' ‘मेरे रश्क-ए-क़मर’ गाण्यातील ‘रश्क-ए-क़मर’ म्हणजे कंबर नाही हो, खरा अर्थ बघा – InMarathi

‘मेरे रश्क-ए-क़मर’ गाण्यातील ‘रश्क-ए-क़मर’ म्हणजे कंबर नाही हो, खरा अर्थ बघा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जरूरी नही इश्क मे बाहोंके सहारे मिले, किसी को जी भर के महसूस करना भी मोहोब्बत है…मित्रांनो प्रेम ही अशी गोष्ट आहे जी आयुष्यात अनपेक्षितपणे येते आणि सारे आयुष्यच बदलून टाकते.

प्रेम ही नितांत सुंदर भावना आहे. जेव्हा समोर प्रेयसी असेल तेव्हा तर प्रियकरच्या भावनांना, शब्दांना उधाण येते. त्याची नजर तिच्या चेहर्‍यावरुन काही केल्या हटायला तयार नसते, आणि मग तिच्या सौंदर्याचे एकेक स्थळ त्याला मोहवत जाते.

आपली प्रेयसी ही जगातील सर्वात सुंदर स्त्री असावी ही त्याची भावना तो शब्दातून व्यक्त करतो. कधी त्याला आपल्या प्रेयसीचे डोळे सागराप्रमाणे अथांग भासतात, तर कधी तिचे बोलणे मंद मधुर वाटते तर कधी त्याला आपली प्रेयसी आकाशातल्या चंद्रापेक्षाही सुंदर वाटते…

मित्रांनो तुम्ही म्हणाल प्रेमात पडले कि सगळे गुलाबीच दिसते. तर खरेच आहे ते. जेव्हा आपली प्रेयसी आपल्या समोर येते तेव्हा ती चंद्रापेक्षाही सुंदर भासते, हेच अनेक कवि आणि शायर लोकांनी आपल्या गीत आणि गझलांमधून संगितले आहे. त्यातील एक उत्तम गझल आहे ‘मेरे रश्के कमर, तू ने पहली नजर…’

 

song im

 

२०१७ साली प्रदर्शित झालेल्या बादशाहो या चित्रपटातील हे गाणे त्या आधीही नुसरत फतेह आली खान यांनी गायल्याने प्रसिद्ध झाले होते. नुसरत साहेबांनंतर त्यांचे पुतणे राहत फतेह आली खान यांनी देखील ही गझल बर्‍याच कार्यक्रम, मुशायरे यांमध्ये गायली आहे.

प्रचंड लोकप्रिय झालेली ही गझल आजही अनेकांच्या हृदयात घर करून आहे. पण उर्दू,अरबी शब्दांनी सजलेल्या या गझलेतील शब्दांचे अर्थ जर तुम्हाला समजले तर नक्कीच तुम्ही या नितांत स्ंदर गझलेचा आस्वाद घेऊ शकाल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ऐसे लहरा के तू रूबरू आ गयी, धड़कने बेतहाशा तड़पने लगीं… तीर ऐसा लगा, दर्द ऐसा जगा चोट दिल पे वो खायी, मज़ा आ गया…
‘मेरे रश्के क़मर, मेरे रश्के क़मर’, तूने पहली नज़र, जब नज़र से मिलाई मज़ा आ गया …

मूळ पाकिस्तानी शायर ‘फना बुलंद शहरी’ यांनी किती नजाकतीने शब्द गुंफले आहेत. आपली उत्फुल्ल चेहर्‍याची प्रेयसी जेव्हा समोर येते आणि इतकेच नाही तर ती आपल्या प्रियकराच्या नजरेत नजर मिसळून डोळ्यांची भाषा बोलू लागते तेव्हा त्या प्रियकराने अनुभवलेला रोमांच या शब्दातून अनुभवता येतो.

हवेची अलवार अशी झुळूक जशी मनाला सुखावून जाते तीच भावना आपल्याकडे हळूहळू येणार्‍या प्रेयसीला पाहिल्यावर प्रियकरच्या मनात उमटते. ती जेव्हा समोर येते तेव्हा हवेची एक शीतल झुळूक आल्यासारखे वाटते.

तिला पाहताच हृदयात एकाच वेळी अनेक भावना झंकारू लागतात, स्पंदने वाढतात आणि असे वाटते की नजरेच्या तिरांनी ती आता हृदयावर वार करेल…तिच्या नजरेच्या वारांनी होणारी जखम ही एक गोड जखम असेल जी हवीहवीशी वाटेल…

प्रेयसीच्या वेगवेगळ्या अदांनी घायाळ झालेला प्रियकर म्हणतो,’ऐसे लहरा के तू रूबरू आ गयी, धड़कने बेतहाशा तड़पने लगीं… तीर ऐसा लगा, दर्द ऐसा जगा चोट दिल पे वो खायी, मज़ा आ गया…’

 

song im 2

 

यातली खरी गम्मत तर पुढेच आहे. आपल्या प्रेयसीच्या रूपाने तो प्रियकर इतका मोहित होतो की कधी प्रेयसीच्या चेहर्‍याला चंद्राची उपमा देतो तर कधी ती चंद्रापेक्षाही सुंदर आहे असे म्हणतो. त्याला आपली प्रेयसी ईतकी सुंदर भासते, की आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याचा चंद्राला देखील हेवा वाटतो असे त्याला वाटते.

तो म्हणतो, जिच्या सौंदर्यावर चंद्र जळतो ( म्हणूनच त्याच्यावर डाग आहेत. ) अशी माझी अतिशय खूबसूरत प्रेयसी जेव्हा माझ्या नजरेला नजर मिळवते तेव्हा माझ्या मनाच्या वाळवंटात जणू काही प्रेमाच्या सरी बरसल्या असा मला भास झाला. त्या प्रेमवर्षावात मी चिंब भिजून निघालो. माझ्या प्रेमासाठी व्याकुळ मनाला तुझ्या प्रेमाने तृप्त केले आहे….

चंद्र हा जगातील सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक! आणि त्या चंद्रापेक्षाही आपली प्रेयसी सुंदर आहे म्हणून चंद्राला सुदधा तिचा हेवा वाटतो हे ठामपणे सांगणे हे प्रेयसीवरील अमोज प्रेमाचे प्रतीक आहे. ‘फना बुलंद शहरी’ यांनी प्रियकराची ही प्रेमभावना सांगण्यासाठीच ‘मेरे रश्के क़मर’ हा शब्द वापरला असावा.

 

full moon night inmarathi

 

‘रश्के क़मर’ हा एक शब्द नसून उर्दू आणि अरबी शब्दांनी बनलेला संयुक्त शब्द आहे. यात ‘रश्क’ हा उर्दू शब्द आहे ज्याचा अर्थ ‘ईर्षा किंवा जलन’ असा होतो तर ‘कमर’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ ‘चंद्र’ असा होतो दोन्ही शब्द आशयाच्या दृष्टीने सौंदर्यपूर्ण आहेत आणि त्यांच्या एकत्र येण्याने तयार होणारा नवा शब्द देखील तेवढाच आशयपूर्ण आणि नजाकतीने भरलेला आहे.

आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याला उपमा देताना प्रियकर किती सुंदर कल्पना करू शकतो याचे हे हसीन उदाहरण आहे. अजय देवगण आणि इलियाना डिक्रूझ यांच्या ‘बादशाहो’ चित्रपटातही हे गाणे नव्या शैलीत समाविष्ट करण्यात आले आहे. अजय आणि इलियानावर चित्रित केलेले हे गाणे रिलीज होताच हिट झाले, जे १९८८ मध्ये उस्ताद नुसरत फतेह अली खान यांनी पहिल्यांदा लोकांसमोर सादर केले होते.

तेव्हा मित्रांनो आता तुम्हाला ‘रश्के कमर’ चा अर्थ कळला असेलच. तेव्हा या गाण्याचा पुन्हा आस्वाद घेताना आपल्या प्रेयसीला ‘मेरे रश्के कमर’ म्हणायला विसरू नका. या आणि अशा दिलकश गाण्यांचा आस्वाद घेत रहा आणि हो,… प्रेम ही करत रहा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?