युक्ति म्हणजे मोबाईलमधल्या सेटिंग्जमधे जा, इथे नोटिफ़िकेशन पर्याय दिसेल त्यातल्या ॲडव्हान्सवर किल्क करा. आता चॅट हिस्टरी येईल, ती ऑन ठेवा, त्यात तुमची सर्व चॅट हिस्टरी जमा झालेली दिसेल. व्हाट्सॲपवर समोरच्याने मेसेज डिलिट केला, तरी तुम्ही तो नोटिफिकेशन हिस्टरीमध्ये वाचू शकता.

 

wa deleted msg im2

 

याव्यतिरिक्त काही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स आहेत, ज्यांच्यामदतीनं तुम्ही डिलिट झालेले सर्व मेसेज सहजपणे वाचू शकाल. गुगल प्ले स्टोअरमधे जाऊन व्हाट्सॲपरिमुव्ह्ड प्लस हे ॲप डाऊअनलोड करा. या ॲपच्यामदतीनं व्हाट्सॲपचं नाही तर इतरही ॲपवरचे डिलिट मेसेज वाचता येणं शक्य होतं.

अर्थात हे थर्डपार्टी ॲप असल्यानं ते शंभर टक्के सुरक्षित असेलच याची खात्री नसल्यानं स्वत:च्या जबाबदारीवर सर्व खबरदारी घेतच ते वापरलं पाहिजे. जर का मोबाईलवर बॅन्केचे व्यवहार करत असाल, काही ओटीपी असतील तर हे थर्ड पार्टी न वापरण्याचाच सल्ला जाणकार देतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?